2015 मध्ये पंतप्रधान मोदींनी लोकांना व्यवसाय करण्यासाठी कर्ज देण्याचे उद्देशाने प्रधानमंत्री मुद्रा कर्जयोजना सुरू केली. देशातील जे लोक पैसे अभावी स्वतःचा व्यवसाय सुरू करू शकत नाहीत अशा लोकांना त्यांचा व्यवसाय सुरू करण्यासाठी प्राथमिक स्वरूपात कर्ज उपलब्ध करून देणे हा या योजनेचा मूळ उद्देश आहे.या योजनेत मुख्यतः सूक्ष्म ,लघु व मध्यम उद्योग (MSME) कॅटेगरीमध्ये येणाऱ्या उद्योगांना कर्ज दिले जाते.विशेषतः महिला उद्योजक नमो उद्योजक आणि छोटी व्यवसायिक यांच्यासाठी ही योजना खूप फायदेशीर आहे.
मुद्रा कर्ज योजनेचा उद्देश काय आहे?
देशातील जे छोटे व्यावसायिक यांना स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा आहे पण भांडवलाची कमतरता आहे अशा व्यवसायिकांना कमी व्याजदरात कर्ज उपलब्ध करून देणे.
मुद्रा कर्ज योजनेअंतर्गत कोणत्या व्यवसायांना लाभ मिळतो?
मुद्रा कर्ज योजनेअंतर्गत जे व्यवसाय सूक्ष्म, लघु व मध्यम(MSME) या कॅटेगरीमध्ये येतात त्यांना कर्ज मिळते.
या योजनेअंतर्गत चार प्रकारचे कर्ज दिले जातात.
प्रधानमंत्री मुद्रा कर्ज योजनेअंतर्गत किती रुपयापर्यंत कर्ज मिळते?
प्रधानमंत्री मुद्रा लोन योजना अंतर्गत चार वर्गात 50 हजार ते 20 लाखापर्यंत कर्ज मिळते. तुमच्या व्यवसायाला अनुसरून त्या त्या वर्गांतर्गत तुम्हाला संबंधित बँकेमार्फत कर्ज उपलब्ध करून दिले जाते व त्या कर्जाचा व्याजदरही कमी असतो.
प्रधानमंत्री मुद्रा कर्ज योजनेतील कर्जाचे प्रकार व त्यांचा लाभ
या योजनेत चार प्रकारात कर्ज दिले जाते,
शिशु मुद्रा लोन (Shishu Loan) – ₹50,000 पर्यंतचे लोन.
किशोर मुद्रा लोन (Kishor Loan) – ₹50,000 ते ₹5 लाख.
तरुण मुद्रा लोन (Tarun Loan) – ₹5 लाख ते ₹10 लाख.
तरुण प्लस मुद्रा लोन(Tarun Plus Loan)- 10 लाख ते 20 लाख
देशातील व्यवसायाची गरज लक्षात घेऊन नुकतेच सरकारने ही चौथी कॅटेगरी तरुण प्लस नावाने समाविष्ट केली आहे. ज्यामध्ये तुमच्या व्यवसायासाठी वीस लाखापर्यंत कर्ज मिळेल.

मुद्रा कर्ज योजनेचा व्याजदर किती आहे?
प्रधान मुद्रा लोन योजनेअंतर्गत व्यवसायिकांना अत्यंत अल्प दरात कर्ज वितरित केले जाते. या कर्जाचा व्याजदर हा 9 ते12 टक्के यादरम्यान आहे. त्या त्या प्रकारानुसार व्याजाचा दरही बदलतो. या कर्जात अन्य कोणतीही शुल्क आकारले जात नाही. जर तुम्हाला तुमचा व्यवसाय भागीदारीमध्ये सुरू करायचा असेल तरीही या योजनेअंतर्गत तुम्हाला कर्ज मिळू शकते. यातील सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे व्याजाचा दर हा संपूर्ण रकमेवर न लागता तुम्ही मुद्रा कार्ड अंतर्गत जेवढी रक्कम खर्च केली आहे तेवढ्याच रकमेवर व्याज आकारले जाते.
प्रधानमंत्री मुद्रा कर्ज किती कालावधीसाठी मिळते?
हे कर्ज तुम्हाला बारा महिन्यापासून ते पाच वर्षापर्यंत इतक्या कालावधीसाठी मिळू शकते. जर तुम्ही दिलेल्या कालावधीत काही कारणास्तव कर्ज परत करू शकत नसाल तर संबंधित बँकेमार्फत काही प्रमाणात कालावधी वाढवूनही दिला जाऊ शकतो.
कर्ज योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे व पात्रता
कोण अर्ज करू शकतो?
या कर्जाचा लाभ घेण्यासाठी पुढील अटींची पूर्तता करणे आवश्यक आहे.
1.अर्ज करणारा व्यक्ती हा भारतीय नागरिक असावा, त्याने वयाची 18 वर्षे पूर्ण केली असावी.
2. त्याचा बँकेचा इतिहास डिफॉल्ट नसावा.
3.महिला उद्योजक, नऊ उद्योजक, स्टार्टअप सुरू करणारे अर्ज करू शकतात.
आवश्यक कागदपत्रे
.1.आधार कार्ड मतदान ओळखपत्र, किंवा ड्रायव्हिंग लायसन ओळखीचे इतर प्रकार स्वीकार्य आहेत.
2. मुद्रा कर्ज योजनेचा भरलेला अर्ज, फोटो
3. तुम्ही जो व्यवसाय करणार आहे त्या व्यवसायासंबंधी सर्व माहिती जसे की पात्रता, स्थापना, बँकेचे डिटेल्स, आयटीआय भरत असल्यास त्याची माहिती.
4. मागील सहा महिन्याची बँक स्टेटमेंट
मुद्रा कर्जासाठी कोणत्या बँकेत अर्ज करावा?
1.सर्वप्रथम आपल्याजवळ एक सरकारी बँकेत अर्ज करावा तिथे लवकरात लवकर आपल्याला कर्ज उपलब्ध करून दिले जाईल.
2. पब्लिक सेक्टर बँक-ICICI Bank, IDBI Bank
3.प्रत्येक राज्याची ग्रामीण विकास बँक- महाराष्ट्रासाठी बँक ऑफ महाराष्ट्र
4. NBFC
वरीलपैकी सरकारी बँकेतूनच कर्ज घेणे जास्त संयुक्त राहील कारण त्यांचा व्याजदर इतरांच्या मानाने थोडा कमी असतो.
मुद्रा लोन मिळवण्यासाठी अर्ज कसा करावा?
ऑनलाइन प्रक्रिया
अधिकृत वेबसाईटला भेट द्या-https://www.mudra.org.in/
संबंधित कागदपत्रे अपलोड करा.
सबमिट बटणावर क्लिक करा.
व वारंवार काळजाची स्थिती तपासा.
ऑफलाइन पद्धत-
तुमच्या जवळच्या सरकारी बँकेत जा
संबंधित कर्ज विषयी सर्व माहिती मिळवा,
आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करा,
मुद्रा कर्ज योजनेचे फायदे-
कर्ज हे अत्यंत कमी व्याजदरावर मिळते.
कोणत्याही तारणाशिवाय कर्ज मिळते.
तुम्हाला नवीन व्यवसाय सुरू करता येतो किंवा आहे हा व्यवसाय वाढवता येतो.
महिला उद्योजकांना सुद्धा या कर्जाद्वारे स्वतःच्या व्यवसाय सुरू करता येतो.
निष्कर्ष
पंतप्रधान मुद्रा कर्ज योजना ही ज्यांना स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा आहे त्यांच्यासाठी एक सुवर्णसंधी ठरू शकते. याचा फायदा देशासाठी ही होईल. सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योगात एक भरीव गुंतवणूक एक चांगला विकास पाहण्यास मिळू शकतो.