मराठी योजनालय

पोस्ट ऑफिसची धम्माल योजना! फक्त 1,000 रुपयांत मिळवा दर महिन्याला पक्कं उत्पन्न;post-office-monthly-income-scheme-2025-benefits

post-office-monthly-income-scheme-2025-benefits

post-office-monthly-income-scheme-2025-benefits

post-office-monthly-income-scheme-2025-benefits;जवळपास सर्वांनाच भविष्यासाठी थोडी बचत करायची असते व त्यापासून एक निश्चित असे उत्पन्न झाले असते. त्यासाठी नेमके कोणत्या योजना मध्ये कोणता पर्याय निवडायचा याबाबत नेहमीच नागरिकांमध्ये कन्फ्युजन असते . जर तुम्ही अशी योजना शोधत असाल ज्यामध्ये एकदा पैसे गुंतवून दर महिन्याला निश्चित उत्पन्न हवी आहे तर , पोस्ट ऑफिस ची मंथली इन्कम स्कीम (POMIS) तुमच्यासाठी अगदी योग्य आहे . ही योजना भारत सरकारच्या डाग विभागामार्फत चालवली जाते ज्यामुळे तुमचे पैसे सुरक्षित ठिकाणी असण्याची पूर्ण खात्री राहते .

सध्या या योजनेमध्ये म्हणजेच 2025 मध्ये या बचतीवर 7.4% वार्षिक व्याज मिळत आहे . जे की इतर बँकांद्वारे दिल्या जाणाऱ्या सामान्य दरापेक्षा नक्कीच जास्त आहे . विशेष म्हणजे या योजनेद्वारे मिळणारे हे व्याज तुम्हाला दर महिन्याला मिळते जेकी तुमच्या पोस्ट ऑफिस किंवा बँक खात्यामध्ये जमा केले जाते . जे व्यक्ती सध्या निवृत्त झाले आहेत , किंवा ज्या महिला गृहिणी आहेत व ज्यांना जोखीम नको असणाऱ्या किंवा कमी कमी जोखीमच्या योजनेमध्ये गुंतवणूक करायची आहे अशांसाठी ही योजना अगदी उत्तम पर्याय आहे .

या योजनेत नेमके काय खास आहे ?

POMIS या योजनेमध्ये जर तुम्ही एकदा एकरकमी रक्कम गुंतवली तर तुम्हाला पुढील पाच वर्षासाठी दर महिन्याला व्याज मिळत. या योजनेमध्ये सर्वात महत्त्वाची बाब अशी की यामध्ये बाजारामध्ये जरी काय उलथापालट झाली तरी तुमचे पैसे अगदी सुरक्षित राहतात . कारण ही योजना सरकारद्वारे चालवली जाते . यामध्ये तुम्ही एकटे जॉईन खात्याद्वारे गुंतवणूक करू शकतात हा देखील एक फायदा आहे .एकल खात्यासाठी तुम्ही किमान 1,000 रुपये आणि कमाल 9 लाख रुपये गुंतवू शकता. जर तुम्ही जॉइंट खाते उघडलंत, तर ही मर्यादा 15 लाख रुपयांपर्यंत जाते.POMIS चा सर्वात मोठा फायदा म्हणजे तुम्हाला दरमहा निश्चित उत्पन्न मिळतं. यामुळे तुम्हाला नियमित खर्चासाठी पैसे उपलब्ध होतात.तुम्ही देशभरातील कोणत्याही पोस्ट ऑफिसमध्ये हे खाते उघडू शकता आणि गरज पडल्यास दुसऱ्या पोस्ट ऑफिसमध्ये हस्तांतरितही करू शकता, तेही मोफत.

कोण खातं उघडू शकतो ?

या योजनेचा लाभ घेण्यासाठी फक्त भारतीय नागरिकच पात्र आहे . ज्या व्यक्तीने ज्या व्यक्तीने वयाची 18 वर्षी पूर्ण केली आहे असा प्रत्येक व्यक्ती या योजनेअंतर्गत लाभ घेऊ शकतो . दहा वर्षावरील मुलांकरिता त्यांचे पालक खाते उघडू शकतात . व ज्यावेळी त्यांचे मुलं 18 वर्षाची होतात त्या वेळेला ते खातो त्यांच्या नावावर हस्तांतरित करता येत.परदेशी नागरिक (NRI) मात्र या योजनेत गुंतवणूक करू शकत नाहीत. खाते उघडताना तुम्हाला आधार कार्ड, पॅन कार्ड, पासपोर्ट किंवा मतदार ओळखपत्र यापैकी कोणतंही ओळखपत्र आणि पत्त्याचा पुरावा द्यावा लागेल. याशिवाय, पासपोर्ट आकाराचा फोटो आणि अर्ज फॉर्मही लागतो.

या योजनेबाबत काही महत्त्वाचे नियम

या योजनेच्या कालावधी पाच वर्षाचा आहे . जर तुम्ही पाच वर्षाच्या कालावधीत पूर्ण होण्याच्या अगोदरच पैसे काढले तर कमी प्रमाणात लाभ मिळतो .खातं उघडल्यानंतर एक वर्षाच्या आत पैसे काढता येत नाहीत. जर तुम्ही 1 ते 3 वर्षांच्या आत खातं बंद केलं, तर 2% दंड आकारला जातो. 3 ते 5 वर्षांच्या आत बंद केल्यास 1% दंड लागतो. पाच वर्षांनंतर तुम्ही तुमची मूळ रक्कम काढू शकता किंवा नवीन व्याजदराने पुन्हा गुंतवणूक करू शकता.

2025 मध्ये, POMIS चा व्याजदर 7.4% आहे, जो गेल्या वर्षीप्रमाणेच आहे. सरकारने या योजनेची मर्यादा वाढवण्याचा कोणताही अधिकृत निर्णय जाहीर केलेला नाही, पण काही तज्ज्ञांच्या मते, भविष्यात गुंतवणूक मर्यादा वाढू शकते. डाक विभागाने POMIS ची प्रक्रिया अधिक डिजिटल करण्यासाठी पावलं उचलली आहेत, ज्यामुळे खाते उघडणे आणि व्यवस्थापन अधिक सोपं होत आहे.

ही एक अशी योजना आहे जी तुम्हाला सुरक्षितता, नियमित उत्पन्न आणि सुलभता देते. 7.4% व्याजदर आणि सरकारची हमी यामुळे ही योजना विशेषतः निवृत्त व्यक्तींसाठी आणि कमी जोखीम पसंत करणाऱ्यांसाठी उत्तम आहे. तुमच्या जवळच्या पोस्ट ऑफिसला भेट द्या, कागदपत्रे घेऊन जा आणि आजच तुमचं खातं उघडा.

Exit mobile version