मराठी योजनालय

MPSC/UPSC ची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महाराष्ट्र शासनाच्या विविध Scholarship – Sarthi/ Mahajyoti/ BARTI/TRTI/ AMRUT

Scholarship - Sarthi/ Mahajyoti/ BARTI/TRTI/ AMRUT

Scholarship - Sarthi/ Mahajyoti/ BARTI/TRTI/ AMRUT

माहिती-

महाराष्ट्र शासन गेल्या काही वर्षापासून Competitive Exams ची तयारी करणाऱ्या होतकरू हुशार विद्यार्थ्यांसाठी विविध संस्थांमार्फत( Scholarship – Sarthi/ Mahajyoti/ BARTI/TRTI/ AMRUT) योजना राबवत आहे. त्यामुळे राज्यातील जे गरीब विद्यार्थी आहेत की जे Pune किंवा Delhi सारख्या ठिकाणी जाऊन Coaching घेऊ शकत नाहीत त्यांना या योजनेमुळे मदत होईल. जेणेकरून ते त्यांचे अधिकारी होण्याचे स्वप्न पूर्ण करू शकतील.अशी ही महाराष्ट्र शासनाची खूप चांगली योजना आहे.

या योजनेअंतर्गत महाराष्ट्र शासनाने विविध संवर्गातील विद्यार्थ्यांसाठी वेगवेगळ्या संस्था स्थापन केले आहेत जसे की Sarthi/ Mahajyoti/ BARTI/TRTI/ AMRUT या संस्थान मार्फत शासन त्या त्या वर्गातील विद्यार्थ्यांना मदत करते.

या संस्था एका सामायिक CET परीक्षेद्वारे विद्यार्थ्यांची निवड करते. व त्यांना पुणे, दिल्ली सारख्या ठिकाणी मोफत Coaching उपलब्ध करून देते. व त्यांना त्यांचा मासिक खर्च भागवता यावा यासाठी काही विशिष्ट रक्कम दर महिन्याला Stipend स्वरूपात देते. ज्यामुळे विद्यार्थ्यांची तिथे राहण्याची व जेवणाची व्यवस्था होते.

1. सार्थी (छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण आणि मानव विकास संस्था)

सार्थी (Chhatrapati Shahu Maharaj Research, Training and Human Development Institute) ही संस्था मराठा, कुणबी, मराठा-कुणबी आणि कुणबी-मराठा या समाजातील विद्यार्थ्यांना शिक्षण, संशोधन आणि स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी सहाय्य प्रदान करते. 2018 मध्ये स्थापन झालेली ही स्वायत्त संस्था पुणे येथे कार्यरत आहे आणि मराठा समाजाच्या सामाजिक-आर्थिक विकासावर भर देते.

पात्रता निकष

2. महाज्योती (महात्मा ज्योतीबा फुले संशोधन आणि प्रशिक्षण संस्था)

महाज्योती (Mahatma Jyotiba Phule Research and Training Institute) ही इतर मागासवर्गीय (OBC), विशेष मागास प्रवर्ग (SBC) आणि विमुक्त जाती-भटक्या जमाती (VJNT) यांच्यासाठी स्थापन केलेली संस्था आहे. 2019 मध्ये स्थापन झालेली ही संस्था नागपूर येथे कार्यरत आहे आणि OBC समुदायातील विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांमध्ये यशस्वी होण्यासाठी प्रोत्साहन देते.

पात्रता निकष

3. बार्टी (डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन आणि प्रशिक्षण संस्था)

बार्टी (Dr. Babasaheb Ambedkar Research and Training Institute) ही अनुसूचित जाती (SC) प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी 1978 मध्ये स्थापन झालेली संस्था आहे. पुणे येथे मुख्यालय असलेली ही संस्था MPSC/UPSC तयारीसाठी अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना आर्थिक आणि शैक्षणिक सहाय्य प्रदान करते.

4. टीआरटीआय (आदिवासी संशोधन आणि प्रशिक्षण संस्था)

टीआरटीआय (Tribal Research and Training Institute) ही अनुसूचित जमाती (ST) प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी 1962 मध्ये स्थापन झालेली संस्था आहे. पुणे येथे कार्यरत असलेली ही संस्था आदिवासी विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी प्रोत्साहन देते.

कोणकोणत्या परीक्षांसाठी लागू ?

MPSC ( राज्यसेवा+ संयुक्त परीक्षा)

UPSC

SSC

JUDICIARY EXAM

BANKING

POLICE भरती

पात्रता (Eligibility)-

संस्थापात्र विद्यार्थी
Sarthiमराठा,कुणबी,,कुणबी-मराठा,मराठा-कुणबी
MahajyotiOBC/SBC/VJ/NT
BARTISheduld Cast
TARTISheduld Tribes
AMRUTEWS ( Open)

मिळणाऱ्या सवलती(Benefits)-

  1. Stipend ( One Time + Per Mont ) (वेळोवेळी संस्थेमार्फत निश्चित केला जाईल )
  2. मोफत Coaching
  3. Physical Training (पोलीस भरती )
  4. Test Series

Stipend Amount –

(वरील रक्कम संबंधित संस्थांमार्फत वेळोवेळी निश्चित केली जाईल.)

हे पण वाचा

निवड प्रक्रिया कशी असेल?

मिळणाऱ्या Scholarship साठी प्रथम संबंधित संस्थांमार्फत जाहिरात प्रसिद्ध केली जाईल व मुलांना अर्ज करण्यासाठी ठराविक कालावधी उपलब्ध करून दिला जाईल. त्यानंतर संबंधित संस्थांमार्फत CET द्वारे विद्यार्थ्यांची निवड केली जाईल.

ऑनलाइन पोर्टल: सर्व योजनांसाठी ऑनलाइन अर्ज अनिवार्य आहे. प्रत्येक संस्थेच्या संकेतस्थळावर अर्ज प्रक्रिया सविस्तर दिलेली आहे

.लिखित चाचणी: बहुतेक योजनांमध्ये MPSC/UPSC पॅटर्नवर आधारित प्रारंभिक चाचणी असते, ज्यामध्ये सामान्य ज्ञान, बुद्धिमत्ता चाचणी आणि विषय-विशिष्ट प्रश्न असतात

कागदपत्र पडताळणी: निवडीनंतर जात, उत्पन्न आणि शैक्षणिक कागदपत्रांची काटेकोर तपासणी केली जाते.

मेरिट लिस्ट: शैक्षणिक गुणवत्ता, चाचणीतील कामगिरी आणि मुलाखतीच्या गुणांवर आधारित अंतिम मेरिट यादी तयार केली जाते.

निवड झालेल्या विद्यार्थ्यांना त्यांना त्यांच्या इच्छेनुसार Coaching Centre निवडण्यासाठी Link ओपन करून दिली जाईल.त्यानंतर निवड झालेल्या Coaching Centre मध्ये विद्यार्थ्यांचे प्रशिक्षण सुरू होईल. प्रशिक्षणाचा कालावधी वेळोवेळी संबंधित संस्थांमार्फत निश्चित केला जाईल.

लागणारी कागदपत्रे (Documents)-

Coaching centre( ठिकाण)-

Pune, Delhi ( For UPSC )व संबंधित संस्था मार्फत वेळोवेळी निश्चित केला जाईल.

Coaching कालावधी (Duration)-

वरील संस्थांनी (Scholarship – Sarthi/ Mahajyoti/ BARTI/TRTI/ AMRUT)परीक्षांसाठी वेगवेगळा कालावधी निश्चित केला आहे. त्या त्या परीक्षा नुसार संस्थांनी (6 Month -12 month) असा कालावधी निश्चित केला आहे. हा कालावधी संस्था वेळोवेळी निश्चित करतात, व त्यात बदल करतात. प्रसिद्ध होणाऱ्या जाहिरातीत संबंधित परीक्षांचा कालावधी दिलेला असतो.

टीप – संबंधित योजनांच्या बद्दल अपडेट ही त्या-त्या संस्थेच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन वेळोवेळी तपासावे.

Exit mobile version