नमो शेतकरी निधी योजना  सातवा हप्ता  कधी येणार ? का होतोय विलंब , जाणून घ्या सविस्तर माहिती !namo-shetkari-yojana-satva-hapta-kadhi-yenar

namo-shetkari-yojana-satva-hapta-kadhi-yenar;महाराष्ट्र शासन किंवा केंद्र शासन  शेतकऱ्यांसाठी विविध कल्याणकारी योजना राबवत असते , त्याचा मुख्य उद्देश  शेतकऱ्यांना  शेती करण्यासाठी     आर्थिक मदत देणे  व शेतीसाठी थोडा हातभार लावणे  हा असतो .  हा उद्देश समोर  ठेवून केलेली  योजना म्हणजे नमो शेतकरी  महा सन्मान निधी योजना . याद्वारे  पात्र शेतकऱ्यांना  त्यांना  शेतीसाठी लागणारी  बी बियाणे  खरेदी करण्यासाठी असो किंवा इतर कामासाठी असो  शासनाद्वारे  दरवर्षी  रुपये हजार दिले जातात .  याच योजनेचा  सातवा हप्ता  कधी येणार  याविषयी  शेतकऱ्यांच्या मनात अनेक शंका  अस्तित्वात आहेत , तरी या लेखांमध्ये . आपण याविषयी संपूर्ण माहिती पाहू .

   केंद्र शासन  पात्र शेतकऱ्यांना  जसे  पीएम   योजनेद्वारे  दरवर्षी सहा हजार रुपये देते  त्याच धर्तीवर ,आधारावर  महाराष्ट्र शासन सुद्धा  पात्र शेतकऱ्यांना  नमो शेतकरी योजनेद्वारे  दरवर्षी रुपये सहा हजार  देत असते . त्यामुळे आता महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना  आता दुहेरी  लाभ मिळतो म्हणजे  केंद्र शासनाचे 6000 व राज्य शासनाचे 6000 असे मिळून पूर्ण  वर्षाला बारा हजार रुपये  मिळतात . त्यामुळे  ही योजना शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची योजना  ठरत आहे  व  त्याच योजनेच्या सातव्या हप्त्याबद्दल अजून कोणतीच  ऑफिशियल  किंवा अधिकृत  माहिती शासकीय स्तरावर जाहीर केलेली नाही . त्यामुळे  शेतकऱ्यांच्या मनात  सातव्या हफ्त्याविषयी  अनेक शंका निर्माण होत आहेत , जसे की हप्ता  कधी येणार ?, हप्ता येण्यास  विलंब का होत आहे ?.

जे शेतकरी  नमो  शेतकरी महासन्मान निधी योजनेची आतुरतेने वाट पाहत आहेत अशा शेतकऱ्यांसाठी  एक महत्त्वाची बातमी  अशी आहे की   हा सातवा हप्ता येण्यास  कदाचित शासनाकडून विलंब होऊ शकतो . शासकीय स्तरावर  महाराष्ट्र शासनाद्वारे अजून कोणतीही अधिकृत तारीख , वेळ जाहीर केलेली नाही  त्यामुळे   हा हप्ता कधी शेतकऱ्यांच्या बँक  खात्यामध्ये जमा होणार  याबाबत कोणीच स्पष्ट काही सांगू शकत नाही . त्यामुळे शेतकऱ्यांना आणखी काही दिवस  वाट पाहावी लागणार आहे .

 नमो शेतकरी  योजनेच्या सातव्या हप्त्यासाठी का विलंब होत आहे ?  

  गेल्या काही महिन्यांत सहावा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाला होता. त्यानंतर आता सातव्या हप्त्याची प्रतीक्षा सुरू आहे. सामान्यतः प्रत्येक हप्ता चार महिन्यांच्या अंतराने दिला जातो. त्यामुळे आता सातवा हप्ता मिळायला हवा, असं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे.

आतापर्यंत  जमा झालेले  सहा  हप्ते  पाहिले असता  साधारण  अशी पद्धत राहिली आहे की  केंद्र शासनाच्या  पीएम किसान  योजनेचा  हप्ता मिळाल्यानंतर  किंवा बँक खात्यात  जमा झाल्यानंतर साधारणता थोड्या दिवसांनी राज्य  शासन देखील  नमो शेतकरी योजनेचा हप्ता  शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करत असते .  साधारणता  नऊ ते दहा दिवसांनी  नमो योजनेचा हप्ता  जमा होतो . दोन ऑगस्टला  केंद्र शासनाच्या पीएम किसान योजनेचा हप्ता  देशभरातील शेतकऱ्यांच्या खात्यात  वितरित  केला आहे .त्यानुसार पाहता  ऑगस्ट महिन्याच्या  दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवड्यात नमो शेतकरी योजनेचा  सातवा हप्ता  जमा होण्याची  शक्यता  वर्तवली जात होती .पण  सध्या पी एम किसान योजनेचा  विसावा हप्ता  जमा झाला आहे परंतु अद्यापही  राज्य शासनाकडून  नमो शेतकरी योजनेबाबत  कोणतीही अधिकृत माहिती  जाहीर केलेली नाही . कारण  या योजनेसाठी लागणारा  निधी  अद्याप मंजूर झालेला  नसण्याची शक्यता वर्तवली जात आहे . शासनाद्वारे या नीतीला मंजुरी मिळाल्याशिवाय पुढील प्रक्रिया करता  येणे शक्य नाही .

 हा हप्ता जमा होण्यासाठी  आवश्यक असलेल्या काही तांत्रिक बाबी देखील अपूर्ण असल्याचे  समोर येत आहे , जसे की निधी हस्तांतरण  करण्यापूर्वी  महत्त्वाची जी प्रक्रिया असते  , ती म्हणजे  एफ टी ओ (FTO) किंवा  आर एफ टी एस (RFTS)   ची निर्मिती  अधिकृत वेबसाईटवर निर्मिती होणे आवश्यक असते  तीही अद्याप झालेले नसल्यामुळे  हा हप्ता येण्यास विलंब लागणार  असल्याचे स्पष्ट दिसत आहे .

या सर्व बाबी पूर्ण झाल्याशिवाय  नमो शेतकरी  योजनेचा सातवा हप्ता मिळणे अशक्य आहे . त्यामुळे इतर समाज माध्यमांवर  हा हप्ता बैलपोळा सणापूर्वी   जमा होण्याची  शक्यता वर्तवली जात होती पण  ती बाब सध्या अशक्य वाटत आहे . त्यामुळे  ज्या क्षणी सरकारकडून  निधीला मंजुरी दिली जाईल त्यावेळी  हा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा केला जाईल .

शेतकऱ्यांमध्ये संभ्रम का आहे?

शेतकऱ्यांमध्ये  सातव्या हप्त्याविषयी   संभ्रमाचे मुख्य कारण म्हणजे सरकारकडून आजपर्यंत अधिकृत कोणतीही माहिती  प्रसिद्ध केलेली नाही . पावसाळी अधिवेशनात या योजनेसाठी अतिरिक्त निधीची तरतूद   झालेली नाही अशी माहिती देखील काही माध्यमात ून समोर आली आहे  त्यामुळे हप्ता नेमका कधी जमा होणार याची खात्रीशीर तारीख सांगता येत  नाही .

  अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांनी काय करावे ?

 जोपर्यंत शासकीय स्तरावर कोणतीही अधिकृत माहिती प्रसिद्ध केले जात नाही  तोपर्यंत इतर कोणत्याही समाज माध्यमांवरील तारखांवर  विश्वास ठेवू नये  . ज्या दिवशी शासन अधिकृत जीआर द्वारे  माहिती देईल  तीच तारीख   पैसे जमा होण्याची  अधिकृत तारीख असेल . तोपर्यंत शेतकऱ्यांनी  आपापल्या  बँकेत जाऊन  आपल्या बँक खात्याविषयी  सर्व बाबी पूर्ण असल्याची खात्री करून घेणे . जसे की  आपल्या बँक खात्याची केवायसी प्रक्रिया पूर्ण आहे का ?  ते तपासून पाहणे  जर नसेल तर  ताबडतोब ती पूर्ण करून घेणे . जर तुमच्या खात्यात  पीएम किसान योजनेची पैसे जमा झाले नसतील  तर  लगेचच शासकीय स्तरावर त्याची कारणे तपासून घ्या व त्या बाबी पूर्ण करून घ्या कारण जर पी एम किसान योजनेचे पैसे जमा झाले नसतील  तर नमो शेतकरी योजनेचे पैसे जमा होईल त्यासाठी देखील  अडथळे येऊ शकतात .

तुम्ही अधिकृत वेबसाईटवर जाऊन  देखील तुमच्या खात्यावरच्या बेनिफिशरी स्टेटस तपासून    शकता .  अधिकृत वेबसाईटवर जा व मोबाईल नंबर किंवा आधार क्रमांक वापरून  लॉगिन करा  व बेनिफिशरी स्टेटस एकदा तपासून घ्या  जर काही अडचणी येत असतील तर स्थानिक तलाठी कार्यालय किंवा कृषी अधिकारी  यांच्याशी हेल्पलाइन नंबर  वर संपर्क साधा .

Leave a Comment

Index