घरबसल्या जमिनीचा नकाशा मोबाईलवर मिळवा – महाराष्ट्र शासनाची नवी सुविधा;maharashtra jaminicha naksha mahabhunakasha

maharashtra jaminicha naksha mahabhunakasha;प्रत्येकाला कोणत्या ना कोणत्या करण्यासाठी जमिनीचा नकाशा असो किंवा प्लॉटचा नकाशा असो त्याची गरज भासत असते , व त्यासाठी प्रत्येक वेळी सरकारी कार्यालयात जाणे व अर्ज करून नकाशा मिळवणे ही खूप वेळ खाऊ व खर्चिक बाब होती . ही गरज लक्षात घेता महाराष्ट्र शासनाने शेतकऱ्यांना किंवा प्लॉट धारकांना त्यांच्या जमिनीचा नकाशा कमी वेळात व त्यांच्या मोबाईलवर उपलब्ध करून देण्यासाठी महाभूनकाशा (Mahabhunakasha )पोर्टल सुरू केले आहे . या पोर्टलच्या साह्याने शेतकऱ्यांना अगदी कमी वेळात व कोणत्याही सरकारी कार्यालयात फेरफटका न मारता मोबाईलवर त्याच्या शेताचा नकाशा डाऊनलोड करता येणार आहे . या लेखात आपण तो नकाशा कसा डाऊनलोड करायचा व कोणकोणत्या गोष्टी आवश्यक आहेत याविषयी सविस्तर माहिती पाहू .

काय आहे महाराष्ट्र शासनाचे महाभूनकाशा पोर्टल?

महाभूनकाशा पोर्टल हा महाराष्ट्र शासनाचा एक महत्त्वाचा उपक्रम आहे . या पोर्टल द्वारे संपूर्ण राज्यभरातील जमीन मोजणी ची माहिती , गावनिहाय जमीन फेरफार केल्याची माहिती , व प्रत्येकाच्या सर्वे नंबर नुसार नकाशे उपलब्ध करून दिले आहेत . हे पोर्टल सुरू करण्यामागे शासनाचा प्रमुख उद्देश असा आहे की जमिनीचे पारदर्शक माहिती नागरिकांना सहज व कमी खर्चात उपलब्ध करून देणे .

महाभूनकाशा पोर्टल द्वारे तुम्हाला तुमच्या जमिनीचा नकाशा , सर्वे नंबर नुसार तपशीलवार माहिती , तुमच्या प्लॉटचा आकार , मोजमाप सीमा याची माहिती , तुमच्या गट नंबर व सातबारा उताऱ्याची जुळणारा नकाशा असो किंवा जमिनीचा फेरफार केल्याचा तपशील असो या सर्व बाबी या पोर्टलवर मिळणार आहेत .

या पोर्टल द्वारे नकाशा डाऊनलोड करण्यासाठी आवश्यक बाबी

महाभूनकाशा पोर्टल द्वारे ऑनलाईन नकाशा डाऊनलोड करण्यासाठी तुमच्याकडे जसे की सातबारा उताऱ्यावरील सर्वे नंबर किंवा तुमच्या जमिनीचा गट नंबर , तुमचा जिल्हा म्हणजे ज्या जिल्ह्यात तुमची जमीन आहे तो , त्या जमिनीचा तालुका व गाव इत्यादी बाबी आवश्यक आहेत .

आपल्या जमिनीचा नकाशा महाभूनकाशा पोर्टलवरून कसा डाऊनलोड करायचा ?

सर्वप्रथम तुम्ही महाराष्ट्र शासनाच्या महाभूनकाशा पोर्टल वर जा यासाठी ऑफिशियल वेबसाईट – https://mahabhunakasha.mahabhumi.gov.in आहे . किंवा तुम्ही गुगल प्ले स्टोअर वरून महाभूनकाशा App देखील डाऊनलोड करू शकता. त्यानंतर तुम्ही या वेबसाईटवर लोकेशन या पर्यायावर जाऊन तेथील आवश्यक माहिती भरून घ्या जसे की तुमची कॅटेगरी असेल ग्रामीण किंवा शहरी . त्यानंतर ज्या जिल्ह्यात तुमची जमीन आहे तो जिल्हा व तालुका निवडा .

नंतर तुम्हाला तुमचा गट क्रमांक टाकावा लागतो त्यासाठी तिथे दिलेल्या search by plot पर्यावर क्लिक करा व तुमचा गट क्रमांक टाकून द्या . एंटर बटन क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमच्या जमिनीचा किंवा प्लॉटचा नकाशा पाहायला मिळेल .

त्याच स्क्रीनवर plot info पर्यावरण क्लिक करून तुम्ही त्या जमिनीची सर्व माहिती तपासू शकता जसे की जमिनीच्या मालकाचे नाव , जमिनीचे एकूण क्षेत्रफळ , तुमचा गट नंबर व इतर तपशील सर्व बसू शकता . तिथे दिलेल्या डाउनलोड पर्यायावर क्लिक करून तुम्ही तो नकाशा तुमच्या मोबाईल मध्ये किंवा कम्प्युटरमध्ये डाऊनलोड करून घेऊ शकता .

ऑनलाईन जमिनीचा नकाशा काढण्याचे फायदे

ही प्रक्रिया अगदी सोपी आणि जलद होणारी असल्यामुळे तुम्हाला कार्यालयात फेऱ्या मारण्याची गरज नाही त्यामुळे तुमच्या वेळेची व पैशाची बचत होते . ही प्रक्रिया शासनाद्वारे सुरू केली असल्यामुळे याद्वारे तुम्हाला मिळणारी माहिती ही पारदर्शक व अगदी खरी असते . या प्रक्रियेमुळे तुम्हाला तुमचे कायदेशीर व्यवहार सोपे व जलद होतात . व ही सुविधा तुम्हाला घरबसल्या सुद्धा अनुभवता येते .

महाभूनकाशाशी संबंधित महत्वाची व लेटेस्ट माहिती (2025 Update)

महाराष्ट्र शासन सतत पोर्टल अपडेट करत असते . सध्या शासनाद्वारे या वेबसाईटवर E-KYC लिंकिंग प्रक्रिया व 7/12 उतारा, आणि महाभूनकाशा नकाशा एकत्रितपणे पाहण्याची सुविधा सुरू झाली आहे. तसेच आता नागरिकांना मोबाइल OTP Verification द्वारे थेट प्लॉटचा नकाशा डाउनलोड करता येणार आहे . सरकारने आता ग्रामीण व शहरी भागातील नकाशांचे एकत्रीकरण केले आहे त्यामुळे नागरिकांना यांच्या प्लॉटचा किंवा घराचा नकाशा सहज पाहता येईल .


या पोर्टलवरून जमिनीचा नकाशा डाऊनलोड करत असताना तुमच्या गट नंबर किंवा प्लॉट नंबर बरोबर असल्याची खात्री करा व मगच त्याची पीडीएफ डाउनलोड करून ठेवा .

महाराष्ट्र शासनाचा हा नवीन उपक्रम शेतकऱ्यांसाठी व जमीन मालक आणि सर्वसामान्य नागरिकांसाठी अत्यंत उपयुक्त ठरत आहे . लोकांना आपली जमीन ओळखणे तिच्या सीमांची खात्री करणे आणि त्यांचे इतर कायदेशीर व्यवहार जलद करण्यासाठी प्रक्रिया अत्यंत उपयुक्त ठरत आहे. जर तुम्हाला तुमच्या जमिनीचा नकाशा डाऊनलोड करायचा असेल तर वरील दिलेल्या माहितीनुसार तुम्ही लगेच डाऊनलोड करून घ्या .

Leave a Comment

Index