मराठी योजनालय

PM SVANidhi;पंतप्रधान स्वनिधी योजना: संपूर्ण माहिती, अर्ज प्रक्रिया आणि लाभ (2025)

पंतप्रधान स्वनिधी योजना-2025

देशातील तरुणांना स्वावलंबी बनवून रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी राज्य आणि केंद्र सरकार नेहमीच पुढाकार घेत असते. देशभरात लहान-मोठे उद्योग, व्यवसाय आणि स्वरोजगाराच्या संधी वाढवण्यासाठी अनेक योजना राबवल्या जातात. फक्त मोठे उद्योगच नव्हे, तर लहान आणि छोट्या व्यवसायांत गुंतलेल्या लोकांनाही सरकारकडून प्रोत्साहन दिले जाते. कारण लहान व्यवसाय आणि रस्त्यावरील विक्रेते हेही देशाच्या अर्थव्यवस्थेचा एक महत्त्वाचा भाग आहेत.

याच पार्श्वभूमीवर, केंद्र सरकारने रस्त्यावरील विक्रेत्यांसाठी एक विशेष योजना सुरू केली आहे – प्रधानमंत्री स्ट्रीट व्हेंडर्स आत्मनिर्भर निधी योजना, जी ‘पीएम स्वनिधी योजना’ म्हणून ओळखली जाते. ही योजना विशेषतः अशा लोकांसाठी आहे, जे रस्त्यावरून किंवा छोट्या हातगाड्यांद्वारे व्यवसाय करतात आणि ज्यांना त्यांच्या व्यवसायाच्या वाढीसाठी आर्थिक मदतीची गरज आहे.

 या लेखात आपण या योजनेविषयी  अर्ज कसा करायचा, मिळणाऱ्या सवलती, पण पिढीचा कालावधी,  अशी संपूर्ण माहिती बघणार आहोत.

 पंतप्रधान स्वनिधी योजना वैशिष्ट्ये व लाभ

पीएम स्वनिधी योजनेंतर्गत, रस्त्यावरील विक्रेत्यांना त्यांचा व्यवसाय सुरू करण्यासाठी किंवा विस्तार करण्यासाठी केंद्र सरकारकडून बिनव्याजी कर्ज दिले जाते. या कर्जासाठी कोणत्याही विशेष कागदपत्रांची आवश्यकता नसते, ही योजनेची एक मोठी खासियत आहे.

यातील आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे – जर लाभार्थीने पहिले कर्ज वेळेत परत केले, तर त्याला दुसऱ्यांदा व्याजाशिवाय दुप्पट रक्कम कर्ज म्हणून मिळू शकते. यामुळे व्यवसाय वाढवण्यासाठी अधिक भांडवल उपलब्ध होते. घेतलेल्या कर्जाची रक्कम एका वर्षाच्या आत परतफेड करता येते, तसेच मासिक हप्त्यांमध्ये फेडण्याची सुविधाही आहे.

केंद्र सरकार या कर्जावर भरघोस सबसिडी देते आणि त्याचबरोबर कर्जदारांना कॅशबॅकचीही सुविधा उपलब्ध आहे.

या योजनेत विक्रेत्यांना डिजिटल व्यवहारासाठी प्रोत्साहन देण्यासाठी कॅशबॅकची सुविधा दिली जाते. डिजिटल पद्धतीने व्यवहार केल्यामुळे त्यांच्या क्रेडिट स्कोरमध्ये वाढ होईल, ज्यामुळे भविष्यात त्यांना कर्ज मिळवणे सोपे जाईल. गूगल पे, अमेझॉन पे, भारत पे यांसारख्या डिजिटल पेमेंट अ‍ॅग्रीगेटर नेटवर्कद्वारे स्ट्रीट वेंडर्सना डिजिटल व्यवहारासाठी प्रवृत्त केले जाईल.

ऑनबोर्ड झालेल्या सर्व विक्रेत्यांना ₹50 ते ₹100 पर्यंत कॅशबॅक दिला जाईल. महिन्यात पहिल्या 50 पात्र व्यवहारांवर ₹50 कॅशबॅक, पुढील 50 व्यवहारांवर ₹25 आणि त्यानंतरच्या 100 किंवा त्याहून अधिक व्यवहारांवर ₹25 कॅशबॅक दिला जाईल. अशा प्रकारे विक्रेत्यांना एकूण ₹100 कॅशबॅक मिळू शकतो.

काय आहे पीएम स्वनिधी योजना?

पीएम स्वनिधी योजना ही पूर्णपणे केंद्र सरकारची योजना आहे. तिचा उद्देश रस्त्यावरील विक्रेते, हातगाडी चालवणारे, छोटे स्टॉलधारक आणि इतर छोट्या व्यवसायिकांना आर्थिक मदत करून त्यांचा व्यवसाय स्थिर आणि मजबूत करणे हा आहे.

या योजनेत केंद्र सरकार 50,000 रुपयांपर्यंतचे बिनव्याजी कर्ज देते. लाभार्थीने ही रक्कम एका वर्षात परत केली, तर त्याला दुसऱ्यांदा दुप्पट रक्कम कर्ज म्हणून मिळू शकते. यातील विशेष बाब म्हणजे – या योजनेचा लाभ घेण्यासाठी कोणत्याही गॅरंटरची आवश्यकता नाही.

पंतप्रधान स्वनिधी योजना पात्रता काय आहे?

किती रक्कम कर्ज मिळते?

या योजनेअंतर्गत सरकार 10 पासून ते 50 हजार रुपये पर्यंत  बिनव्याजी कर्ज देते. 

  कर्जदाराने ही रक्कम एका वर्षाच्या कालावधीत परत केली तर कर्जदार दुप्पट रक्कम पुन्हा कर्ज स्वरूपात घेऊ शकतो.

 या योजनेचा लाभ घेण्यासाठी कोणतेही गॅरंटी ची गरज भासणार नाही.

एका कुटुंबातील एकच व्यक्ती या योजनेचा लाभ घेऊ शकतो. 

या योजनेअंतर्गत दहा हजार रुपयापर्यंत कर्ज कोणत्याही आम्ही शिवाय उपलब्ध आहे. 

जर तुम्ही वेळेत  कर्ज परतफेड केली तर तुम्हाला 7 टक्के व्याज अनुदान मिळेल. 

परतफेडीची मुदत आणि व्याजदर

या योजनेअंतर्गत कर्जदाराला एका वर्षात सात हप्त्यांमध्ये कर्जाची परतफेड करावी लागेल. 

लाभार्थी कर्ज हे एक रकमे किंवा हप्त्याच्या स्वरूपात जमा करू शकतात. 

कर्ज हे व्याज विरहित असेल, जर तुम्ही वेळेत कर्जाची परतफेड केली तर 7 टक्के अनुदानही मिळेल. 

PM SVANidhi योजना अर्ज प्रक्रिया

ऑनलाइन अर्ज प्रक्रिया

सर्वप्रथम योजनेच्या वेबसाईटवर जा- https://pmsvanidhi.mohua.gov.in/

होमपेजवर जाऊन Apply Loan 10k/Apply Loan 20k/Apply Loan 50k वर क्लिक करा.

या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदाराने खालीलप्रमाणे प्रक्रिया पूर्ण करावी –

पडताळणीनंतर तुमच्या बँक खात्यात कर्जाची रक्कम जमा केली जाईल.

OR

सर्वप्रथम केंद्र सरकारच्या अधिकृत संकेतस्थळावर जा – pmsvanidhi.mohua.gov.in

होमपेजवर जाऊन Apply Loan 10k / Apply Loan 20k / Apply Loan 50k यापैकी योग्य पर्यायावर क्लिक करा.

तुमचा मोबाइल नंबर नोंदवा. त्यावर OTP येईल.

OTP पडताळणी झाल्यानंतर नोंदणी फॉर्म तुमच्या स्क्रीनवर दिसेल.

फॉर्मचा प्रिंट आउट काढा.

फॉर्म काळजीपूर्वक भरून, आवश्यक सर्व कागदपत्रांची स्कॅन कॉपी अपलोड करा.

केंद्र सरकारने निश्चित केलेल्या स्वनिधी केंद्रावर जाऊन फॉर्म आणि कागदपत्रे प्रत्यक्ष सादर करा.

स्वनिधी योजना कागदपत्रे

निष्कर्ष

पंतप्रधान स्वनिधी योजना ही भारतातील छोट्या विक्रेत्यांसाठी एक सुवर्णसंधी आहे. योग्य प्रकारे अर्ज केल्यास आणि परतफेड वेळेत केल्यास मोठे फायदे मिळू शकतात.

महिलांसाठी इतर कर्ज योजना योजनांची माहिती मिळवण्यासाठी-  इथे क्लिक करा 

योजना संबंधित ताज्या अपडेट्स आणि महत्त्वाची माहिती मिळवण्यासाठी या ग्रुपला जॉईन व्हा- इथे क्लिक करा

Exit mobile version