महाराष्ट्र शासनाने महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी जी माझी लाडकी बहीण योजना सुरू केली होती तिचा 10 वा हप्ता म्हणजेच एप्रिल महिन्याचा हप्ता कधी जमा होणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. त्यावर महिला व बालविकास मंत्री यांनी दिलेल्या माहितीनुसार एप्रिल महिन्याचे 1500 रुपये कधी जमा होणार याविषयी माहिती आपण या लेखामध्ये पाहू.
महाराष्ट्र लाडकी बहीण योजना ही राज्य सरकारची महिलांसाठीची खूप उपयुक्त योजना आहे. यात पात्र महिलांना दर महिन्याला १,५०० रुपये थेट बँक खात्यात मिळतात . ही योजना २१ ते ६५ वयोगटातील, महाराष्ट्रात कायमस्वरूपी राहणाऱ्या आणि वार्षिक उत्पन्न २.५ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिलांसाठी आहे. विवाहित, विधवा, घटस्फोटीत किंवा अविवाहित महिलांना याचा लाभ मिळतो. यामुळे महिलांना घरखर्चात मदत मिळून आर्थिक स्थैर्य वाढते आणि स्वावलंबी होण्यास हातभार लागतो.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरूच राहणार असून प्रत्येक महिन्याला राज्यातील महिलांना 1500 मिळणार असल्याची माहिती मंत्री महोदयांनी दिली. व त्याचबरोबर महिन्याचा हप्ता1500 रुपये वरून 2100 कधी होणार यावरही त्यांनी माहिती दिली आहे.
लाडकी बहिण योजना एप्रिल महिन्याचा हप्ता कधी येणार ?
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू झाल्यापासून पात्र महिलांच्या बँक खात्यामध्ये आतापर्यंत नऊ हप्ते जमा झाले आहेत. तर माझी लाडकी बहीण योजना एप्रिल महिन्याचा 10 वा हप्ता एप्रिल महिन्यात मिळणार आहे.
फेब्रुवारी व मार्च महिन्याचा हप्ता जसा महिला दिनाचे औचित्य साधून वाटप करण्यात आला होता तसेच एप्रिल महिन्याचा हप्ता हा श्रीराम नवमी चे औचित्य साधून पात्र महिलांच्या खात्यामध्ये जमा होण्याची शक्यता आहे.त्यामुळे पाच एप्रिल ते 15 एप्रिल कालावधीत पात्र लाडक्या बहिणीच्या खात्यात पैसे जमा होण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती, परंतु आता मिळालेल्या माहितीनुसार एप्रिल महिन्याच्या तिसऱ्या किंवा चौथ्या आठवड्यात पैसे जमा होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे

योजना संबंधित ताज्या अपडेट्स आणि महत्त्वाची माहिती मिळवण्यासाठी या ग्रुपला जॉईन व्हा- इथे क्लिक करा
लडकी बहीण योजना हप्ता 2100 रुपये कधी होणार?
राज्याचे उपमुख्यमंत्री मा. अजित दादा पवार यांनी दिलेल्या माहितीनुसार , आपण सध्या बहिणींना दरमहा 1500 देतच राहू व परिस्थितीत सुधारणा झाल्यावर पुढील विचार करण्यात येईल म्हणजेच हप्ता1500 वरून2100 करण्याबाबत विचार केला जाईल. असे वक्तव्य त्यांनी बीड मधील एका कार्यक्रमात केले.
तर महिला व बाल विकास मंत्री यांनीही हप्ता 1500 वरून 2100 करण्याबाबतच्या विचारावर सध्या काम सुरू आहे ते पूर्ण झाल्यास पुढील घोषणा केल्या जातील. असे जाहीर केले आहे. तर लाडकी बहीण योजना बंद होणार का यावर त्यांनी महाराष्ट्र शासनाने 2025-26 च्या अर्थसंकल्पात या योजनेसाठी 36 हजार कोटी रुपयांची तरतूद केली आहे व प्रत्येक महिन्याला पात्र महिलांच्या खात्यात पैसे जमा केले जातील अशी माहिती दिली. व योजना बंद करणार नाही ती कायमस्वरूपी सुरू राहील असे आश्वासन दिले.
तर राज्याचे उपमुख्यमंत्री मा. एकनाथजी शिंदे यांनी, सरकार निवडणूक जाहीरनाम्यात दिलेली सर्व आश्वासने पूर्ण करेल. अशी माहिती दिली.
या योजनेची संबंधित अधिक माहितीसाठी शासनाच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्या- https://ladakibahin.maharashtra.gov.in/
माझी लाडकी बहीण योजना महाराष्ट्र ,पैसे जमा झाले का नाही ते कसे चेक करावे?
माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे आपल्या खात्यात आलेत का नाही हे तपासणं खूप सोपं आहे. सर्वात आधी, तुमचं बँक खातं या योजनेशी जोडलेलं असायला हवं आणि मोबाईल नंबर बँकेत नोंदलेला असायला हवा. पैसे आले की बऱ्याचदा बँकेकडून SMS येतो, पण कधी कधी तो येत नाही, म्हणून खात्री करण्यासाठी तुम्ही जवळच्या ATM मधून मिनी स्टेटमेंट काढू शकता किंवा पासबुक अपडेट करून पाहू शकता.
तसेच, तुम्ही आपल्या बँकेचं मोबाईल बँकिंग अॅप किंवा इंटरनेट बँकिंग वापरूनही व्यवहार तपासू शकता. आणखी एक सोपा मार्ग म्हणजे, जर तुमचं खाते DBT (Direct Benefit Transfer) पोर्टलशी लिंक असेल, तर https://pfms.nic.in या वेबसाइटवर जाऊन “Know Your Payment” पर्यायातून तुमचा आधार क्रमांक किंवा बँक खाते क्रमांक टाकून पैसे जमा झालेत का ते पाहू शकता. काही वेळा सरकारी योजनांचे पैसे जमा होण्यास थोडा उशीर होतो, त्यामुळे एक-दोन दिवसांनी पुन्हा तपासणं चांगलं. जर बराच वेळ झाला आणि पैसे आले नाहीत, तर आपल्या ग्रामपंचायत कार्यालयात, महिला व बालकल्याण विभागात किंवा बँकेत जाऊन चौकशी करावी. अशा पद्धतीने तुम्ही सहज लक्ष ठेवू शकता की लाडकी बहीण योजनेचे पैसे वेळेवर आलेत की नाही.
माझी लाडकी बहीण योजना , पैसे जमा झाले नसतील तर काय करावे?
माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे तुमच्या खात्यात जमा झाले नसतील, तर घाबरण्याचं काही कारण नाही, पण वेळ न घालवता तपासणी सुरू करणं चांगलं. सर्वात आधी तुमचं बँक खातं आणि आधार क्रमांक या योजनेशी योग्यरीत्या लिंक झाले आहेत का, हे बँकेत जाऊन किंवा मोबाईल बँकिंग/पासबुक अपडेट करून तपासा. काही वेळा तांत्रिक अडचणींमुळे किंवा कागदपत्रातील चुकीमुळे पैसे अडकतात. जर बँकेकडून सगळं व्यवस्थित असल्याचं सांगितलं, तर पुढचा टप्पा म्हणजे आपल्या ग्रामपंचायत कार्यालयात, महिला व बालकल्याण विभागात किंवा तालुका स्तरावरील संबंधित अधिकाऱ्यांकडे संपर्क साधणं.
तिथं जाऊन तुमचा अर्ज क्रमांक, आधार क्रमांक आणि बँक खात्याची माहिती देऊन चौकशी करता येते. तसेच https://pfms.nic.in या DBT पोर्टलवर “Know Your Payment” मध्ये जाऊन तपासणी करता येते. काही वेळा तपासणीदरम्यान कळतं की तुम्ही अपात्र ठरलात, अशा वेळी जर ती चूक असेल तर आवश्यक पुरावे देऊन तक्रार नोंदवता येते. थोडक्यात, पैसे जमा झाले नसतील तर लगेच बँक आणि सरकारी कार्यालयात चौकशी करणं आणि सर्व पुरावे तयार ठेवणं हा सर्वोत्तम मार्ग आहे.