प्रस्तावना
महिलांना आर्थिक दृष्ट्या सक्षम करण्यासाठी व त्यांना स्वावलंबी बनवण्यासाठी शासन महिलांसाठी कर्ज योजना राबवत असते. ज्या योजनांचा उद्देश असतो की महिलांना कमी दराने कर्ज किंवा अनुदान उपलब्ध करून देणे जेणेकरून महिला त्यांचा छोटा व्यवसाय सुरू करू शकतील व आर्थिक स्वायत्तता प्राप्त करू शकतील. शासनाद्वारे सुरू केलेल्या या महिलांसाठीच्या कर्ज योजनांद्वारे महिला सक्षमीकरण मोठ्या प्रमाणावर घडून येते, व महिला उद्योग क्षेत्रात चांगली प्रगती करू शकतात.
महिलांसाठी उपलब्ध असलेल्या सर्व कर्ज योजनांची यादी
1.अन्नपूर्णा योजना
अन्नपूर्णा योजना ही लघु उद्योगाची संबंधित असून ज्या महिलांना Food Catering Industry मध्ये व्यवसाय करायचा आहे त्यांच्यासाठी सुरु केली आहे. केंद्र सरकार या योजनेमध्ये या क्षेत्राशी संबंधित व्यवसायासाठी संबंधित महिला उद्योजकांना 50 हजार रुपये कर्ज देते. या कर्जाद्वारे महिला त्यांच्या उद्योगासाठी लागणाऱ्या वस्तू खरेदी करू शकतात जसे की भांडी ,शेगडी, फर्निचर इत्यादी… हे कर्ज 36 महिन्यांच्या मुदतीपर्यंत देण्यात येते. व त्यावर बाजार दरानुसार व्याजा आकारण्यात येते. ज्या महिन्यात कर्ज मंजूर होते त्या पहिल्या महिन्याचा हप्ता(EMI) भरावा लागत नाही.
2.महिलांसाठी मुद्रा योजना
महिलांना त्यांचा लघुउद्योग किंवा घरगुती उद्योग यशस्वी रित्या करता यावा, व त्यात त्यांना भासणारी आर्थिक समस्या दूर व्हावी यासाठी केंद्र शासनाने मुद्रा योजना सुरू केली आहे. या योजनेत 50,000 पासून ते 10 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज दिली जाते. हे कर्ज शिशु लोन, किशोर लोन, उतरून लोन अशा भागात विभागले आहेत. – click here
3.प्रधानमंत्री धनलक्ष्मी योजना
देशातील महिलांना स्वावलंबी बनवण्यासाठी व स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी केंद्र सरकार व राज्य सरकार काही योजना राबवत असते, यामुळे महिलांना आर्थिक दृष्ट्या सक्षम बनण्यात मदत होते. त्यापैकी एक प्रधानमंत्री धनलक्ष्मी योजना आहे . या योजनेमध्ये महिलांना स्वतःचा व्यवसाय करण्यासाठी 5 लाख रुपये पर्यंतचे कर्ज मिळते. केंद्र सरकारने 2024 मध्येही योजना सुरू केली होती.-click here
4.उद्योगिनी योजना
केंद्र शासनाने 88 प्रकारच्या लघुउद्योगांच्या व्यवसायाच्या क्षेत्रात महिलांना सक्षम करण्यासाठी ही योजना सुरू केली आहे. ह्या योजनेत पात्रता निकष पूर्ण केलेल्या महिलेला 3 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज मिळते. कर्ज परतफेड करण्यासाठी 3% अनुदानही मिळू शकते. जर तुमचा व्यवसाय कृषी क्षेत्राशी निगडित असेल तर तुम्हाला व्याजमुक्त कर्जही मिळू शकते.-click here

5.ओरिएंट महिला विकास योजना
ज्या महिला कडे तिच्या व्यवसायातील प्रभावी 51% पेक्षा जास्त हिस्सा असेल तर त्या महिलेला तिच्या व्यवसायात 25 लाख रुपयांपर्यंत कर्ज मिळू शकते. या योजनेत कर्जासाठी तारणाची आवश्यकता नसते. 2% पर्यंत व्याज सवलत ही मिळू शकते. हे कर्ज सात वर्षाच्या कालावधीसाठी दिले जाते.
6.देना शक्ती योजना
ही योजना देना बँकेद्वारे महिला उद्योजकांसाठी सुरू केली आहे. या योजनेत महिलांना त्यांचा व्यवसाय वाढवण्यासाठी व्यवसायाला पाठबळ म्हणून परवडणाऱ्या दरात कर्ज दिले जाते. या योजनेत महिलांना गृहनिर्माण, शिक्षण, लघु मध्यम उद्योग क्षेत्रात त्यांचा व्यवसाय सुरु करण्यासाठी , वाढवण्यासाठी कमी दराने 20 लाख रुपये पर्यंतचे कर्ज मिळते. हे कर्ज सात वर्षाच्या कालावधीसाठी दिले जाते.
7.प्रधानमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम(PMEGP)
केंद्र सरकारद्वारे ही योजना ग्रामीण किंवा शहरी भागातील महिलांना स्वयंरोजगारीत व्यवसाय सुरू करण्यासाठी सुरू केलेली आहे. या योजनेत स्वयंरोजगार सुरू करण्यासाठी शिवराज बँकांमार्फत 10 ते 25 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज दिले जाते.- click here
8.महिला समृद्धी योजना
महाराष्ट्र शासनाद्वारे चालवली जाणारी ही एक महत्त्वपूर्ण योजना आहे या योजनेचा उद्देश चर्मकार समाजातील दुर्बल महिलांचे सक्षमीकरण करणे स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यास मदत करणे हा आहे. या योजनेत व्यवसाय सुरू करण्यासाठी कमी व्याजदराने कर्ज दिले जाते.
9.महिला उद्यम निधी योजना
महिलांसाठीची ही योजना भारतीय लघु औद्योगिक विकास बँक (SIDBI) मार्फत राबवली जाते. या योजनेअंतर्गत महिलांना त्यांचे व्यवसाय करण्यासाठी प्रोत्साहन व आर्थिक सहाय्यही दिले जाते. ज्याद्वारे महिलांचा व्यवसाय सुरू करू शकतील.