योजनेचा उद्देश:
AMRUT Typing Scheme मार्फत महाराष्ट्र राज्यातील खुल्या प्रवर्गातील जे विद्यार्थी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेची शासकीय संगणक टंकलेखन बेसिक कोर्स प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण होतील त्यांना 6,500 एक रकमे मिळणार आहेत . तसेच जे विद्यार्थी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेची ऑनलाईन लघुलेखन परीक्षा उत्तीर्ण होतील त्यांना रु 5,300 मिळणार आहेत. या लेखांमध्ये आपण या योजनेविषयी पात्रता, अटी कागदपत्रे अशी सर्व माहिती पाहणार आहोत.
पात्र विद्यार्थी-
खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही स्वतंत्र शासकीय विभाग / संस्था / महामंडळा मार्फत समकक्ष योजनाचा लाभ मिळत नाही, अशा खुल्या प्रवर्गातील अमृतच्या लक्षीत गटातील जातींचा, आर्थिकदृष्टया दुर्बल घटकांतील विद्यार्थी, युवक, युवती जे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या शासकीय संगणक टंकलेखन बेसिक कोर्स प्रमाणपत्र परीक्षा (GCC-TBC) व ऑनलाईन लघुलेखन परीक्षा उत्तीर्ण झालेले आहेत असे उमेदवार.
इतर आवश्यक पात्रता
- अमृत संस्थेमार्फत वेळोवेळी सर्वसाधारण लाभार्थी निकष जाहीर केले जातील त्याची पूर्तता करणे बंधनकारक असेल.
- लाभ घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनी याआधी इतर कोणत्याही संस्थेकडून प्रोत्साहन पर अर्थसहाय्य घेतलेले नसावे , तसे त्याबाबतचे स्वयंघोषणापत्र व संस्था चालकांचे प्रमाणपत्र सादर करावे.
- अर्जदाराने महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या (MSCE) शासकीय संगणक टंकलेखन बेसिक कोर्स प्रमाणपत्र परीक्षा (GCC-TBC) व ऑनलाईन लघुलेखन परीक्षा उत्तीर्ण झालेल्या निकालाची प्रत स्वस्वाक्षरीत प्रत सादर करावी.
- महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या शासनमान्य टंकलेखन संस्थेमध्ये अभ्यासक्रमांसाठी जमा केलेल्या फी / शुल्काची स्वस्वाक्षरीत (Self-attested) पावती जोडावी लागेल.
- उमेदवाराच्या वैयक्तिक आधार संलग्न बँक खात्याचा तपशिल (बँकेचे नाव, शाखा, खाते क्रमांक, IFSC कोड) व रद्द केलेल्या चेकची प्रत जोडणे गरजेचे आहे.

या योजनेअंतर्गत मिळणारे लाभ
- अर्जदार हा महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेची शासकीय संगणक टंकलेखन बेसिक कोर्स प्रमाणपत्र परीक्षा (GCC-TBC) (कॉम्पुटर टायपिंग मराठी / हिंदी, इंग्रजी ४०, ५० व ६० शब्द प्रति मिनिट) उत्तीर्ण होतील त्यांना एकरकमी रक्कम रु.६,५००/- अर्थसहाय्य दिले जाईल.
- जो अर्जदार महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेची ऑनलाईन लघुलेखन (मराठी / हिंदी ६०, ८०, १०० व १२० शब्द प्रति मिनिट तसेच, इंग्रजी लघुलेखन ६०, ८०, १००, १२०, १३०, १४०, १५० व १६० शब्द प्रति मिनिट) परीक्षा उत्तीर्ण होतील त्यांना एकरकमी रक्कम रु.५,३००/- अर्थसहाय्य अर्थसहाय्य मिळेल.
- पात्र विद्यार्थ्यांना अमृत संस्थेमार्फत मिळणारा लाभ हा त्यांच्या आधार संलग्न बँक खात्यात थेट जमा केला जाईल.
- या व्यतिरिक्त कोणतेही शुल्क लाभासाठी मिळणार राहणार नाही.
ऑनलाईन अर्ज प्रक्रिया
पात्रता निकषांची पूर्तता करणाऱ्या विद्यार्थ्यांनी अमृत संस्थेच्या ऑफिशियल वेबसाईटवर जाऊन अर्ज सादर करावा.
ऑफिशियल वेबसाईट- https://www.mahaamrut.org.in/

सर्व कागदपत्रांची पूर्तता करा, आवश्यक त्या ठिकाणी स्वयंघोषणापत्र अपलोड करा.
तुम्ही केलेल्या अर्जाची एक प्रत व त्यासोबत जोडलेली कागदपत्रे दिलेल्या मुदतीत अमृतच्या पुणे येथील कार्यालयास पाठविणे आवश्यक राहील.
अधिक माहितीसाठी अमृत संस्थेच्या वेबसाईटला भेट द्या.