देशातील काही महिलांना स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा असतो पण भांडवलाच्या कमतरतेमुळे ते शक्य होऊ शकत नाही. अशा महिलांना स्वतःचा व्यवसाय सुरू करता यावा या उद्देशाने केंद्र शासनाने महिला उद्योगिनी योजना नावाने ही योजना सुरू केली आहे या योजनेमध्ये महिलांना उद्योग सुरू करण्यासाठी 3 लाख रुपये पर्यंतचे कर्ज आणि 30% सबसिडी मिळते.
आपण या योजनेविषयी सर्व माहिती पाहणार आहोत .
उद्योगिनी योजना म्हणजे काय?
उद्योगिनी ही महिलांना त्यांचा व्यवसाय सुरू करण्यासाठी लागणारी कर्जाची आवश्यकता पूर्ण करणारी योजना आहे. या योजनेत सूक्ष्म कॅटेगरीत येणारे 88 प्रकारचे छोटे उद्योग स्थापन करण्यासाठी महिलांना 3 लाख रुपये पर्यंत कर्ज मिळते. त्यामुळे महिला आर्थिक दृष्ट्या सक्षम होऊ शकतात. केंद्र शासनाने सुरू केलेली ही खूप चांगली योजना आहे.केंद्र सरकारच्या महिला व बालविकास मंत्रालयातर्फे ही योजना चालवली जाते.
उद्योगिनी योजनेचा उद्देश-
- महिला सक्षमीकरण व स्वावलंबन याला प्रोत्साहन देणे.
- नवीन उद्योग करण्यासाठी आर्थिक पाठबळ देणे.
- देशातील लघु उद्योगांची संख्या वाढवणे’ .
- ग्रामीण भागातील महिलांना आर्थिक स्वावलंबन साध्य करण्यास मदत करणे.
कोणत्या प्रकारच्या उद्योगांसाठी ही योजना लागू आहे?
केंद्र शासनाने लघु या कॅटेगरीत येणाऱ्या 88 प्रकारच्या उद्योगांसाठी ही योजना सुरू केली आहे. त्यातील काही प्रकार खालील प्रमाणे.-
. शाई उत्पादन
• रचना संस्था
• वर्मीसेली उत्पादन
• भाजीपाला आणि फळांची विक्री
• ओले पीसणे
• जॅम, जेली आणि लोणचे उत्पादन
• काम टायपिंग आणि फोटोकॉपी सेवा
• चटई विणणे
• मॅचबॉक्स उत्पादन
• ज्यूट कार्पेट उत्पादन
• दूध केंद्र
• कोकरू स्टॉल
• पेपर, साप्ताहिक आणि मासिक मासिक विकणे
• नायलॉन बटण निर्मिती
• छायाचित्र स्टुडिओ
• प्लास्टिक वस्तूंचा व्यापार
• फिनाईल आणि नॅप्थालीन बॉल निर्मिती
• पापड बनवणे
• मातीची भांडी
• पट्टी बनवणे
• लीफ कप मॅन्युफॅक्चरिंग
• लायब्ररी
• जुने पेपर मार्ट्स
• डिश आणि सिगारेटचे दुकान
• शिककाई पावडर निर्मिती
• मिठाईचे दुकान
• फिटिंग
• चहाचे स्टॉल डिश लीफ किंवा चघळण्याच्या पानांचे दुकान
• साडी आणि भरतकाम
• सुरक्षा सेवा
• नाजूक नारळ
• दुकाने आणि आस्थापना
• रेशीम धागा निर्मिती
• रेशीम विणकाम
• रेशीम कीटक संगोपन
• क्लिंझर ऑइल, साबण पावडर आणि डिटर्जंट उत्पादन
• लेखन साहित्याचे दुकान
• कपडे छापणे आणि रंगवणे
• रजाई आणि बेड निर्मिती
• नाचणी पावडरचे दुकान
• रेडिओ आणि टीव्ही सर्व्हिसिंग स्टेशन
• रेडिमेड कपड्यांचा व्यापार
• जमीन एजन्सी
• लैंगिक संक्रमित रोग बूथ
• प्रवास सेवा
• निर्देशात्मक व्यायाम
• लोकरीच्या कपड्यांचे उत्पादन
• अगरबत्ती उत्पादन
• ध्वनी आणि व्हिडिओ कॅसेट पार्लर
• ब्रेडची दुकाने
• केळीचे कोमल पान
• बांगड्या
• सलून
• बेडशीट आणि टॉवेल उत्पादन
• बाटली कॅप निर्मिती
• बुकबाइंडिंग आणि नोटबुक निर्मिती
• काठी आणि बांबूच्या वस्तूंचे उत्पादन
• फ्लास्क आणि केटरिंग
• खडू क्रेयॉन उत्पादन
• साफसफाईची पावडर
• चप्पल निर्मिती
• एस्प्रेसो आणि चहा पावडर
• टॉपिंग्ज
• कापूस धागा उत्पादन
• स्तरित बॉक्स निर्मिती
• क्रॅच
• कापड व्यापाराचा कापलेला तुकडा
• दुग्धव्यवसाय आणि पोल्ट्री-संबंधित व्यापार
• विश्लेषण प्रयोगशाळा
• स्वच्छता
• सुक्या मासळीचा व्यापार
• बाहेर खाणे
• उपभोग्य तेलाचे दुकान
• ऊर्जा अन्न
• वाजवी किंमतीचे दुकान
• फॅक्स पेपर निर्मिती
• फिश स्टॉल
• पिठाच्या गिरण्या
• फुलांची दुकाने
• पादत्राणे उत्पादन
• इंधन लाकूड
• भेटवस्तू
• व्यायाम केंद्र
• हस्तकला उत्पादन
• कौटुंबिक लेख किरकोळ
• फ्रोझन योगर्ट पार्लर

उद्योगिनी योजनेचे फायदे काय आहेत?
कर्ज सवलत
या योजनेत ज्या महिला पात्र आहेत त्यांना तीन लाख रुपये पर्यंत कर्ज मिळते. ज्याचा उपयोग करून त्या स्वतःचा व्यवसाय सुरू करू शकतात. हे कर्ज त्या त्या बँकेनुसार ठरलेले व्याजदरावर मिळते. महिला उद्योजकांना आर्थिक मदत करण्यासाठी त्यांना दिलेल्या कर्जावर 30% सबसिडी देण्याचा सरकारचा प्रस्ताव आहे. पुढे, यामुळे कर्ज मिळते payअधिक परवडणारे आणि आर्थिक भार कमी करते.
व्याजाचा दर/ सवलत-
साधारण प्रवर्गातील महिलांना10 ते 12 टक्के व्याजदराने कर्ज दिले जाते. तुम्ही कोणत्या बँकेतून कर्ज घेतले आहे त्या संबंधित बँकेच्या नियमानुसार व्याजाचा दर ठरत असतो.
ज्या महिला दिव्यांग, विधवा प्रवर्गात येतात त्यांना व्याज मुक्त कर्ज दिले जातं. व त्यांना त्यांचा व्यवसाय सुरू करण्यासाठी मदत केली जाते.
या योजनेत कुटुंबाच्या वार्षिक उत्पन्नानुसार 30 टक्के अनुदान दिलं जातं.
उद्योगिनी योजनेसाठी पात्रता व अटी
वयाची अट
उद्योगिनी योजनेअंतर्गत कर्ज मिळू इच्छिणाऱ्या महिलेचे वय18 ते 55 यादरम्यान असावं.
इतर पात्रता व अटी
अर्ज करणाऱ्या महिलेचा वार्षिक कौटुंबिक उत्पन्न हे रुपये दीड लाख पेक्षा कमी असणे गरजेचे आहे.दिव्यांग महिला, विधवा आणि परित्यक्तांसाठी कमाल उत्पन्नाची मर्यादा नाही व त्यांना व्याज मुक्त कर्जही दिले जाते.
अर्ज करणाऱ्या महिलेने त्यांचा बँकेचा क्रेडिट स्कोर मजबूत असल्याची खात्री करावी. पूर्वी घेतलेली कर्जे वेळेवर परत केलेली असावीत. हा क्रेडिट स्कोर ज्या बँकेत अर्ज करणार आहे त्या बँकेत विश्वास पात्र असावा.
कर्जदार महिलेला भूतकाळात कधीही कोणत्याही कर्जावर डिफॉल्ट केलेले नसावे.
उद्योगिनी योजनेसाठी अर्ज कसा करावा?
ऑनलाईन मार्ग-
1.उद्योगिनी योजनेअंतर्गत कर्ज पुरवणाऱ्या बँकेच्या अधिकृत वेबसाईट ला जा.
2. त्या वेबसाईट मध्ये उद्योगिनी कर्ज विभाग यामध्ये जा
3. आवश्यक तपशील व कागदपत्रे अपलोड करा.
4.अधिकृत संस्था व ती बँक तुमच्या अर्जाची चुकून पुनरावलोकन व तपासणी करेल व मंजुरीची प्रक्रिया पूर्ण करेल.
5. अर्ज मंजूर झाल्यास पैसे तुमच्या खात्यात जमा केले जातील.
ऑफलाइन पद्धत-
1.तुमच्या जवळील शहरातील जी बँक उद्योगिनी कर्ज वितरित करते त्या बँकेची संपर्क साधा.
2. संबंधित अधिकाऱ्याकडून सर्व माहिती जाणून घ्या.
3. आवश्यक कागदपत्रांसह योग्य अर्ज जमा करा.
4. संबंधित बँक व संस्था तुमच्या अर्जाची तपासणी करेल व पुढील प्रक्रिया करेल.
5. अर्ज मंजूर झाल्यास तुमच्या बँक खात्यात पैसे जमा केले जातील
कोणत्या कागदपत्रांची आवश्यकता आहे?
आधार कार्ड व जन्माचा दाखला
रहिवासी दाखला
संबंधित बँकेचे बँक पासबुक
उत्पन्नाचा दाखला
2 पासपोर्ट साईज फोटो
जर महिला दारिद्र रेषेखालील असेल तर सोबत रेशन कार्ड ची प्रत.
योजनेची संबंधित महत्वाच्या वेबसाईट व कार्यालयाचे पत्ते
या योजनेविषयी अधिक माहितीसाठी केंद्र शासनाच्या या अधिकृत वेबसाईट ला भेट द्या- https://udyogini.org/
अधिक तपशीलासाठी महिला खालील पत्यावर संपर्क साधू शकतात.
उद्योगिनी
डी-17
तळघर, साकेत,
नवी दिल्ली – 110017
फोन नंबर: ०११-४५७८११२५
ईमेल: mail@udyogini.org
निष्कर्ष
ज्या महिलांना स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा आहे , त्या महिलांसाठी उद्योगिनी ही एक उत्कृष्ट योजना आहे. योग्य प्रकारे अर्ज केल्यास तुम्हाला लवकरात लवकर कर्ज मिळू शकते. या योजनेच्या फायदा घ्या स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याचे स्वप्न साकार करा.