भारतात आधार कार्ड, मतदान ओळखपत्र याप्रमाणेच रेशन कार्ड सुद्धा एक महत्त्वाचे दस्तऐवज, ओळखपत्र म्हणून उपयोगात येते. त्यामुळे आपल्या देशात रेशन कार्ड हे फक्त अन्नधान्य मिळवण्याचे साधन राहिले नसून तो कुटुंबाची व इतर माहिती ठेवणारा एक महत्त्वाचा पुरावा देखील आहे. केंद्र शासन व राज्य शासन देशातील नागरिकांसाठी विविध अन्नसुरक्षा योजना राबवत असते ज्याचा उद्देश हा देशाचा किमान पोषणात्मक दर्जा टिकवून ठेवणे असा असतो.त्यामुळे देशातील गरीब जनतेला स्वस्त दरात अन्नधान्य मिळते.
योग्य त्या व्यक्तीपर्यंत मदत पोहोचावे व कोणीही या योजनेपासून वंचित राहू नये, या योजनेत होणारा गैरप्रकार रोखला जावा, पारदर्शकता यावी यासाठी शासनाने रेशन कार्ड ई -केवायसी (E-KYC)करणे बंधनकारक केले आहे. या लेखामध्ये आपण घरबसल्या रेशन कार्ड ची ई-केवायसी कशी करायची,रेशन कार्ड आधार कार्डशी कसे लिंक करावे याबद्दल सर्व माहिती पाहू.
रेशन कार्ड ई -केवायसी म्हणजे काय?
ई-केवायसी म्हणजे ‘इलेक्ट्रॉनिक नो युवर कस्टमर’ (Electronic Know Your Customer).याद्वारे तुमच्या रेशन कार्ड ची सर्व माहिती अद्यावत, व बरोबर केली जाते. ज्याचा उपयोग तुम्हाला लवकरात लवकर सरकारी योजनांचा लाभ मिळण्यासाठी, व सरकारला गरजू व्यक्तीपर्यंत मदत पोहोचवण्यासाठी होतो.

रेशन कार्ड ई-केवायसी/ स्टेटस चेक
ऑनलाइन पद्धत
- सर्वप्रथम तुमच्या मोबाईल मध्ये रेशन कार्ड ई -केवायसी करण्यासाठी एप्लीकेशन ( Ration card E-KYC application) डाऊनलोड करा.
- Application चे नाव – मेरा इ के वाय सी (Mera E-KYC)
- एप्लीकेशन ओपन केल्यानंतर मागणाऱ्या कंडिशन्स allow करा व आपल्याला रेशन कार्ड ची face E-KYC फेस करायची आहे.
- त्यासाठी आधार कार्ड चे फेस आरडी एप्लीकेशन (Adhar FaceRD Apllication) इन्स्टॉल करा
- यानंतर परत मेरा ई-केवायसी एप्लीकेशन मध्ये या व तुमचे राज्य निवडा.
- तुमच्या आधार कार्ड नंबर टाका.
- जनरेट ओटीपी बटनावर क्लिक करा, आधार कार्ड लिंक मोबाईल नंबर वर OTP येईल तो verify करा .
- तिथे तुम्हाला तुमच्या रेशन कार्डचा एक एवायसी स्टेटस पाहायला मिळेल. जर स्टेटस अपूर्ण दाखवत असेल तर फेस ई-केवायसी बटनावर क्लिक करून प्रक्रिया पूर्ण करून घ्या.

ऑफलाइन पद्धत
तुम्ही तुमच्या रेशन कार्ड ची ई-केवायसी ऑफलाइन पद्धतीने सुद्धा करू शकता, त्यासाठी सर्वप्रथम तुम्ही तुमच्या जवळच्या स्वस्त धान्य दुकानात जा. संबंधित कर्मचाऱ्यासोबत आवश्यक कागदपत्रांन बाबत चर्चा करा व प्रक्रिया पूर्ण करून घ्या. संबंधित कर्मचारी तुमची ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करून देतील.
रेशन कार्ड ई -केवायसी करण्यासाठी लागणारी कागदपत्रे
- आधार कार्ड
- रेशन कार्ड
- आधार कार्ड सोबत लिंक असलेला मोबाईल नंबर
रेशन कार्ड ई -केवायसी न केल्यास होणारे तोटे
जर तुम्ही तुमच्या रेशन कार्ड ची ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण केली नसेल तर भविष्यात येणाऱ्या सरकारी योजनांच्या लाभापासून तुम्ही वंचित राहू शकता.
जर प्रक्रिया अपूर्ण असेल तर भविष्यात तुम्हाला स्वस्त धान्य दुकानातून धान्य मिळवतानाही अडचणी येऊ शकतील.
रेशन कार्ड वर नाव असणाऱ्या कुटुंबातील प्रत्येक सदस्याला आता ई-केवायसी करणे बंधनकारक असणार आहे.
जर तुम्ही रेशन कार्डचा उपयोग महत्त्वाच्या ठिकाणी ओळखपत्र म्हणून करणार असाल तर त्या ठिकाणी तुम्हाला अडचणी येऊ शकतील.