महाराष्ट्र शासनाने सुरू केलेल्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजना ज्या अंतर्गत शेतकऱ्यांना वर्षाला सहा हजार रुपये दिले जातात . नमो शेतकरी महासन्मान निधी योजना 6 वा हप्ता हा गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर 29 मार्चपासून शेतकऱ्याच्या आधार संलग्न बँक खात्यात जमा करण्यास सुरुवात केली जाणार आहे. अशी माहिती मुख्यमंत्री कार्यालयाकडून प्रसिद्ध करण्यात आली आहे.
नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत सहाव्या हप्त्यांतर्गत सुमारे 93.26 लाख शेतकरी कुटुंबांना लाभ वितरित केला जाणार आहे. या अंतर्गत 2169 कोटींची रक्कम शासनाद्वारे शेतकऱ्यांमध्ये वितरित केली जाईल.
काय आहे नमो शेतकरी किसान सन्मान निधी योजना?
शेतकऱ्यांना त्यांची बी बियाणे खरेदी करता यावी किंवा इतर फवारणी औषधे खरेदी करता यावी यासाठी शेतकऱ्यांकडे एक निश्चित उत्पन्नाचा स्त्रोत असावा या अनुषंगाने केंद्र शासनाने प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (PM KISAN) योजना 2019 मध्ये सुरू केली होती. या योजनेत सर्व पात्र शेतकरी कुटुंबांना रुपये 2000 /- प्रत्येकी दोन महिन्याने म्हणजेच वार्षिक 6000/- रुपये अनुदान स्वरूपात दिले जातात.
त्यातच राज्य शासनाने शेतकऱ्यांना अजून आर्थिक रित्या सक्षम करण्यासाठी व निश्चित उत्पन्न देण्यासाठी पीएम किसान भर म्हणून राज्याची नमो शेतकरी महासन्मान निधी योजना 2023-24पासून सुरू केली. या अंतर्गत पात्र शेतकरी कुटुंबाला प्रति वर्ष 6000/- रुपये अनुदान मधून दिले जातात. त्यामुळे एकंदरीत आता शेतकऱ्याला केंद्र शासनाचे व राज्य शासनाचे मिळून 12 हजार रुपये प्रति वर्ष मिळतील.
नमो शेतकरी योजनेचे पैसे जमा झालेत का नाही ( स्टेटस) कसे तपासावे?
- सर्वप्रथम ज्या बँक खात्यात तुमचे नमो शेतकरी योजनेचे पैसे जमा होतात त्या बँक खात्याशी संलग्न असलेल्या मोबाईल नंबर वर संबंधी बँकेकडून पैसे जमा झाल्याबाबत SMS द्वारे कळविले जाईल.
जर तसा संदेश आला नसेल तर महाराष्ट्र शासनाच्या महाडीबीटी पोर्टल वर जाऊन Beneficiary Status वर क्लिक करा आणि आवश्यक माहिती भरून तुमचा तपशील तपासा.
https://nsmny.mahait.org/

नमो शेतकरी योजनेचे पैसे जमा झाले नसतील तर काय करावे?
- सर्वप्रथम तुमचे बँक खाते आधार कार्ड सोबत लिंक आहे का ते तपासा. नसेल तर संबंधित बँकेत जाऊन ती प्रक्रिया पूर्ण करून घ्या.
- त्यानंतर पी एम किसान सन्मान निधी योजना च्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन तुमचे स्टेटस चेक करा -त्या ठिकाणी तुमची E KYC कम्प्लीट झालेली असावी.
- त्या ठिकाणी लँड शेडिंग हा ऑप्शन yes दाखवत असेल तर तुमची प्रक्रिया पूर्ण आहे. जर नसेल तर ते पूर्ण करून घ्या.
- यानंतरही जर पैसे येत नसतील तर तुम्ही तुमच्या तालुक्याच्या कृषी कार्यालयात जाऊन संबंधित अधिकारी सोबत चर्चा करा. व त्यांच्याकडून तुमच्या समस्येचे निराकरण करून घ्या.