परिचय (Introduction)
प्राइम मिनिस्टर इंटर्नशिप स्कीम 2025 ही देशातील 21 ते 24 वयोगटातील तरुणांना कौशल्य वाढवण्यासाठी 24 विविध क्षेत्रातील उच्च कंपनीमध्ये इंटर्नशिप उपलब्ध देण्यासाठी सुरू केलेली योजना आहे या योजनेत महिन्याला पाच हजार रुपये मानधन स्वरूपात दिली जाईल. देशात कौशल्याधारित रोजगार वाढ करण्यासाठी केंद्र शासनाचा हा एक पायलट प्रोजेक्ट आहे.
या लेखात आपण प्रधानमंत्री इंटर्नशिप योजना विषयी संपूर्ण माहिती बघणार आहोत, पात्रता, वयाची अट, मानधन, अर्ज कसा करायचा, अधिकृत वेबसाईट अशी सर्व माहिती आपण पाहू.
प्राईम मिनिस्टर इंटर्नशिप स्कीम म्हणजे काय?
केंद्र शासनाने देशातील तरुणांना 12 महिन्यांकरिता भारतातील उच्च 500 कंपन्यांमध्ये इंटर्नशिप योजना जाहीर केली होती . ज्याचा उपयोग तरुणांना त्यांचे कौशल्य सुधारण्यात व कामाचा प्रत्यक्ष अनुभव घेण्यात होईल. ज्यामुळे त्याच्या ज्ञानात भर पडून त्याची उच्चार रोजगार क्षमता निर्माण होईल
प्राईम मिनिस्टर इंटर्नशिप इंटर्नयोजनेचा उद्देश काय आहे?
देशातील तरुणांना भारतातील मोठ्या 500 कंपन्यांमध्ये इंटर्नशिप करण्याची सुविधा उपलब्ध करून देणे.
या इंटर्नशिप द्वारे त्यांची कौशल्य क्षमता वाढवण्यास मदत करणे.
त्यांना दर महिन्याला थोडी रक्कम स्टायपेंड स्वरूपात देणे.
कौशल्य आधारित रोजगार वाढीस चालना देणे.
या योजनेअंतर्गत येत्या पाच वर्षात सुमारे1 कोटी युवकांना प्रशिक्षण देण्याची ही योजना आहे.
या योजनेअंतर्गत कोण अर्ज करू शकतो? (पात्रता व अटी)
शैक्षणिक पात्रता(Edjucational Qualification)
- जे विद्यार्थी 10 किंवा12 उत्तीर्ण आहेत ते विद्यार्थी,
- ज्या विद्यार्थ्यांनी ITI आयटीआय केला आहे ते विद्यार्थी,
- ज्या विद्यार्थ्यांनी पॉलिटिकल डिप्लोमा ( Political Diploma )पूर्ण केला आहे,
- पदवीधर पात्रता- ज्या विद्यार्थ्यांनी BA /BSC /B com / BBA /BCA /B. Pharm या शाखेत पदवी प्राप्त केली आहे ते विद्यार्थी पात्र असतील.

योजनेसाठी वयाची अट काय असेल?
फॉर्म भरण्याच्या तारखेपर्यंत ज्या विद्यार्थ्यांचे वय 21 ते 24 या वयोगटात बसत असेल ते विद्यार्थी या पीएम इंटर्नशिप योजनेसाठी पात्र असतील.
इतर पात्रता व अटी
- या योजनेअंतर्गत अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांचे वार्षिक कौटुंबिक उत्पन्न आठ लाखापेक्षा जास्त नको.
- अर्ज करण्यापूर्वी आधी कोणत्या कंपनीत जर नोकरी केली असेल तर अर्ज करता येणार नाही.
- जर विद्यार्थ्यांच्या संबंधित कुटुंबातील कोणी सरकारी नोकरीत असेल तरीही अर्ज करता येणार नाही.
पीएम इंटर्नशिप योजनेचा कालावधी काय असेल?
ही योजना सुरू झाल्यापासून 12 महिन्यांसाठी असेल. विद्यार्थ्यांना संपूर्ण बारा महिने संबंधित कंपनीमध्ये इंटर्नशिप करता येईल व स्वतःच्या कौशल्यामध्ये वाढ करता येईल.. ही एक स्टुडंट्स साठी इंटर्नशिप योजना असून यात कोणत्याही प्रकारच्या नोकरीची हमी नाही. व संबंधित कालावधी संपल्यानंतर कोणत्याही परिस्थितीत कालावधी वाढवून मिळणार नाही
अर्ज करण्याची प्रक्रिया (Application Process)
अधिकृत वेबसाईट वेबसाईट व अर्ज प्रक्रिया
नोंदणी करण्यासाठी अधिकृत वेबसाईट –https://pminternship.mca.gov.in/login/
संबंधित वेबसाईटवर जाऊन नवीन नोंदणी पर्यायावर क्लिक करून सर्व आवश्यक माहिती भरा.

आवश्यक कागदपत्रे
- आधार कार्ड
- पॅन कार्ड
- ई-मेल आयडी
- आधार कार्ड सोबत लिंक असलेला मोबाईल नंबर
- रेशन कार्ड
- ऍड्रेस प्रूफ
पीएम इंटर्नशिप स्कीम फायदे आणि संधी (Benefits & Opportunities)
- भारतातील उच्च 500 कंपन्यांमध्ये वास्तविक कामाचा अनुभव व कौशल्य संपादनास प्रोत्साहन.
- प्रत्येक महिन्याला 5000 मासिक भत्ता
- सुरुवातीच्या वेळी रुपये 6000 एक वेळा अनुदान
- इंटरशिप संपताना त्यांना अनुभव पत्र किंवा संबंधित कामाचे सर्टिफिकेट दिले जाईल, याचा उपयोग त्यांना पुढील कंपन्यांमध्ये नोकरी मिळवण्यासाठी होऊ शकतो.
- पंतप्रधान जीवन ज्योती विमा योजना आणि प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना अंतर्गत विमा संरक्षण.
योजना संबंधित ताज्या अपडेट्स आणि महत्त्वाची माहिती मिळवण्यासाठी या ग्रुपला जॉईन व्हा- इथे क्लिक करा
निष्कर्ष (Conclusion)
देशातील तरुणांत कौशल्य आधारित रोजगार वृद्धी करण्यासाठी भारत सरकार इंटर्नशिप सुरू करत आहे. ज्याचा देशासाठी व तरुणांसाठी खूप मोठा फायदा होणार आहे.