काय आहे युनिव्हर्सल पेन्शन स्कीम ?-2025

भारतामध्ये फक्त सरकारी कर्मचाऱ्यांना पेन्शनचा लाभ मिळतो व काही प्रमाणात खाजगी कर्मचाऱ्यांनाही मिळतो पण ज्यांना कोणतेही पेन्शन लागू होत नाही अशा असंघटित कामगार वर्गासाठी किंवा सर्वच नागरिकांसाठी UPS लागू करण्याचा निर्णय सरकार घेण्याच्या तयारीत आहे . त्याला युनिव्हर्सल पेन्शन स्कीम असं नाव दिलं जाणार आहे. संपूर्ण आयुष्यभर कष्ट केलेल्या प्रत्येक नागरिकाला आर्थिक सुरक्षा प्रदान करण हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे.

फक्त सरकारी कर्मचारीच नाही तर खाजगी कर्मचारी ,असंघटित कामगार वर्ग व ज्यांना नोकरी नाही त्यांना सुद्धा यात सहभागी होता येणार व आपले भविष्य साकारता येणार. श्रम आणि रोजगार मंत्रालयाने यावर काम सुरू केलआहे. ही योजना ऐच्छिक असण्याची शक्यता आहे.

Unified Pension Scheme व Universal pension Scheme यात काय फरक आहे-

Unified Pension Scheme-

ही केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आहे, यामध्ये कर्मचाऱ्यां च्या पगारा मधून थोडे पैसे कट होतात व सरकारी त्यात थोडे पैसे टाकत असते, नवीन पेन्शन योजना(NPS) ऐवजी केंद्र सरकारने युनिफाईड पेन्शन स्कीम आणली होती. 23 लाख केंद्रीय कर्मचाऱ्यांना याचा फायदा होणार आहे , व कर्मचाऱ्यांना NPS किंवा UPS निवडण्याची मुभा देण्यात आली आहे.

UPS- मधील काही महत्त्वाचे मुद्दे-

  • खात्रीशीर पेन्शन हे मागील वर्षीच्या सरासरी पगाराच्या 50% असेल .कर्मचाऱ्यांना त्यांच्या निवृत्तीच्या आधीच्या 12 महिन्यांच्या म्हणजे शेवटचे 12 महिने सरासरी मूळ वेतनाच्या 50% (basic Pay )निवृत्ती वेतन म्हणून दिले जाईल.
  • जे 25 वर्षांपेक्षा कमी काळ सेवेत आहेत त्यांना त्याच प्रमाणात पेन्शन मिळेल.
  • 25 किंवा त्याहून अधिक वर्षे सेवेत असलेल्या ना सरकारी मूळ वेतनाच्या 50% रक्कम दिली जाईल.
  • 10 वर्षे किंवा त्याहून अधिक काळ काम करणाऱ्यांना किमान 10 हजार रुपये पेन्शन मिळेल.
  • जर एखाद्या कर्मचाऱ्याने 10 वर्षापेक्षा जास्त 25 वर्षापेक्षा कमी काळ काम केले असेल व त्याचं मूळ वेतन किती कमी असलं तरी त्याला किमान पेन्शन मिळेल.
  • एखाद्या कर्मचाऱ्याने 12 वर्षाच्या सेवेनंतर काही कारणास्तव निवृत्ती घेतली असेल आणि त्याचे मूळ वेतन 20 हजार रुपयांपेक्षा कमी असेल तरीही त्याला दरमहा 10,000 रुपये पेन्शन मिळेल. महागाईची ही भर पडणार आहे.
  • जर एखाद्या कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला तर त्याच्या कुटुंबाला 60% पेन्शन मिळेल.

UPS मध्ये केंद्र सरकारकडून 18% वाटा उचलला जातो.

Universal Pension Scheme-2025

Universal pension Scheme –

आपल्या देशामध्ये बहुतांश कामगार वर्ग हा असंघटित क्षेत्रात आहे. या वर्गासाठी भविष्यासाठी एक सुरक्षितता उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने सरकार ही पेन्शन योजना आणण्याच्या तयारीत आहे. या योजनेअंतर्गत पगारदार वर्ग व जे स्वयंरोजगारीत आहेत यांच्यासाठी या योजनेत तरतूद करण्यात येणार आहे. यामध्ये प्रत्येक व्यक्तीला त्याच्या क्षमतेनुसार व बचतीच्या ताकदीनुसार रक्कम त्यामध्ये जमा करता येणार अशी शक्यता आहे.

यामध्ये युनिफाईड पेन्शन स्कीम प्रमाणे सरकार काही योगदान करील की नाही याबाबत अद्याप तरी काहीच स्पष्टता नाही.

यात काही जुन्या योजनांचा सुद्धा समावेश केला जाण्याची शक्यता आहे-

यामध्ये राष्ट्रीय पेन्शन योजना , प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजना (PM-SYM ), विलीन केल्या जाण्याची शक्यता आहे.

सरकार EPFO द्वारे ही योजना राबवण्याची शक्यता आहे.

Universal pension Scheme पात्रता-

18 वर्षे किंवा त्याहून अधिक वर्षे वयाची कोणतीही व्यक्ती या योजनेत पात्र असू शकते.

60 वर्षे वयानंतर त्यांना पेन्शन मिळेल.

प्रत्येक व्यक्तीला त्याच्या योगदानावर त्याला किती पेन्शन मिळणार निश्चित केली जाईल.यामध्ये अजून काय काय सोयी सुविधा असतील ,सरकार त्यांचे योगदान करेल की नाही, नेमकी पात्रता काय याबाबत सविस्तर योजना प्रकाशित झाल्यानंतर सांगता येईल. सध्या अजून तरी संबंधित मंत्रालयाकडून या योजनेवर काम सुरू आहे ते पूर्ण होतात आपल्याला सर्व तपशीलवार माहिती मिळेल.

Leave a Comment

Index