आता लाडक्या बहिणींना थेट १ लाखाचं कर्ज – तेही शून्य टक्के व्याजावर!” बहिणींना व्यवसायासाठी सरकारची मोठी भेट!ladki-bahin-yojana-0-interest-loan-2025

ladki-bahin-yojana-0-interest-loan-2025;महिलांना स्वावलंबी बनवण्यासाठी व त्यांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी महाराष्ट्र शासन विविध योजना राबवत असते . त्यातलीच एक सर्वात महत्त्वाची व लोकप्रिय ठरलेली योजना म्हणजे मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना . ही योजना आता फक्त मासिक आर्थिक मदत इतक्यापर्यंतच मर्यादित राहिली नसून शासन विविध स्तरावर या योजनेत पात्र असणाऱ्या महिलांना स्वतःचा व्यवसाय करण्यासाठी वेगवेगळ्या माध्यमातून कर्ज उपलब्ध करून देत आहे . यामुळे महिला सक्षमीकरण आणखीन चांगल्या रीतीने राबवले जाईल व महाराष्ट्रातील बहिणी खऱ्या अर्थाने स्वावलंबी बनतील .

या योजनेअंतर्गत आता मुंबई बँकेकडून शून्य टक्के व्याज दराने एक लाख रुपये पर्यंत कर्ज उपलब्ध करून दिले जात आहे . ज्याचा उपयोग करून महिला स्वतःचा व्यवसाय सुरू करू शकतील . व त्यांचं उद्योजक होण्याच स्वप्न पूर्ण करू शकतील .मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही महाराष्ट्र सरकारने २८ जून २०२४ रोजी सुरू केली. याअंतर्गत २१ ते ६५ वयोगटातील पात्र महिलांना दरमहा १,५०० रुपये थेट त्यांच्या बँक खात्यात जमा होतात. पण आता या योजनेला एक नवी जोड मिळाली आहे. मुंबई बँकेने योजनेच्या लाभार्थ्यांसाठी शून्य टक्के व्याजदराने कर्जाची सुविधा आणली आहे, ज्यामुळे महिलांना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी आर्थिक पाठबळ मिळत आहे .

या कर्जाद्वारे महिला छोटा व्यवसाय जसे की शिवणकाम, किराणा दुकान, किंवा हस्तकला, यासाठी खूप उपयुक्त ठरू शकतो. ही योजना सध्या मुंबईपुरती मर्यादित आहे, पण भविष्यात ती राज्यभर विस्तारली जाऊ शकते.

या योजनेतून कर्ज कसं मिळतं?

हे कर्ज मुंबई बँकेद्वारे दिले जाते , यासाठी मुंबई बँकेने खास व्यवस्था केलेली आहे .या योजनेत महिलांना १ लाख रुपयांपर्यंत कर्ज मिळू शकतं, आणि विशेष म्हणजे यावर व्याजाचा कोणताही भार पडणार नाही. ह्या कर्जावरील व्याजाची रक्कम न भराव लागण्याचे महत्त्वाचे कारण म्हणजे राज्यातील चार प्रमुख महामंडळ या कर्जावरील व्याज बँकेला भरतील .यामध्ये पर्यटन महामंडळाची ‘आई योजना’, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ, भटके विमुक्त महामंडळ, आणि ओबीसी महामंडळ यांचा समावेश आहे. ही महामंडळं कर्जावरील ९ ते १२ टक्के व्याजाची रक्कम बँकेला परत करतील, त्यामुळे महिलांना कर्जाची परतफेड करताना फक्त मूळ रक्कमच भरावी लागेल. यामुळे आता महिलांना व्यवसाय करणे खूपच सोपे झाले आहे .

कर्ज मिळवण्यासाठी काय करावं लागेल?

सर्वप्रथम, तुम्ही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी असणं गरजेचं आहे. यासाठी तुमचं वय २१ ते ६५ दरम्यान असावं, तुम्ही महाराष्ट्रातील रहिवासी असावं, आणि तुमच्या कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न २.५ लाख रुपयांपेक्षा कमी असावं. जर तुम्ही या योजनेच्या लाभार्थी असाल, तर मुंबई बँकेत कर्जासाठी अर्ज करू शकता. या योजनेचा फायदा सध्या मुंबईतल्या सुमारे १२ ते १३ लाख महिलांना होत आहे. मुंबई बँकेने सांगितलं की, या योजनेचा उद्देश महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करणं आणि त्यांना उद्योजक बनवणं आहे.जर तुम्ही मुंबईत राहणाऱ्या लाभार्थी असाल, तर ही संधी सोडू नका. मुंबई बँकेत जा, कर्जासाठी अर्ज करा, आणि तुमचा व्यवसाय सुरू करा. ही योजना तुम्हाला स्वावलंबी बनवण्यासाठी आहे, आणि याचा फायदा घेऊन तुम्ही तुमचं आणि कुटुंबाचं भविष्य उज्ज्वल करू शकता.

Leave a Comment

Index