लाडकी बहीण योजनेत मोठा बदल! आता फक्त 500 रुपये मिळणार का? जाणून घ्या संपूर्ण माहिती;ladki-bahin-yojana-500-rupaye-update

ladki-bahin-yojana-500-rupaye-update;महाराष्ट्र शासन असो  किंवा केंद्र  शासन असो महिलांच्या सक्षमीकरणासाठी विविध योजना  राबवत असते .त्यापैकीच एक गेल्या वर्षीची  सर्वात यशस्वी योजना म्हणजे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना. ज्याद्वारे महाराष्ट्रात पात्र महिलांना दर महिना दीड हजार रुपये आर्थिक मदत दिली जाते.  या योजनेचा मुख्य उद्देश म्हणजे महिलांना आर्थिक स्वावलंबी बनवणे त्यांचे आरोग्य आणि पोषण सुधारणे व कुटुंबातील त्यांची भूमिका मजबूत करणे  हा आहे.

 परंतु   नुकताच हाती आलेल्या माहितीनुसार या योजनेत काही बदल केले आहेत.  ज्याचा प्रभाव या योजनेअंतर्गतत लाभ देणाऱ्या सुमारे आठ लाख महिलांवर बोलायची शक्यता आहे. हा बदल   ज्या महिला नमो शेतकरी महा सन्मान निधी योजनेच्या लाभ घेतात फक्त त्यांच्यासाठी आहे.  नेमकं काय बदल आहे हे आपण या संपूर्ण लेखांमध्ये पाहू.

योजनेत नेमका काय बदल झाला आहे?

  महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिलेल्या माहितीनुसार झालेला बदल हा फक्त ज्या महिला नमो शेतकरी योजनेअंतर्गत देखील महिन्याला एक हजार रुपयांचा लाभ घेतात फक्त त्यांच्यासाठीच लागू आहे. 

नमो शेतकरी महासम्मान निधी योजना ही शेतकऱ्यांना आर्थिक मदत देणारी योजना आहे, ज्याअंतर्गत 90 लाख शेतकऱ्यांना वार्षिक 6,000 रुपये (मासिक 1,000 रुपये) दिले जातात. ही रक्कम थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होते. पण पण जर आपण लाडकी बहीण योजनेची  अट पाहिली असता आपल्याला असे दिसून येते की  लाडकी बहिणी योजनेअंतर्गत लाभ घेण्यासाठी अशाच महिला पात्र असतील च्या महिलांना सर्व सरकारी योजना म्हणून मासिक दीड हजार रुपये पेक्षा जास्त लाभ मिळत नाही.

या नियमामुळे, ज्या महिलांना नमो शेतकरी योजनेतून 1,000 रुपये मिळत आहेत, त्यांना लाडकी बहीण योजनेतून फक्त 500 रुपये मिळतील, ज्यामुळे त्यांचे एकूण मासिक लाभ 1,500 रुपये राहतील. यामुळे सुमारे 7.74 लाख महिलांचा लाडकी बहीण योजनेतील मासिक लाभ 1,500 वरून 500 रुपयांवर आला आहे.

 सरकार द्वारे असा निर्णय घेण्यामागील कारण

महाराष्ट्र सरकारने 2025 मध्ये लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांची पुनर्पडताळणी सुरू केली. या प्रक्रियेत असे आढळले की, सुमारे 8 लाख महिला नमो शेतकरी योजनेतून 1,000 रुपये मिळवत आहेत. त्यामुळे, सरकारने या महिलांचा लाडकी बहीण योजनेतील लाभ 500 रुपयांवर आणला. ही पुनर्पडताळणी 28 जून आणि 3 जुलै 2024 रोजी जारी केलेल्या शासकीय ठरावांनुसार आहे, ज्यात असे स्पष्टपणे नमूद आहे की एका लाभार्थ्याला एकापेक्षा जास्त योजनांमधून मिळणारा लाभ 1,500 रुपयांपेक्षा जास्त नसावा.

महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी याबाबत स्पष्टीकरण देताना सांगितले की, कोणत्याही पात्र महिलेला योजनेतून वगळले जाणार नाही, परंतु ज्या महिला दुसऱ्या योजनेतून लाभ घेत आहेत, त्यांना लाडकी बहीण योजनेतून फक्त उर्वरित रक्कम (म्हणजेच 500 रुपये) मिळेल. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील योजनेची निरंतरता कायम राहील आणि ती बंद होणार नाही, असे आश्वासन दिले आहे.

सरकारच्या या निर्णयामुळे  निवडणुकीपूर्वी सर्व महिलांना लाभ देण्याचे आश्वासन देण्यात आले होते, परंतु आता पुनर्पडताळणीतून लाभार्थ्यांची संख्या कमी केली जात आहे असा राजकीय  वाद निर्माण झाला आहे. 

 यावरून मुख्यमंत्री व महिला व बाल विकास मंत्री  यांनी स्पष्टीकरण दिले आहे की, योजनेची पुनर  पडताळणी ही केवळ या योजनेचा लाभ फक्त पात्र महिलांनाच मिळावा यासाठी आहे. कोणत्याही पात्र महिलेला या योजनेमधून वगळल जाणार नसल्याची  ग्वाही देखील त्यांनी दिली. तसेच या योजनेसाठी कोणत्याही प्रकारचे आर्थिक  निधीमध्ये कमतरता केलेली नाही.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही महाराष्ट्रातील महिलांसाठी एक महत्त्वाची योजना आहे, जी त्यांना आर्थिक स्वातंत्र्य आणि सक्षमीकरण प्रदान करते. परंतु, नमो शेतकरी योजनेसह इतर योजनांचा लाभ घेणाऱ्या महिलांसाठी मासिक रक्कम 500 रुपये करण्याचा निर्णय काहींना अन्यायकारक वाटला आहे. सरकारने याला पात्रता निकषांचा भाग असल्याचे स्पष्टीकरण दिले आहे. या योजनेची यशस्विता आणि त्यावरील राजकीय वाद येत्या काळातही चर्चेचा विषय राहील.

Leave a Comment

Index