घर बांधण्यासाठी सरकार देणार 1 लाखाची मदत! ग्रामीण घरविहीनांसाठी सुवर्णसंधी;gharbandhani-yojana-1-lakh-gramin-madad

gharbandhani-yojana-1-lakh-gramin-madadग्रामीण भागात सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे स्वतःच घर असणे . व त्यासोबतच भेडसावनावर आणखीन एक महत्त्वाचा प्रश्न म्हणजे स्वतःचे घर बांधण्यासाठी स्वतःची जमीन नसणे . ग्रामीण भागामध्ये असे भरपूर कुटुंब आहे त्यांच्याकडे घर बांधण्यासाठी स्वतःची जमीन उपलब्ध नसते . व त्यामुळे ते शासनाच्या घरकुल सारख्या योजनांचा लाभ घेऊ शकत नाही . याच प्रश्नावर उपाय म्हणून महाराष्ट्र शासनाने एक नवीन योजना सुरू केली आहे ती म्हणजे पंडित दीनदयाळ उपाध्याय घरकुल भूखंड खरेदी आर्थिक मदत योजना. या योजना अंतर्गत सरकार नागरिकना घर बांधण्यासाठी लागणारे जमीन खरेदीसाठी अनुदान देते . जेणेकरून ते स्वतःचे घर बांधू शकतील. २०२५ मध्ये ही योजना अधिक प्रभावी झाली आहे, आणि लाखो कुटुंबांना याचा फायदा मिळत आहे.

या योजनेचा मुख्य उद्देश म्हणजे ग्रामीण भागातील जी कुटुंब घरविहीन आहेत त्यांना स्वतःची जागा उपलब्ध करून देणे . ज्यामुळे ते प्रधानमंत्री आवास योजना-ग्रामीण (PMAY-G) सारख्या घरकुल योजनांचा लाभ घेऊन स्वतःचे पक्के घर बांधू शकतील. योजना म्हणजे गरीबांसाठी एक मोठी मदत आहे, कारण जागा नसल्यामुळे अनेक जण घरकुल योजनांपासून वंचित राहतात. सरकारने ही योजना २०२४ मध्ये सुरू केली असून, २०२५ मध्ये तिचा विस्तार केला आहे,

या योजनेअंतर्गत मिळणारी मदत

या योजनेअंतर्गत जे नागरिक पात्र आहे त्यांना ५०० चौरस फुटांपर्यंतच्या जमीन खरेदीसाठी १ लाख रुपयांपर्यंतचे अनुदान मिळते. जर जमिनीची किंमत १ लाखांपेक्षा कमी असेल, तर पूर्ण किंमत सरकार भरते. ही आर्थिक मदत ही आर्थिक मदत लाभार्थ्याच्या थेट बँक खात्यामध्ये जमा केली जाते . मिळणाऱ्या या पैशाचा वापर फक्त जमीन खरेदी साठीच करता येतो .या योजनेमुळे आर्थिकदृष्ट्या कमकुवत असणाऱ्या कुटुंबांना मोठा दिलासा मिळाला आहे .ही मदत ग्रामीण भागातील जागेच्या किंमतीनुसार ठरवली जाते.

कोणते नागरिक पात्र आहे

ही योजना प्रामुख्याने ग्रामीण भागातील घरविहीन कुटुंबांसाठी आहे, ज्यांच्याकडे स्वतःची जागा नाही. अर्ज करणारा नागरिक हा महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असणे आवश्यक आहे .त्याचे वार्षिक उत्पन्न १ लाख रुपयांपेक्षा कमी असावे, आणि तो दारिद्र्यरेषेखालील (BPL) कुटुंबाचा भाग असावा. याशिवाय, लाभार्थीने यापूर्वी कोणत्याही घरकुल किंवा भूखंड योजनेचा लाभ घेतलेला नसावा.ही योजना विशेषतः अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, अल्पभूधारक आणि महिला-प्रधान कुटुंबांसाठी प्राधान्य देते.

या योजनेसाठी अर्ज करणे सोपे आहे. तुम्ही तुमच्या ग्रामपंचायत किंवा तहसीलदार कार्यालयात जाऊन अर्ज करू शकता. ऑनलाइन अर्जासाठी महाराष्ट्र सरकारच्या ग्रामीण विकास विभागाच्या पोर्टलवर जा. अर्जात तुमची वैयक्तिक माहिती, उत्पन्न, कुटुंबाचा तपशील आणि जागेची गरज सांगा.

आवश्यक कागदपत्रे

सरकारने या योजनेचे निकष अगदी साधे सोपे आणि सरळ ठेवले आहे जेणेकरून जास्त नागरिकांना याचा फायदा घेता यावा . अर्जदाराकडे आधार कार्ड, रेशन कार्ड, उत्पन्नाचा दाखला आणि रहिवासी पुरावा असावा, यासोबत आधार कार्ड सोबत लिंक असलेले बँक खाते इत्यादी आवश्यक कागदपत्रे आहेत .

हे अनुदान विशेषतः काही घरकुल योजनांच्या लाभार्थ्यांसाठी आहे. यात प्रधानमंत्री आवास योजना-ग्रामीण (PMAY-G), रमाई आवास योजना, शबरी आवास योजना आणि सरकारी घरकुल योजनांचा समावेश आहे.

ही योजना ग्रामीण भागातील गरीब कुटुंबासाठी अत्यंत महत्त्वाची व उपयुक्त योजना आहे . या योजनेमुळे ग्रामीण नागरिक स्वतःचे घर बांधू शकतात आणि जीवनमान सुधारू शकतात. तुम्ही ग्रामीण भागात राहत असाल आणि जागा नसल्यामुळे घरकुल योजनांचा लाभ घेऊ शकत नसाल, तर ही योजना तुमच्यासाठीखूप महत्त्वाची योजना आहे . पण लक्षात ठेवा, योजनेचे नियम वेळोवेळी बदलू शकतात, म्हणून अधिकृत सरकारी कार्यालयात जाऊन नवीनतम माहिती घ्या.

Leave a Comment

Index