pmgkay-free-ration-10-new-items-2025;भारतीय कुटुंबात रेशन कार्ड हा एक खूप महत्त्वाचा दस्ताऐवज मानला जातो .व त्याद्वारे मिळणारे विविध हे भारतातील गरीब जनतेसाठी खूप मोलाचे कार्य करतात . आत्ताच रेशन कार्ड असणाऱ्या कुटुंबासाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे ! केंद्र सरकारने प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना (PMGKAY) अंतर्गत जो मोफत रेशन चा लाभ देत होते त्यामध्ये आता मोठा बदल जाहीर केला आहे . आता या योजनेअंतर्गत फक्त गहू आणि तांदूळच नाही तर दहा जीवनावश्यक इतर वस्तू देखील मोफत मिळणार आहे . यामुळे देशातील सोमवारी 81 कोटी गरीब गरजू जनतेला मोठा आधार मिळणार आहे . ही योजना म्हणजे गरीब लोकांसाठी खरंच एक मोठी मदत आहे कारण आता त्यांना रोजच्या जीवनात लागणाऱ्या बऱ्याचशा गोष्टी रेशन दुकानातून मिळतील . ज्याद्वारे लोकांचे आरोग्य आणि पोषण सुधारले जो की या योजनेचा उद्देश आहे .
या योजनेत नव्याने काय आहे ?
PMGKAYही 2020 मध्ये कोविड-19 च्या काळात सुरू करण्यात आली एक खूप मोठी योजना आहे . जिच्या कार्यकाल 2025 मध्ये पाच वर्षासाठी वाढवण्यात आला आहे . आत्तापर्यंत या योजनेमध्ये फक्त तांदूळ व गहू दिले जात होते पण आता सरकारने या योजनेअंतर्गत दहा नवीन जीवनावश्यक वस्तू समावेश करण्याचा निर्णय घेतला आहे . यामुळे सामान्य कुटुंबावरचा आर्थिक भर कमी होईल . काही राज्यांमध्ये जसे की उत्तर प्रदेश बिहार या वस्तू सोबत एक हजार रुपये मासिक आर्थिक मदत ही दिली जात आहे .ही योजना विशेषतः दारिद्र्यरेषेखालील (BPL) आणि अंत्योदय अन्न योजना (AAY) रेशन कार्डधारकांसाठी आहे.
कोणत्या दहा वस्तू मिळणार ?
या योजनेमध्ये आता तांदूळ व गहू सोबत गहू, डाळी, हरभरा, साखर, मीठ, मोहरीचे तेल, मैदा, सोयाबीन, मसाले, आणि दूध पावडर देखील मिळणार आहे . या वस्तूंचा लाभ रेशन कार्डच्या प्रकारानुसार व कुटुंबाच्या गरजेनुसार दिला जाईल .सरकारने या वस्तूंची गुणवत्ता टिकवण्यासाठी कडक नियम केले आहेत, जेणेकरून लाभार्थ्यांना चांगल्या दर्जाच्या वस्तू मिळतील.
या नवीन वस्तूसाठी कोण पात्र आहे ?
ही योजना प्रामुख्याने अंत्योदय अन्न योजना (AAY) आणि प्राधान्य कुटुंब योजना (PHH) साठी जे नागरिक पात्र आहेत किंवा जे रेशन कार्ड धारक पात्र आहे त्यासाठी आहे .यात दारिद्र्यरेषेखालील कुटुंबे, शेतमजूर, अल्पभूधारक शेतकरी, विधवा, आणि दिव्यांग व्यक्तींचा समावेश होतो.जर तुम्ही पिवळे रेशन कार्ड धारक असाल तर तुम्ही या योजनेसाठी पात्र असू शकतात .२०२५ मध्ये सरकारने रेशन कार्ड प्रक्रिया अधिक पारदर्शक आणि जलद केली आहे. जर तुमच्याकडे रेशन कार्ड नसेल तर तुम्ही लगेचच रेशन कार्ड काढण्यासाठी अर्ज करू शकता व या योजनेसाठी अप्लाय करू शकता .
या योजनेचा सर्वात मोठा आणि चांगला फायदा म्हणजे की आता गरीब कुटुंबाला अन्नधान्य आणि इतर आवश्यक वस्तूंसाठी पैसे खर्च करावे लागणार नाहीत . यामुळे त्यांचा मासिक खर्च कमी होईल व त्यांच्या जीवनाला थोडा आर्थिक हातभार लागेल . पण या योजनेचा लाभ घेण्याच्या आधी एक गोष्ट लक्षात ठेवा की तुमच्या रेशन कार्ड ची ई केवायसी पूर्ण असणे आवश्यक आहे , अन्यथा तुम्हाला या योजनेचा लाभ घेता येणार नाही , व तुमचे रेशन कार्ड रद्द होऊ शकते . त्यामुळे जर तुम्ही तुमच्या रेशन कार्ड चीई केवायसी केली नसेल तर लगेचच जवळच्या रेशन दुकानात जाऊन करून घ्या व या योजनेच्या लाभ घ्या .