magel-tyala-solar-krushi-pump-yojana-2025;,नमस्कार शेतकरी मित्रांनो , ग्रामीण भागात शेती करणाऱ्या प्रत्येक शेतकऱ्याला त्याला शेतात पाणी देताना येणाऱ्या वीज बिलांची चिंता भेडसावत असते , त्यासोबत त्याला शेताला रात्रीच्या वेळी पाणी देण्याच्या त्रासही सहन करावा लागतो . ज्यामुळे शेतकऱ्याचे दोन्ही बाजूने कोंडी होते . हीच महत्त्वाची बाब लक्षात घेत महाराष्ट्र शासनाने शेतकऱ्यांसाठी एक खूप फायदेशीर योजना सुरू केली आहे , ती म्हणजे मागेल त्याला सौर कृषी पंप योजना , जी योजना केंद्र शासनाने सुरू केलेल्या प्रधानमंत्री कुसुम योजनेचा भाग आहे . यामुळे शेतकऱ्याला दिवसा सौर ऊर्जेवर पंप चालवता येईल यामुळे त्याला दुहेरी फायदा होईल . जसे की वीस बिलात कपात व दिवसा त शेताला पाणी देता येईल .2025 मध्ये या योजनेचा विस्तार झाला असून हजारो शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेतला आहे .
या योजनेचे महत्त्वाचे फायदे
या योजनेचा मुख्य उद्देश म्हणजे शेतकऱ्यांना सौर उर्जेवर चालणारे पंप देऊन त्यांना येणाऱ्या वीज बिलात कपात करण्यास मदत करणे व शेतकऱ्यांना रात्रीच्या वेळी पाणी देण्याच्या धोक्यापासून मुक्त करणे .
या योजनेच्या मुख्य फायदा म्हणजे शेतकऱ्याला जो सौर पंप खरेदी करायचा आहे त्यावर शासनाद्वारे 90% ते 95 टक्के पर्यंत अनुदान मिळते . म्हणजे शेतकऱ्याला त्याच्या खिशातून पाच ते दहा टक्के खर्च करावा लागणार आहे . हा पंप सौरऊर्जेवर चालत असल्याने वीज बिल शून्यावर येते . पिकांना वेळेवर पाणी मिळाल्यामुळे उत्पादनात 20 ते 30 टक्के वाढ होते .2025 मध्ये, महाराष्ट्रात 1 लाखाहून अधिक सौर पंप बसवण्याचे लक्ष्य आहे, आणि आतापर्यंत 50,000 हून अधिक शेतकऱ्यांना लाभ मिळाला आहे.
कोणते शेतकरी पात्र आहेत ?
या योजनेसाठी अर्ज करणारा शेतकरी हा महाराष्ट्राचा रहिवासी असावा ही मुख्य पात्रता आहे . जर तुम्ही महाराष्ट्रातील शेतकरी असतात तर तुमच्या शेतात विहीर , शेततळे , बोरवेल, किंवा अन्य पाण्याचा स्त्रोत उपलब्ध असावा तरच तुम्ही अर्ज करू शकता . या योजनेचा मुख्य फायदा म्हणजे ज्या शेतकऱ्याकडे पारंपारिक वीज जोडणी नाही त्यांना या अंतर्गत प्राधान्य दिले जाते . तसेच तुम्ही अर्ज करण्यापूर्वी इतर कोणत्याही सौर पंप योजनेच्या लाभ घेतलेला नसावा . एका कुटुंबाला एकच लाभ घेता येईल . म्हणजेच एका सातबारा उतारावर एकच लाभ मिळेल .
आवश्यक कागदपत्रे
अर्ज करू इच्छिणाऱ्या शेतकऱ्याकडे आधार कार्ड , त्याच्या रहिवासी दाखला ,7/12 आणि फेरफार उतारा, बँक पासबुक, पासपोर्ट आकाराचा फोटो आणि मोबाईल नंबर इत्यादी गोष्टींची आवश्यकता आहे . जर अर्ज करणारा शेतकरी हा अनुसूचित जाती किंवा जमाती प्रवर्गातील असेल तर सोबत त्याला तसा दाखला जोडावा लागेल .याशिवाय, तुमच्या शेतात पाण्याचा स्रोत असल्याचा पुरावा, जसे की विहिरीचा फोटो किंवा शेततळ्याचा दाखला, द्यावा लागेल.ही कागदपत्रे तुमच्याकडे आधीच असतील, आणि नसतील तर तलाठी कार्यालयातून सहज मिळतील.
सौर पंपाची निवड
या योजनेत मिळणारे पंप हे अर्ज करणाऱ्या शेतकऱ्यांच्या शेतीच्या आकारावर अवलंबून आहे . 2.5 एकरांपर्यंतच्या शेतकऱ्यांना 3 HP पंप, 2.5 ते 5 एकर असणाऱ्यांना 5 HP पंप, आणि 5 एकरांपेक्षा जास्त शेत असणाऱ्यांना 7.5 HP पर्यंतचे पंप मिळतात .2025 मध्ये, सरकारने सौर पंपांची गुणवत्ता सुधारण्यासाठी नवीन तंत्रज्ञान आणले आहे, ज्यामुळे पंपांचे आयुष्य 10-15 वर्षांपर्यंत वाढले आहे.
अर्ज कसा करावा?
या योजनेसाठी अर्ज करणे खूपच सोपे आहे. तुम्ही महावितरणच्या www.mahadiscom.in किंवा महाऊर्जाच्या kusum.mahaurja.com या वेबसाइटवर जा. तिथे “कुसुम सौर कृषी पंप” हा पर्याय निवडा. तुमची वैयक्तिक माहिती, शेताचा तपशील आणि कागदपत्रे अपलोड करा. सर्व माहिती भरल्यानंतर अर्ज सबमिट करा. जर तुम्हाला ऑनलाइन अर्जात अडचण येत असेल, तर जवळच्या महावितरण कार्यालयात किंवा टोल-फ्री क्रमांक वर संपर्क साधा. अर्जाची पडताळणी झाल्यावर तुम्हाला सौर पंप मिळेल.
ही योजना शेतकऱ्यांचे आयुष्य बदलत आहे. सौर पंपामुळे वीजबिलाचा खर्च नाहीसा होतो, आणि तुम्ही पिकांना वेळेवर पाणी देऊ शकता. काही शेतकरी अतिरिक्त सौरऊर्जा विकून उत्पन्नही कमावत आहेत. 2025 मध्ये, महाराष्ट्र सरकारने या योजनेचा विस्तार ग्रामीण भागात वाढवला आहे.ही संधी सोडू नका.