इलेक्ट्रिक स्कूटर घेणार? आधी वाचा ही मोठी बातमी! सरकारची मोठी मदत!pm-e-drive-electric-scooter-subsidy-2025

pm-e-drive-electric-scooter-subsidy-2025 आपण सर्वजण जाणतो की पेट्रोल व डिझेलच्या वाहनांमुळे मोठ्या प्रमाणावर प्रदूषण होते . प्रदूषण कमी करण्यासाठी सरकार विविध योजना राबवत असते , शासकीय पातळीवर असो किंवा इतर ठिकाणी सरकार इलेक्ट्रिक गाड्या वापरण्यास जनतेला प्रोत्साहित करत असते . त्यामुळे इलेक्ट्रिक वाहने आता फक्त भविष्य नाही तर आजची गरज बनले आहेत .भारत सरकार असो किंवा राज्य सरकार असो पीएमई ड्राईव्ह (PM E-Drive Scheme ) सारख्या योजना राबवून इलेक्ट्रिक टू व्हीलर वाहन खरेदीला प्रोत्साहन देत आहे . याचा दुहेरी उद्देश म्हणजे जनतेला इलेक्ट्रिक गाड्या वापरून प्रदूषण कमी करणे व पेट्रोल डिझेल सारख्या इंधनावरती खर्च होणारा पैसा वाचवणे . यासाठी ही योजना खूप महत्त्वाची योजना आहे .

या योजनेचा उद्देश

या योजनेमध्ये सरकार इलेक्ट्रिक स्कूटर खरेदी करण्यासाठी त्यावर दहा हजार रुपये पर्यंत अनुदान देते . ज्यामुळे ग्राहकांना स्वस्त किमतीत इलेक्ट्रिक वाहने मिळतात .ही योजना खरंतर FAME-II ची पुढची पायरी आहे.1 ऑक्टोबर 2024 पासून सुरू झालेली PM E-Drive Scheme मार्च 2026 पर्यंत चालेल, आणि यात इलेक्ट्रिक 2 व्हीलर आणि 3 व्हीलरसाठी अनुदान दिले जाते . ही योजना सुरू करण्यामागे सरकारचा उद्देश आहे हवेचं प्रदूषण कमी करणं आणि इलेक्ट्रिक वाहनांचा वापर वाढवणं. ही योजना सामान्य माणसासाठी खूप फायदेशीर आहे, कारण यामुळे तुम्ही स्वस्तात इलेक्ट्रिक वाहन घेऊ शकता आणि पेट्रोलचा खर्चही वाचवू शकता. या योजनेसाठी सरकारने 10,900 कोटी रुपये मंजूर केले आहेत. याशिवाय, देशभरात 88,500 नवीन चार्जिंग स्टेशन उभारण्याचंही लक्ष्य यात ठेवण्यात आला आहे .

या योजनेअंतर्गत मिळणारे फायदे

या योजनेत इलेक्ट्रिक 2 व्हीलर खरेदीवर तुम्हाला पहिल्या वर्षी 5,000 रुपये प्रति किलोवॅट तास (kWh) बॅटरी क्षमतेच्या आधारावर अनुदान मिळेल, पण जास्तीत जास्त 10,000 रुपये.दुसऱ्या वर्षी हे अनुदान 2,500 रुपये प्रति kWh पर्यंत कमी होईल, आणि कमाल 5,000 रुपये मिळतील.

जो तुम्ही आता लगेचच इलेक्ट्रिक स्कूटर घेतली तर तुम्हाला 10,000 रुपयांची सूट मिळू शकते.

कोणते नागरिक या योजनेसाठी पात्र आहेत

या योजनेचा लाभ हा कोणत्याही भारतीय नागरिकाला घेता येतो , ज्याला इलेक्ट्रिक टू व्हीलर खरेदी करायची इच्छा आहे अशा प्रत्येकाला हा लाभ मिळतो . तुम्हाला फक्त सरकारच्या अधिकृत पोर्टलवर नोंदणी करावी लागेल. अर्ज करताना आधार कार्ड, वाहन खरेदीची पावती, आणि बँक खात्याचा तपशील जोडावा लागेल. विशेष म्हणजे, आता अनुदानाची रक्कम 5 दिवसांतच तुमच्या खात्यात जमा केली जाते . कारण सरकारने ही प्रक्रिया अगदी जलद केली आहे .

या योजनेचा सर्वात मोठा फायदा म्हणजे तुमचा खरेदीचा खर्च कमी होतो. इलेक्ट्रिक 2 व्हीलरवर फक्त 5% GST लागतो, आणि त्यामुळे किंमत आणखी कमी होते. याशिवाय, इलेक्ट्रिक वाहनांचा मेंटेनन्स खर्च देखील खूप कमी आहे व पेट्रोलचे पैसे पूर्णपणे वाचतातच .जर तुम्ही दररोज 30-40 किमी प्रवास करत असाल, तर इलेक्ट्रिक स्कूटरमुळे तुमचे पैसे आणि वेळ दोन्ही वाचतील. शिवाय, तुम्ही पर्यावरणासाठीही योगदान द्याल, कारण यामुळे कार्बन उत्सर्जन कमी होईल.

त्यामुळे आजच्या काळात इलेक्ट्रिक टू व्हीलर घेणे हा फक्त पैशांचा विचार नाही तर पर्यावरण आणि भविष्याच्या अर्थव्यवस्थेचा सुद्धा विचार आहे . इलेक्ट्रिक वाहनांना चार्जिंग करताना लोकांना अडचणी येऊ नये म्हणून सरकार चार्जिंग स्टेशनची संख्या देखील वाढवत आहे . व ही स्कूटर जास्त दिवस टिकावी म्हणून बॅटरी तंत्रज्ञानावर ही प्रयत्न सुरू आहेत . त्यामुळे जर तुम्ही नवीन स्कूटर किंवा बाइक घेण्याचा विचार करत असाल, तर ही योजना तुमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे .त्वरित सरकारच्या अधिकृत पोर्टलवर जा, तुमची पात्रता तपासा, आणि अर्ज करा. व ही संधी गमावू नका .

Leave a Comment

Index