Mazi ladki Bahin;माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा झालेत का नाही (Payment Status)कसे तपासावे ?-Latest Update

महाराष्ट्र सरकारने महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी माझी लाडकी बहीण योजना सुरू केली आहे, जी राज्यातील पात्र महिलांना दरमहा 1500 रुपये आर्थिक मदत प्रदान करते. या योजनेचा लाभ घेण्यासाठी लाखो महिलांनी अर्ज केले असून, अनेकांच्या बँक खात्यात पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे. परंतु, काही महिलांना पेमेंट स्टेटस तपासण्यात अडचणी येत आहेत. या लेखात, आम्ही तुम्हाला माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा झाले का नाही हे तपासण्यासाठी ऑनलाइन पोर्टल, मोबाइल ॲप, आणि इतर मार्गांद्वारे चरणबद्ध प्रक्रिया सविस्तरपणे समजावून सांगू.

Mazi ladki Bahin;माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा झालेत का नाही (Payment Status)कसे तपासावे ?

नमस्कार मित्रांनो मित्रांनो लाडकी बहीण योजने अंतर्गत महिलांच्या बँक खात्यावरती तीन टप्प्यांचे पैसे हे जमा झालेले आहेत .मित्रांनो बऱ्याचश्या महिलांचे मोबाईल नंबर हे त्यांच्या बँक खात्याला लिंक नसल्यामुळे त्यांना त्यांच्या लाडकी बहीण योजनेचे पैसे हे जमा झाले किंवा नाही याबाबतचा एसएमएस हा येत नाही आणि त्यामुळे त्यांचे बँकेत त्यांचे पैसे जमा झाले किंवा नाही हे त्यांना समजत नाही तसेच मित्रांनो बऱ्याचश्या महिलांचा मोबाईल नंबर लिंक असून देखील बऱ्याच वेळा सर्वरचा प्रॉब्लेम असल्यामुळे त्यांना देखील बऱ्याच वेळा पैसे जमा झाल्याबाबतचा मेसेज हा येत नाही त्यामुळे अशा महिलांना समजत नाही की त्यांचे पैसे हे आले किंवा नाही. तर आता तुम्ही घरी बसूनच तुमच्या मोबाईल वरून दोन मिनिटात चेक करू शकता की तुमचे लाडकी बहीण योजनेचे पैसे हे आले किंवा नाही ,तसेच कोणत्या बँकेत जमा झाले हे सुद्धा तुम्ही चेक करू शकता .

लाडकी बहीण योजनेचे पैसे हे तुमच्या बँक खात्यावरती जमा झाले किंवा नाही हे घरी बसूनच दोन मिनिटात कशा पद्धतीने चेक करायचं आहे याबाबत जाणून घेऊया. तर लाडकी बहीण योजनेचे पैसे हे तुमच्या बँक खात्यावरती जमा झाले किंवा नाही हे जर तुम्हाला घरी बसून चेक करायचं असेल तर त्यासाठी तुमच्या मोबाईल वरती किंवा जर तुमच्याकडे कॉम्प्युटर असेल तर कॉम्प्युटर वरती क्रोम ब्राउजर मध्ये गुगल ओपन करून घ्यायचा आहे तर या ठिकाणी सर्च मध्ये तुम्हाला आधार कार्ड किंवा आधार कार्ड लॉगिन किंवा आधार कार्ड डाउनलोड अशा पद्धतीने कुठलाही एक शब्द तुम्ही या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे . अशा पद्धतीने सर्च केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला माय आधार नावाचा जे ऑप्शन दिसतंय याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे माय आधार या पर्यायावरती क्लिक केल्याबरोबर आपल्यासमोर आधार कार्डची एक वेबसाईट ओपन होणार आहे. तुम्ही त्या ठिकाणी डायरेक्ट या साईट वरती येऊ शकता या साईट वरती आल्यानंतर मित्रांनो या ठिकाणी माय आधार नावाचा जो वरती तुम्हाला ऑप्शन दिसत आहे तर त्याच्यावरती क्लिक करायचं आहे त्याच्यावरती क्लिक केल्याबरोबर आपल्यासमोर बरेचशे ऑप्शन या ठिकाणी तुम्हाला दिसतील.

 तर “बँक सीडिंग” स्टेटस नावाचा जो ऑप्शन तुम्हाला या ठिकाणी दिसत आहे ,त्याच्यावरती क्लिक करायचं आहे बँक सीडिंग स्टेटस नावाच्या ऑप्शन वरती क्लिक केल्याबरोबर लॉगिन नावाचा जो ऑप्शन दिसतोय आणि खाली या ठिकाणी तुम्हाला भाषा चेंज करण्यासाठी पर्याय दिसत आहेत तुम्हालाकुठलीही भाषा निवडता येऊ शकते.  

लॉगिन या पर्यायावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे लॉगिन या पर्यायावरती क्लिक केल्याबरोबर या ठिकाणी तुम्हाला तुमच्या आधार कार्डचा नंबर टाकून घ्यायचा आहे .आधार कार्डचा नंबर टाकल्यानंतर खाली जो काही तुम्हाला कॅप्चा दिसतोय हा कॅप्चा जशाचा तसा या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे आधार नंबर आणि कॅप्चा टाकून झाल्यानंतर खाली तुम्हाला लॉगिन विथ ओटीपी हा जो पर्याय दिसतोय त्या पर्यायावरती क्लिक करायचं आहे.

लॉगिन विथ ओटीपी पर्यायावरती क्लिक केल्याबरोबर तुमच्या आधार कार्डला जो काही मोबाईल नंबर लिंक असेल त्या मोबाईल नंबर वरती एक ओटीपी पाठ पाठवला जाईल तर तो ओटीपी तुम्हाला या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे.

 ओटीपी टाकून झाल्यानंतर लॉगिन नावाचा जो पर्याय आहे त्याच्यावरती क्लिक करायचं आहे लॉगिन पर्याय वरती क्लिक केल्याबरोबर आपल्या समोर या ठिकाणी बरेचशे ऑप्शन हे ओपन होतील तर या ठिकाणी आता आपल्याला काय चेक करायचं आहे की आपल्या बँक खात्यावरती पैसे आले किंवा नाही तसेच कोणत्या बँक खात्यावरती पैसे आलेले आहेत तर यासाठी तुम्हाला या ठिकाणी “बँक सीडिंग”स्थिती अशा पद्धतीने जो पर्याय दिसतोय याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे.

 बँक सीडिंग स्थिती या पर्यायावरती क्लिक केल्याबरोबर या ठिकाणी खाली तुमचा आधार क्रमांकाचे शेवटचे चार अंक तुम्हाला दिसणार आहेत त्याच्यानंतर या ठिकाणी तुमच्या आधार कार्ड सोबत कोणते बँक लिंक आहे ते बँकेचे नाव तुम्हाला या ठिकाणी दिसणार आहे आणि या ठिकाणी बँक शेडिंग स्थिती जी आहे ती या ठिकाणी सक्रिय या अशा पद्धतीने तुम्हाला दिसणार आहे. आणि खाली तुमचे बँक आधार कोणत्या तारखेला लिंक झालेले आहे ती तारीख सुद्धा तुम्हाला या ठिकाणी दिसणार आहे .

तर याचा अर्थ असा आहे की या ठिकाणी जी पण तुमची बँक दाखवत असेल त्या बँकेत तुमचे पैसे हे जमा झालेले आहेत आणि या ठिकाणी जी काही तारीख आहे ती तारीख तुमची आधार लिंक करण्याची जी आहे ती जर एक महिना किंवा दीड महिन्या अगोदरची असेल तर 100% तुमच्या बँक खात्यावरती लाडकी बहीण योजनेचे पैसे हे जमा झालेले आहेत आणि कोणत्या बँकेत झालेले आहेत तर या ठिकाणी जी पण बँक तुम्हाला दाखवत असेल तर त्याच बँकेत तुमच्या लाडकी बहीण योजनेचे सर्व पैसे हे जमा झालेले आहेत .अशा पद्धतीने तुम्हाला या ठिकाणी चेक करायचं आहे .

परंतु जर समजा मित्रांनो या ठिकाणी चेक केल्यानंतर तुमचं स्टेटस हा “नो बँक रेकॉर्ड इज फाउंड फॉर धिस आधार नंबर” अशा पद्धतीने जर दाखवत असेल आणि या ठिकाणी तुमचा आधार नंबर दाखवत असेल आणि या ठिकाणी कुठल्याही प्रकारची बँक दाखवणार नाही आणि इनॅक्टिव्ह अशा पद्धतीने दाखवत असेल तर मात्र तुम्हाला तुमच्या बँकेत जाऊन तुमचे आधार कार्ड तुमच्या बँक खात्याला लिंक करून घेणे खूप महत्त्वाचे आहे कारण की असे जर दाखवत असेल तर तुमचे लाडकी बहीण योजनेचे पैसे हे तुमच्या बँक खात्यात जमा झालेले नाहीत .

त्यामुळे तुमच्या लाडकी बहीण योजनेचे पैसे तुम्हाला घेण्यासाठी ऍक्टिव्ह दाखवणे म्हणजेच अशा पद्धतीने सक्रिय दाखवणे हे खूप महत्त्वाचे आहे तरच तुम्हाला या ठिकाणी लाडकी बहीण योजनेचे पैसे हे जमा झालेले असतील आणि ज्या बँकेचे नाव या ठिकाणी दिलेले असेल त्याच बँकेत तुमचे पैसे हे जमा झाले असतील.

 परंतु जर अशा पद्धतीने दाखवत असेल तर मात्र तुमचे पैसे अजून जमा झालेले नाहीयेत आणि तुम्हाला या ठिकाणी एक महत्त्वाचे काम करायचे आहे आणि ते म्हणजे तुमच्या बँक खात्याला आधार कार्ड लिंक करून घेणे .

१. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊन

. अधिकृत वेबसाइटद्वारे पेमेंट स्टेटस तपासणे

अधिकृत वेबसाइट (ladakibahin.maharashtra.gov.in) ही पेमेंट स्टेटस तपासण्यासाठी सर्वात विश्वसनीय आणि सोपी पद्धत आहे. खालील चरणांचे अनुसरण करा:

  1. वेबसाइटला भेट द्या:
    • तुमच्या ब्राउझरमध्ये ladakibahin.maharashtra.gov.in उघडा.
    • मुख्यपृष्ठावर “Applicant Login” किंवा “Track Application” पर्याय निवडा.
  2. लॉगिन करा:
    • तुमचा मोबाइल क्रमांक किंवा आधार क्रमांक टाका.
    • OTP प्राप्त करा आणि लॉगिन पूर्ण करा. जर तुम्ही यापूर्वी नोंदणी केली नसेल, तर “Register” पर्यायावर क्लिक करून नोंदणी करा.
  3. अर्जाची स्थिती तपासा:
    • लॉगिन केल्यानंतर, “Application Status” किंवा “Payment Status” पर्याय निवडा.
    • तुमचा अर्ज क्रमांक किंवा आधार क्रमांक टाका.
    • स्क्रीनवर तुमच्या अर्जाची सद्यस्थिती दिसेल, ज्यात Approved, Pending, Rejected, किंवा Payment Transferred अशी माहिती असेल.
  4. पेमेंट तपशील पहा:
    • जर पेमेंट जमा झाले असेल, तर बँक खाते, जमा तारीख, आणि रक्कम यांचा तपशील दिसेल.
    • जर पेमेंट बाकी असेल, तर “Pending” किंवा “In Review” अशी स्थिती दिसेल.

टीप: तुमचे बँक खाते आधारशी लिंक असणे आवश्यक आहे. जर लिंक नसेल, तर पेमेंट येण्यास विलंब होऊ शकतो.

2.नारीशक्ती दूत ॲपद्वारे पेमेंट स्टेटस तपासणे

नारीशक्ती दूत ॲप हे माझी लाडकी बहीण योजनेचे पेमेंट स्टेटस तपासण्यासाठी आणि अर्ज भरण्यासाठी डिझाइन केलेले आहे. खालील चरणांचे पालन करा:

तुमच्या अर्जाची आणि पेमेंटची स्थिती स्क्रीनवर दिसेल.

ॲप डाउनलोड करा:

Google Play Store वरून नारीशक्ती दूत ॲप डाउनलोड करा.

ॲप इन्स्टॉल केल्यानंतर, तुमचा मोबाइल क्रमांक वापरून नोंदणी करा.

लॉगिन प्रक्रिया:

ॲपमध्ये OTP-आधारित लॉगिन करा.

“माझी लाडकी बहीण योजना” पर्याय निवडा.

पेमेंट स्टेटस तपासा:

“Check Application Status” किंवा “Payment Status” पर्यायावर क्लिक करा.

तुमचा अर्ज क्रमांक किंवा आधार क्रमांक प्रविष्ट करा.

हे पण वाचा

3.Online Help desk आणि टोल-फ्री नंबर

शासनाने ज्यांना त्यांच्या अर्जा विषयी, योजनेविषयी, पैसे जमा झालेत की नाही याविषयी किंवा आणि कोणतीही तक्रार असो अशा सर्व तक्रारींचे जलद निवारण करण्यासाठी हेल्थ डिस्को व टोल फ्री नंबर ची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. त्यावर संपर्क साधून तुम्ही तुमच्या शंकांचे निरसन करू शकता.

4.एसएमएस द्वारे तपासणी

शासनाच्या संबंधित विभागाद्वारे कधी कधी पैशाबद्दल ची स्थिती एसएमएस स्वरूपात पाठवले जाते. तुमच्या नोंद असणाऱ्या मोबाईल नंबर वर तुम्हाला माहिती मिळू शकते.

योजना संबंधित ताज्या अपडेट्स आणि महत्त्वाची माहिती मिळवण्यासाठी या ग्रुपला जॉईन व्हा- इथे क्लिक करा

5.राज्याच्या संबंधित कार्यालयात भेट देऊन

  • जर तुम्हाला ऑनलाइन पद्धती वापरणे शक्य नसेल, तर खालील ऑफलाइन मार्गांचा अवलंब करा:
  • बँक शाखेला भेट द्या:
    • तुमच्या बँक शाखेत जाऊन तुमच्या खात्यात DBT मार्फत पैसे जमा झाले आहेत का, हे तपासा.
    • तुमचे आधार कार्ड आणि पासबुक सोबत घ्या.
  • अंगणवाडी केंद्र किंवा सेतू सुविधा केंद्र:
    • तुमच्या जवळच्या अंगणवाडी केंद्र किंवा सेतू सुविधा केंद्र येथे भेट द्या.
    • तुमचा अर्ज क्रमांक आणि आधार क्रमांक देऊन पेमेंट स्टेटस तपासण्यास सांगा.
  • हेल्पलाइन क्रमांक:
  • 181 या अधिकृत हेल्पलाइन क्रमांकावर कॉल करा.
  • तुमचा अर्ज क्रमांक आणि आधार क्रमांक देऊन पेमेंट स्टेटसबद्दल माहिती घ्या.

माझी लाडकी बहीण योजनेचे पेमेंट स्टेटस तपासणे आता ऑनलाइन पोर्टल आणि नारीशक्ती दूत ॲप मुळे खूप सोपे झाले आहे. वर नमूद केलेल्या चरणबद्ध प्रक्रियेचे पालन करून तुम्ही तुमच्या खात्यात पैसे जमा झाले आहेत की नाही, हे सहज तपासू शकता. जर तुम्हाला काही अडचण येत असेल, तर हेल्पलाइन क्रमांक 181 वर संपर्क साधा. ही योजना तुमच्या आर्थिक स्वावलंबनासाठी आहे, त्यामुळे याचा पूर्ण लाभ घ्या आणि नियमितपणे पेमेंट स्टेटस तपासत रहा.

महाराष्ट्र माझी लाडकी बहिन योजना : पैसे आले नसतील तर काय करावे?- click here

[helpie_faq group_id=’22’/]

Leave a Comment

Index