Mazi Ladki Bahin Yojana April Month 10 th Installment ; 2025/माझी लाडकी बहीण योजना एप्रिल महिन्याचा 10 वा हप्ता   कधी जमा होणार?/Latest update

Share now

महाराष्ट्र शासनाने महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी जी माझी लाडकी बहीण योजना सुरू केली होती तिचा 10 वा हप्ता  म्हणजेच  एप्रिल महिन्याचा हप्ता कधी जमा होणार  याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. त्यावर महिला व बालविकास मंत्री यांनी  दिलेल्या माहितीनुसार एप्रिल महिन्याचे 1500  रुपये कधी जमा होणार याविषयी  माहिती आपण या लेखामध्ये पाहू. 

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरूच राहणार असून प्रत्येक महिन्याला राज्यातील महिलांना 1500  मिळणार असल्याची माहिती मंत्री महोदयांनी दिली.  व त्याचबरोबर  महिन्याचा हप्ता1500  रुपये वरून 2100  कधी होणार यावरही त्यांनी  माहिती दिली आहे.

 लाडकी बहिण योजना  एप्रिल महिन्याचा  हप्ता कधी येणार ? 

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू झाल्यापासून पात्र महिलांच्या बँक खात्यामध्ये आतापर्यंत नऊ हप्ते जमा झाले आहेत. तर माझी लाडकी बहीण योजना एप्रिल महिन्याचा 10 वा हप्ता    एप्रिल महिन्यात मिळणार आहे.

फेब्रुवारी व मार्च महिन्याचा हप्ता  जसा  महिला   दिनाचे औचित्य साधून  वाटप करण्यात आला होता  तसेच एप्रिल महिन्याचा हप्ता हा  श्रीराम नवमी  चे  औचित्य साधून पात्र महिलांच्या खात्यामध्ये जमा  होण्याची शक्यता आहे.त्यामुळे पाच एप्रिल ते 15 एप्रिल कालावधीत पात्र लाडक्या बहिणीच्या खात्यात पैसे जमा होण्याची शक्यता वर्तवण्यात आली  होती, परंतु आता मिळालेल्या माहितीनुसार एप्रिल महिन्याच्या तिसऱ्या किंवा चौथ्या आठवड्यात पैसे जमा होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे

Mazi Ladki Bahin Yojana April Month 10 th Installment ; 2025

लडकी बहीण योजना  हप्ता 2100 रुपये कधी होणार?

 राज्याचे उपमुख्यमंत्री मा. अजित दादा पवार   यांनी दिलेल्या माहितीनुसार , आपण सध्या बहिणींना दरमहा 1500  देतच राहू व परिस्थितीत  सुधारणा झाल्यावर पुढील विचार करण्यात येईल म्हणजेच हप्ता1500  वरून2100  करण्याबाबत विचार केला जाईल. असे वक्तव्य त्यांनी बीड मधील एका कार्यक्रमात  केले.

तर महिला व बाल विकास मंत्री यांनीही हप्ता 1500  वरून 2100   करण्याबाबतच्या विचारावर सध्या काम सुरू आहे ते पूर्ण झाल्यास पुढील घोषणा केल्या जातील. असे जाहीर केले आहे. तर  लाडकी बहीण योजना बंद होणार का यावर त्यांनी महाराष्ट्र शासनाने 2025-26  च्या अर्थसंकल्पात  या योजनेसाठी 36  हजार कोटी रुपयांची तरतूद केली आहे व प्रत्येक महिन्याला पात्र  महिलांच्या खात्यात पैसे जमा केले जातील अशी  माहिती दिली. व योजना  बंद करणार नाही ती कायमस्वरूपी सुरू राहील   असे आश्वासन दिले. 

तर राज्याचे उपमुख्यमंत्री  मा. एकनाथजी शिंदे यांनी, सरकार निवडणूक जाहीरनाम्यात दिलेली सर्व आश्वासने पूर्ण करेल. अशी माहिती दिली.

 या योजनेची संबंधित अधिक माहितीसाठी शासनाच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्या- https://ladakibahin.maharashtra.gov.in/

महिलां साठी लागू असणाऱ्या इतर सर्व कर्ज योजना पाहण्यासाठी इथे क्लिक करा-https://marathiyojanalay.com/mahila-loan-schemes-2025/

योजना संबंधित ताज्या अपडेट्स आणि महत्त्वाची माहिती मिळवण्यासाठी या ग्रुपला जॉईन व्हा- इथे क्लिक करा


Share now

Leave a Comment

Index