pmsvanidhi-yojana-50000-loan;नमस्कार मित्रांनो , आज आपण एका अशा योजनेविषयी माहिती घेणार आहोत ज्यामध्ये केंद्र शासनाने जे रस्त्यावर स्वतःचा व्यवसाय किंवा एखादा विक्री व्यवसाय करतात त्यांच्यासाठी आहे . आणि असा खूप मोठा वर्ग देशामध्ये आहे , त्यांच्यासाठी ही एक खूप आनंदाची बातमी आहे . रस्त्यावरील विक्रेते जसं की फळ विक्रेते , चहा वाले , पाणीपुरीवाले किंवा फेरीवाले यांच्यासाठी केंद्र शासनाने प्रधानमंत्री स्वनिधी योजना
ही एक मोठी योजना सुरू केली आहे . केंद्र शासनाने कोरोनाच्या काळात फेरीवाल्यांना आधार देण्यासाठी 2020 मध्ये ही योजना सुरू केली व ती आजही रस्त्यावरील छोट्या व्यावसायिकांना मदत करत आहे .
या योजनेमध्ये तुम्ही जर फेरेवाली किंवा रस्त्यावरील विक्रेते असाल तर ,फक्त आधार कार्डच्या जोरावर ₹50,000 पर्यंत कर्ज घेऊ शकता, आणि तेही कोणत्याही गॅरंटीशिवाय! ही योजना तुमच्या व्यवसायाला नवं बळ देईल आणि तुम्हाला आत्मनिर्भर बनवेल. या योजनेचा मुख्य उद्देश आहे रस्त्यावरील विक्रेत्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करणं. कोविड-19 मुळे अनेक छोटे व्यावसायिक अडचणीत आले होते, आणि त्यांना पुन्हा उभं राहण्यासाठी सरकारने ही योजना आणली.
या योजनेमध्ये तुम्हाला पहिल्या टप्प्यामध्ये तुमचा व्यवसाय सुरू करण्यासाठी ₹10,000, दुसऱ्या टप्प्यात ₹20,000, आणि तिसऱ्या टप्प्यात ₹50,000 पर्यंत कर्ज मिळू शकतं. विशेष म्हणजे, हे कर्ज घेण्यासाठी फक्त आधार कार्ड आणि मोबाइल नंबर पुरेसा आहे. यात जास्त कागदपत्रांची गरज नाही, आणि तुम्ही तुमच्या व्यवसायासाठी बियाणे, सामान किंवा नवीन उपकरणं घेऊ शकता. आतापर्यंत या योजनेने 66 लाखांहून अधिक विक्रेत्यांना लाभ दिला आहे, आणि 2025 मध्येही ती प्रभावीपणे सुरू आहे.
योजनेसाठी आवश्यक पात्रता
कर्ज मिळवण्यासाठी तुम्ही रस्त्यावरील विक्रेते असणं गरजेचं आहे, जसं की फेरीवाले, खाद्यपदार्थ विक्रेते, किंवा छोटे दुकानदार. तुम्ही 24 मार्च 2020 पूर्वी शहरी भागात व्यवसाय करत असाल, तर तुम्ही पात्र आहात. याशिवाय, तुमच्याकडे आधार कार्ड आणि बँक खातं असणं आवश्यक आहे.
अर्ज करण्यासाठी तुम्हाला pmsvanidhi.mohua.gov.in या अधिकृत पोर्टलवर जाऊन नोंदणी करावी लागेल . किंवा तुम्ही जवळच्या बँक, कॉमन सर्व्हिस सेंटर (CSC), किंवा स्थानिक पालिकेत देखील अर्ज करू शकता . अर्ज करत असताना तुम्हाला आधार कार्ड, मोबाइल नंबर, आणि व्यवसायाचा तपशील द्यावा लागेल. त्यामुळे ही माहिती सोबत ठेवा . अर्ज मंजूर झाल्यानंतर कर्जाची रक्कम थेट तुमच्या बँक खात्यामध्ये जमा केली जाईल . जर तुम्ही पहिल्या टप्प्यातील कर्ज वेळेत परत केले तर तुम्हाला दुसऱ्या टप्प्यावर कर्ज सहज मिळेल .
या योजनेचा खास फायदा म्हणजे ती कोणतीही गॅरंटी मागत नाही. याशिवाय, तुम्ही वेळेवर कर्ज फेडलंत, तर तुम्हाला 7% व्याज सवलत देखील मिळते देखील मिळते .जी थेट तुमच्या खात्यात जमा होते. घेतलेल्या कर्जाची परत फेड ही 12 महिन्यांच्या हप्त्यांमध्ये करायची आहे, ज्यामुळे तुमच्यावर जास्त ताण येत नाही. 2025 मध्ये या योजनेसाठी सरकारने ₹1,752 कोटींची तरतूद केली आहे, ज्यामुळे अधिक विक्रेत्यांना लाभ मिळेल.तर ही योजना तुमच्या व्यवसायाला नवं बळ देईल. यामुळे तुम्ही तुमचं दुकान वाढवू शकता, नवीन उत्पादनं आणू शकता, किंवा डिजिटल पेमेंट सिस्टम सुरू करू शकता.
या योजनेच्या लाभ घेण्यासाठी तुमचं आधार कार्ड बँक खात्याशी आणि मोबाइल नंबरशी लिंक असणं गरजेचं आहे. जर नसेल, तर जवळच्या बँकेत किंवा पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन ही प्रक्रिया पूर्ण करा. तुम्ही जर रस्त्यावरील विक्रेते असाल तर ही योजना तुमच्यासाठी खूप उपयुक्त आहे . कारण यामुळे तुम्ही तुमच्या व्यवसायाला एक नवी दिशा देऊ शकत . आतापर्यंत या योजनेने लाखो विक्रेत्यांना स्वावलंबी बनवलं आहे. जर तुम्ही पात्र असाल, तर त्वरित अर्ज करा. जवळच्या बँकेत, पालिकेत किंवा CSC सेंटरला भेट द्या आणि कर्जासाठी नोंदणी करा .