माहिती-
महाराष्ट्र शासन गेल्या काही वर्षापासून Competitive Exams ची तयारी करणाऱ्या होतकरू हुशार विद्यार्थ्यांसाठी विविध संस्थांमार्फत( Scholarship – Sarthi/ Mahajyoti/ BARTI/TRTI/ AMRUT) योजना राबवत आहे. त्यामुळे राज्यातील जे गरीब विद्यार्थी आहेत की जे Pune किंवा Delhi सारख्या ठिकाणी जाऊन Coaching घेऊ शकत नाहीत त्यांना या योजनेमुळे मदत होईल. जेणेकरून ते त्यांचे अधिकारी होण्याचे स्वप्न पूर्ण करू शकतील.अशी ही महाराष्ट्र शासनाची खूप चांगली योजना आहे.
या योजनेअंतर्गत महाराष्ट्र शासनाने विविध संवर्गातील विद्यार्थ्यांसाठी वेगवेगळ्या संस्था स्थापन केले आहेत जसे की Sarthi/ Mahajyoti/ BARTI/TRTI/ AMRUT या संस्थान मार्फत शासन त्या त्या वर्गातील विद्यार्थ्यांना मदत करते.
या संस्था एका सामायिक CET परीक्षेद्वारे विद्यार्थ्यांची निवड करते. व त्यांना पुणे, दिल्ली सारख्या ठिकाणी मोफत Coaching उपलब्ध करून देते. व त्यांना त्यांचा मासिक खर्च भागवता यावा यासाठी काही विशिष्ट रक्कम दर महिन्याला Stipend स्वरूपात देते. ज्यामुळे विद्यार्थ्यांची तिथे राहण्याची व जेवणाची व्यवस्था होते.
कोणकोणत्या परीक्षांसाठी लागू ?
MPSC ( राज्यसेवा+ संयुक्त परीक्षा)
UPSC
SSC
JUDICIARY EXAM
BANKING
POLICE भरती
पात्रता (Eligibility)-
संस्था | पात्र विद्यार्थी |
Sarthi | मराठा,कुणबी,,कुणबी-मराठा,मराठा-कुणबी |
Mahajyoti | OBC/SBC/VJ/NT |
BARTI | Sheduld Cast |
TARTI | Sheduld Tribes |
AMRUT | EWS ( Open) |

मिळणाऱ्या सवलती(Benefits)-
- Stipend ( One Time + Per Mont ) (वेळोवेळी संस्थेमार्फत निश्चित केला जाईल )
- मोफत Coaching
- Physical Training (पोलीस भरती )
- Test Series
Stipend Amount –
- One Time -(10-12,000)
- Per mont- 10,000
(वरील रक्कम संबंधित संस्थांमार्फत वेळोवेळी निश्चित केली जाईल.)
निवड प्रक्रिया कशी असेल?
मिळणाऱ्या Scholarship साठी प्रथम संबंधित संस्थांमार्फत जाहिरात प्रसिद्ध केली जाईल व मुलांना अर्ज करण्यासाठी ठराविक कालावधी उपलब्ध करून दिला जाईल. त्यानंतर संबंधित संस्थांमार्फत CET द्वारे विद्यार्थ्यांची निवड केली जाईल.
निवड झालेल्या विद्यार्थ्यांना त्यांना त्यांच्या इच्छेनुसार Coaching Centre निवडण्यासाठी Link ओपन करून दिली जाईल.त्यानंतर निवड झालेल्या Coaching Centre मध्ये विद्यार्थ्यांचे प्रशिक्षण सुरू होईल. प्रशिक्षणाचा कालावधी वेळोवेळी संबंधित संस्थांमार्फत निश्चित केला जाईल.
लागणारी कागदपत्रे (Documents)-
- Passport size photo
- Scanned Signature
- 10वी,12 वी, पदवी प्रमाणपत्र
- Domicile Certificate
- Aadhar card
- Caste certificate
- Cast validiti certificate
- Income Certificate
Coaching centre( ठिकाण)-
Pune, Delhi ( For UPSC )व संबंधित संस्था मार्फत वेळोवेळी निश्चित केला जाईल.
Coaching कालावधी (Duration)-
वरील संस्थांनी (Scholarship – Sarthi/ Mahajyoti/ BARTI/TRTI/ AMRUT)परीक्षांसाठी वेगवेगळा कालावधी निश्चित केला आहे. त्या त्या परीक्षा नुसार संस्थांनी (6 Month -12 month) असा कालावधी निश्चित केला आहे. हा कालावधी संस्था वेळोवेळी निश्चित करतात, व त्यात बदल करतात. प्रसिद्ध होणाऱ्या जाहिरातीत संबंधित परीक्षांचा कालावधी दिलेला असतो.