Land Record म्हणजे काय? वडिलोपार्जित जमीन Mahabhulekh द्वारे आपल्या नावावर करण्याची सोपी पद्धत;land-record-mahabhulekh-vadiloparjit-jamin-navnondani-online

land-record-mahabhulekh-vadiloparjit-jamin-navnondani-online;महाराष्ट्रात असो किंवा भारतामध्ये असो आपल्या वडिलोपार्जित जमिनीची नाव नोंदणी करणे खूप महत्त्वाची बाब समजली जाते . यासाठी आधी खूप किचकट प्रक्रिया करून नावामध्ये बदल करता येत असे. त्यासाठी कित्येकांना सरकारी कार्यालयाच्या चकरा माराव्या लागले असतील . पण आता वडिलोपार्जित जमिनीचे नाव नोंदणी करणे पूर्वीपेक्षा खूपच सोपे आणि स्वस्त झाले आहेत . भारत सरकारच्या डिजिटल इंडिया उपक्रमामुळे जी जमीन व्यवस्थापनाशी संबंधित प्रक्रिया होती ती खूपच पारदर्शक आणि सुलभ झाली आहे . या डिजिटल इंडिया उपक्रमामुळे तुम्ही आता फक्त 100 रुपये मध्ये किंवा त्यापेक्षाही कमी खर्चात तुमच्या जमिनीची नाव नोंदणी करू शकता .

ही संपूर्ण प्रक्रिया डिजिटल पोर्टल द्वारे ऑनलाइन स्वरूपात उपलब्ध झाल्यामुळे तुम्ही आता घरबसल्या जमिनीच्या तपशिलात बदल करू शकता . या संपूर्ण लेखांमध्ये आपण याविषयी सविस्तर माहिती व प्रक्रिया जाणून घेऊ . यामध्ये कोण कोणते कागदपत्रे आवश्यक आहे , नेमकी प्रक्रिया काय आहे ही सर्व माहिती पाहू .

आपणा सर्वांना माहिती आहे की जमिनीच्या मालकीशी संबंधित असणारा महत्त्वाचा दस्तऐवज म्हणजे लँड रेकॉर्ड (Land Record). लँड रेकॉर्डमध्ये जमिनीवर संपूर्ण माहिती असते जसे की जमिनीचे क्षेत्रफळ किती , सीमा , मालकी हक्क अशी सर्व माहिती नोंदवलेली असते . मग तुमची जमीन ही खरेदी केलेली असो किंवा जुनी वडिलोपार्जित मिळालेली असो लँड रेकॉर्ड हा महत्त्वाचा कायदेशीर पुरावा म्हणून गणला जातो . त्या शासनाने सुरू केलेल्या डिजिटल इंडिया उपक्रमामुळे ही सर्व माहिती तुम्हाला आता ऑनलाइन स्वरूपात पाहता येथे त्यासाठी तुम्हाला कोणत्याही शासकीय कार्यालयात जाण्याची आवश्यकता नाही . तुम्ही महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत पोर्टलद्वारे 7/12, सातबारा किंवा Record of Rights (RoR) सहज तपासू शकता.

वडिलोपार्जित जमिनीवर नाव नोंदणी प्रक्रिया ही महाराष्ट्र शासनाच्या महाभुमी पोर्टल द्वारे अगदी काही मिनिटात पूर्ण होते .ही प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी पहिला तुम्ही महाराष्ट्र शासनाच्या लँड रेकॉर्ड पोर्टलवर जा (https://mahabhumi.gov.in) .
या संकेतस्थळावर नवीन नोंदणीसाठी अर्ज उपलब्ध आहेत , यामध्ये जमिनीचा सर्वे नंबर, मालकाचे नाव ,तपशीलवार माहिती सर्व भरून घ्या . त्यासाठी आवश्यक असणारी व तिथे मागितली जाणारी सर्व कागदपत्रे अपलोड करून घ्या . त्यासाठी असणारी नाममात्र शंभर रुपये फी भरून घ्या व अर्ज सबमिट करा . त्यानंतर शासकीय स्तरावर तुमच्या अर्जाची छाननी पडताळणी संबंधित अधिकाऱ्यामार्फत केली जाईल व त्यानंतर साधारणता पंधरा ते वीस दिवसांमध्ये ही प्रक्रिया पूर्ण होऊन तुमचे नाव लँड रेकॉर्डमध्ये नोंदवले जाईल.

ही प्रक्रिया करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे

  • ओळखपत्र: आधार कार्ड, पॅन कार्ड किंवा मतदार ओळखपत्र.
  • जमिनीचे दस्तऐवज: 7/12 उतारा, सातबारा किंवा Record of Rights (RoR).
  • वारसाहक्काचा पुरावा: मृत व्यक्तीचे मृत्यू प्रमाणपत्र, वारसनोंद किंवा कायदेशीर वारस प्रमाणपत्र.
  • अर्ज फॉर्म: ऑनलाइन पोर्टलवर उपलब्ध.
  • इतर: काही राज्यांमध्ये पासपोर्ट आकाराचा फोटो किंवा नोटरीकृत प्रत


भारत सरकारने जो डिजिटल इंडिया उपक्रम सुरू केला आहे त्या अंतर्गत जो भू अभिलेख आधुनिकीकरण कार्यक्रम सुरू केला आहे त्याद्वारे 2025 पर्यंत जवळपास 95 टक्के पेक्षा जास्त जमिनींचे अभिलेख हे डिजिटल झाले आहेत . तसेच महाराष्ट्र , कर्नाटक आणि गुजरात सारख्या राज्यांनी या कार्यक्रमात जवळपास शंभर टक्के पर्यंत डिजिटलायझेशन पूर्ण केले आहे . यामध्ये जी आधार कार्ड द्वारे जी लँड रेकॉर्डची सुविधा आहे त्यामुळे मालकी पडताळणी अधिक सुरक्षित झाली आहे . तसेच, काही राज्यांनी ब्लॉकचेन तंत्रज्ञान वापरून लँड रेकॉर्ड्स सुरक्षित करण्याचे पाऊल उचलले आहे. यामुळे फसवणूक आणि चुकीच्या नोंदींची शक्यता जवळपास संपली आहे. 2025 मध्ये, सरकारने AI-आधारित लँड रेकॉर्ड पडताळणी प्रणालीवर काम सुरू केले आहे, ज्यामुळे प्रक्रिया आणखी जलद होईल.

वडिलोपार्जित जमीन आपल्या नावावर करणे आता फक्त 100 रुपयात शक्य आहे! डिजिटल इंडिया उपक्रमामुळे ही प्रक्रिया जलद, स्वस्त आणि पारदर्शक झाली आहे. लँड रेकॉर्ड नावावर केल्याने तुमच्या जमिनीची कायदेशीर मालकी स्पष्ट होते आणि भविष्यातील कायदेशीर अडचणी टाळता येतात. तुमच्या राज्याच्या अधिकृत पोर्टलवर जा, कागदपत्रे तयार ठेवा आणि आजच प्रक्रिया सुरू करा. अधिक माहितीसाठी तुमच्या जवळच्या तलाठी कार्यालयाशी किंवा https://dlrc.gov.in/ वर संपर्क साधा.

Leave a Comment