aaple sarkar portal whatsapp 236 new services;महाराष्ट्र शासन नागरिकांना विविध सेवा पूर्वत असते . ज्याच्या मुख्य उद्देश नागरिकांना सहज सरकारी सेवांचा लाभ मिळवून देणे हा असतो . त्याच दृष्टिकोनातून महाराष्ट्र शासनाने 2015 मध्ये सुरू केलेल एक पोर्टल म्हणजे आपले सरकार पोर्टल होय . हे पोर्टल म्हणजे महाराष्ट्र सरकारचे ई-गव्हर्नन्सच्या दृष्टिकोनातून एक महत्त्वाचे पाऊल आहे . हे पोर्टल सुरू करण्यामागे नागरिकांना घरबसल्या सरकारी सेवा पुरवणे व त्यांना सहकारी कार्यालयात मारायला लागणाऱ्या चक्रा कमी करणे हा होता .” तुमचे सरकार , तुमच्या दारी ” अशी टॅगलाईन घेऊन सुरू झालेले हे पोर्टल महाराष्ट्र इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी कॉर्पोरेशन लिमिटेड ने विकसित केले होते .
या पोर्टलवर सरकारच्या विविध खात्यातील 1000 पेक्षा जास्त सेवा उपलब्ध आहेत . ज्यामध्ये उत्पन्नाचा दाखला काढायचा असेल , जात प्रमाणपत्र , अधिवास प्रमाणपत्र, पोलीस क्लिअरन्स सर्टिफिकेट यासारख्या व अशाच भरपूर सेवांचा समावेश या पोर्टलमध्ये करण्यात आला आहे. या पोर्टलचा उद्देश म्हणजे नागरिकांना पारदर्शक , कार्यक्षम आणि वेळेत सेवा पुरवणे , ज्यामुळे कागदी कामकाज कमी करून व मध्यस्थ्यांची गरज कमी करून नागरिकांना जलद सेवा पुरवणे हा आहे .
आपले सरकार पोर्टलच्या माध्यमातून नागरिक आपल्या मोबाईल किंवा कॉम्प्युटर वरून त्यांना हवे असणाऱ्या सेवांसाठी अर्ज करू शकतात व त्यासाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे अपलोड करू शकतात आणि त्यांच्या अर्ज स्थिती तपासू शकतात . याशिवाय राईट टू सर्विसेस( RTS ) अंतर्गत या पोर्टल द्वारे नागरिकांना वेळेत सेवा मिळण्याची हमी देखील दिली जाते . आतापर्यंतचे ही प्रगती पाहता या पोर्टलने आणखीन एक नवीन पाऊल टाकले आहे आता शासन या सर्व सेवा नागरिकांना व्हाट्सअप वर उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे . त्यासोबतच या सेवांमध्ये आणखीन 236 सेवांची भर पडली आहे यामुळे नागरिकांना आणखी सुलभता मिळणार आहे .
महाराष्ट्र शासनाने आपले सरकार पोर्टल ला व्हाट्सअप सोबत जोडण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे . ही सुविधा 2025 मध्ये सुरू झाली असून . नागरिकांना आता त्यांच्या मोबाईलवरील व्हाट्सअप द्वारे सरकारी सेवा मिळणे शक्य होणार आहे. या नव्या उपक्रमामुळे नागरिकांना पोर्टलवर लॉगिन करण्याची गरज नाही ते फक्त आता एक मेसेज पाठवून त्यांना हवी असणारी , सेवा मागू शकतात , त्यासाठी आवश्यक असणारी कागदपत्रे अपलोड करू शकतात आणि त्यांच्या अर्जाची स्थिती देखील तपासू शकतात . ही सुविधा विशेषतः ग्रामीण भागातील नागरिकांसाठी वरदान ठरणार आहे जिथे इंटरनेट कनेक्टिव्हिटी आणि डिजिटल साक्षरता मर्यादित आहे .
ही सेवा सुरळीत पार पाडण्यासाठी महाराष्ट्र शासनाने एक असा व्हाट्सअप चॅटबोट विकसित केला आहे , जो आपले सरकार पोर्टलची संलग्न आहे .हा चॅटबॉट मराठी हिंदी व इंग्रजी यासारख्या भाषांमध्ये उपलब्ध त्यामुळे सर्व नागरिक या सेवेचा फायदा घेऊ शकतील . या नव्या सुविधेमुळे डिजिटल महाराष्ट्राच्या दिशेने एक मोठे पाऊल टाकले गेले आहे , विशेष म्हणजे व्हाट्सअप हे एक भारतात सर्वाधिक प्रमाणात वापरले जाणारे मेसेजिंग ॲप आहे आणि त्याचा वापर करून शासकीय सेवा जलद गतीने पुरवणे हा एक नावीन्यपूर्ण उपक्रम आहे .
236 नवीन सेवांची भर
आपले सरकार पोर्टलवर आताआपले सरकार पोर्टलवर आता शासनाने अजून 236 नवीन सेवांचा समावेश केला आहे ज्यामुळे एकूणच सेवांची संख्या ही 1200 च्या वर गेली आहे . या नवीन सेवांमध्ये खालील गोष्टींचा समावेश आहे .
- शैक्षणिक प्रमाणपत्रे: डुप्लिकेट मार्कशीट, डिग्री सर्टिफिकेट, आणि शैक्षणिक सत्यापन.
- कृषी आणि ग्रामीण सेवा: शेतकऱ्यांसाठी अनुदान अर्ज, पीक विमा, आणि माती परीक्षण सेवा.
- उद्योग आणि व्यवसाय: MSME नोंदणी, परवाने, आणि व्यवसायाशी संबंधित प्रमाणपत्रे.
- सामाजिक कल्याण: अपंगत्व प्रमाणपत्र, वृद्धापकाळ निवृत्तीवेतन अर्ज, आणि विधवा पेन्शन योजना.
- पर्यावरण आणि वन विभाग: वृक्षतोड परवाना, आणि पर्यावरण परवानगी.
- नागरी सेवा: पाणीपुरवठा कनेक्शन, मालमत्ता कर, आणि नगरपालिका सेवा.
महाराष्ट्र शासनाचा हा उपक्रम डिजिटल इंडिया आणि मेक इन इंडिया सारख्या केंद्र सरकारच्या योजनांशी सुसंगत आहे . भविष्यात आपले सरकार पोर्टलवर आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि मशीन लर्निंग यांचा वापर करून आणखी प्रगत सेवा देण्याची योजना आहे .महाराष्ट्र शासनाचे आपले सरकार पोर्टल आणि त्याची व्हॉट्सअॅपशी जोडणी हा डिजिटल गव्हर्नन्समधील एक क्रांतिकारी बदल आहे. 236 नवीन सेवांच्या समावेशामुळे आणि व्हॉट्सअॅपच्या सुलभतेमुळे नागरिकांना आता सरकारी सेवा मिळवणे अधिक सोपे आणि जलद झाले आहे. हा उपक्रम केवळ वेळ आणि पैशाची बचत करत नाही, तर शासकीय प्रक्रियांमध्ये पारदर्शकता आणि कार्यक्षमता आणतो.