Prime Minister Employnment Generation Program 2025;प्रधानमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम(PMEGP)

प्रधानमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम(PMEGP) हा भारत सरकार द्वारे चालवला जाणारा, तरुणांना रोजगार देणारा खूप महत्त्वाचा कार्यक्रम आहे. भारतातील जे तरुण नवोद्योजक होण्याचे स्वप्न पाहतात त्यांच्यासाठी एक महत्त्वपूर्ण योजना आहे. यामध्ये त्यांना त्यांचा व्यवसाय करण्यासाठी कर्ज दिले जाते. तसेच या योजनेमध्ये 35  टक्केपर्यंत सबसिडी दिली जाते.

ही योजना केंद्र शासनाच्या, सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग मंत्रालय द्वारे  (MSME)राबवली जाते. या गोष्टी मार्फत एखादा व्यवसाय सुरू करण्यासाठी किंवा तुमचा सुरू असलेला व्यवसाय वाढवण्यासाठी देखील कर्ज मिळते. यामध्ये व्यवसाय सुरू करण्यासाठी तरुणांना 10  लाख रुपये पासून ते 25  लाख रुपये पर्यंत कर्ज दिले जाते. 

या लेखामध्ये आपण या योजनेविषयी सविस्तर माहिती बघणार आहोत. अर्ज कसा करायचा, पात्रता काय आहे,  कर्ज   परतफेड  कालावधी काय  असेल, व्याजदर किती असेल अशी सर्व माहिती आपण या लेखामध्ये पाहू.

PMEGP  योजनेअंतर्गत मिळणारे लाभ

प्रधानमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमांतर्गत पात्र व्यक्तींना 10  लाख ते 25  लाख रुपये पर्यंत कर्ज दिले .जाते.

तुम्हाला तुमचा व्यवसाय व्यवस्थित तिच्या चालवता यावा यासाठी मार्गदर्शन केले जाते. 

या योजनेअंतर्गत कर्ज ग्रामीण किंवा  शहरी भागात  बिगरशेती क्षेत्रात  उद्योग स्थापन  करण्यासाठीच   दिले जाते.या योजनेअंतर्गत घेतलेल्या  कर्जावर पात्रतेनुसार 35  टक्क्यापर्यंत सबसिडी दिले जाते.

PMEGP अंतर्गत मिळणाऱ्या कर्जाचा व्याजदर किती आहे?

या योजनेअंतर्गत मिळणारी कर्ज  हे 12  टक्क्यापर्यंत व्याजदराने दिले जाते.

 आवश्यक पात्रता अटी व मुदतीत कर्ज   परत  केल्यानंतर  व्याजावर अनुदानही दिले जाते.

प्रधानमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम(PMEGP) योजनेच्या पात्रता  व अटी

अर्जदाराचे किमान वय 18  वर्ष पूर्ण केलेली असावे, 

10  लाख पेक्षा जास्त  कर्जासाठी  अर्जदाराने किमान 8  वि उत्तीर्ण असणे अनिवार्य आहे. 

 कुटुंबातील  फक्त एकाच व्यक्तीला या योजनेचा लाभ मिळू शकतो.

पीएमइजीपी योजनेअंतर्गत कर्ज मिळविण्यासाठी कोणतीही उत्पन्नाची मर्यादा नसेल. 

या योजनेअंतर्गत कर्जही  नवीन सूक्ष्म उद्योगांना दिले जाईल, याआधी कोणत्याही इतर योजनेचा फायदा घेतलेल्या उद्योगांना नाही 

इतर पात्रता व अटी जाणून घेण्यासाठी शासनाच्या या वेबसाईटला भेट द्या-    https://msme.gov.in/eligibility-criteria-pmegp-scheme

PMEGP योजनेसाठी अर्ज कसा करावा? 

  • या योजनेचा लाभ घेण्यासाठी सर्वप्रथम ऑनलाइन पद्धतीने PMEGP  योजनेच्या अधिकृत वेबसाईट ला जाऊन ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरावा. 
  • भरलेल्या अर्जाची एक प्रत संबंधित  कागदपत्रांसहित तुमच्या तालुक्याच्या किंवा जिल्ह्याच्या ठिकाणी शासनाने प्रायोजित केलेल्या संस्थेत जमा करावा. ( प्रायोजित संस्था- जिल्हा उद्योग केंद्र,   खादी व ग्रामोद्योग केंद्र)
  • या संस्थांमध्ये तुमच्या अर्जाची सर्व छान केली जाते,  आवश्यक  त्रुटी भरून काढल्या जातात, व अर्ज स्वीकार केला जातो.
  • अर्ज स्वीकारल्यानंतर तुमचा अर्ज तुम्ही ज्या बँकेद्वारे कर्ज देऊ इच्छिता त्या बँकेक डे  पाठवला जातो.
  • पुढची प्रक्रिया होऊन कर्ज मंजूर केले जाते,

PMEGP योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे कोणती आहे?

  • आधार कार्ड,
  •  आधार कार्ड सोबत लिंक असलेला मोबाईल नंबर,
  •  बँक पासबुक
  •  पॅन कार्ड 
  • टीसी , मार्क्स मेमो ( शेवटच्या वर्षातील गुणपत्रक)
  •  कास्ट  सर्टिफिकेट ( जर लागू असेल तर) 
  • फोटो ,
  • तुमच्या व्यवसायाची सर्व माहिती असणारा प्रोजेक्ट रिपोर्ट,
  • कुटुंबाचे उत्पन्नाचे प्रमाणपत्र 

PMEGP योजनेअंतर्गत कोणत्या व्यवसायांना कर्ज  दिले जाते

ग्रामीण आणि शहरी भागांमध्ये बिगर-शेती क्षेत्रातील नवीन सूक्ष्म-उद्योग स्थापित करण्यासाठी कर्ज उपलब्ध होते, ज्यात खादी आणि ग्रामोद्योग, तसेच इतर विविध व्यवसाय आणि सेवा क्षेत्रातील उपक्रम समाविष्ट आहेत. 

 सेवा क्षेत्रातील उद्योग

  • खादी  किंवा  कापड क्षेत्रातील उद्योग
  • खनिज उत्पादन आधारित उद्योग
  • बिगर कृषी क्षेत्रातील उद्योग
  •  फूड प्रोसेसिंग क्षेत्रातील उद्योग
  • अभियांत्रिकी  उद्योग
  •  बायोटेक क्षेत्रातील  रिसर्च आधारित उद्योग

महिलां साठी लागू असणाऱ्या इतर सर्व कर्ज योजना पाहण्यासाठी इथे क्लिक करा-https://marathiyojanalay.com/mahila-loan-schemes-2025/

 या योजनेची संबंधित अधिक माहितीसाठी शासनाच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्या-https://www.kviconline.gov.in/pmegpeportal/pmegphome/index.jsp

योजना संबंधित ताज्या अपडेट्स आणि महत्त्वाची माहिती मिळवण्यासाठी या ग्रुपला जॉईन व्हा- इथे क्लिक करा

Leave a Comment

Index
Exit mobile version