pm-kisan-samman-nidhi-18k-installments-update-2025;केंद्र शासनाद्वारे शेतकऱ्यांसाठी सुरू केलेली पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना ही खरंच शेतकऱ्यांसाठी एक वरदान ठरली आहे . त्याच योजनेबाबत आता एक मोठी .बातमी समोर येत आहे. या योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना दरवर्षी सहा हजार रुपये येतात . पण काही कारणामुळे काही शेतकऱ्यांची रक्कम ही जमा होत नाही व त्यांचे हप्ते थकले जातात . अशा शेतकऱ्यांसाठी आता एकाच वेळी त्यांची सर्व थकीत रक्कम जवळपास 18 हजार रुपये पर्यंत रक्कम एकाच वेळी मिळू शकते . सरकारने आता ज्या शेतकऱ्यांचे हप्ते थकले आहेत ते पुन्हा सुरू करण्यासाठी एक विशेष मोहीम सुरू केली आहे .२०१८ मध्ये सुरू झालेल्या या योजनेने आतापर्यंत सुमारे ११ कोटी शेतकऱ्यांना ३.६९ लाख कोटी रुपये वितरित केले आहेत. २०२५ मध्ये ही योजना आणखी प्रभावी झाली आहे.
योजनेचा उद्देश
पीएम किसान योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना दरवर्षी ६,००० रुपये मिळतात, जे तीन हप्त्यांमध्ये प्रत्येकी २,००० रुपये थेट बँक खात्यात जमा होतात. हे पैसे शेतकऱ्यांना बियाणे, खते, औषधे किंवा रोजच्या गरजांसाठी वापरता येतात.
थकीत हप्त्यांबाबत बातमी
कृषी राज्य मंत्र्यांनी सांगितल्याप्रमाणे , ज्या शेतकऱ्यांनी आवश्यक कागदपत्रे पूर्ण केली नाही किंवा ज्यांचे हप्ते काही कारणांमुळे थांबलेली आहेत अशा शेतकऱ्यांसाठी ही मोहीम सुरू केली आहे . या मोहिमेमध्ये जर शेतकऱ्याला बाराव्या हप्त्यापासून ते विसाव्या हप्त्यापर्यंत पैसे मिळाले नसतील तर त्यांना एकत्र नऊ हप्त्यांचे पैसे दिले जातील . त्यामुळे शेतकऱ्यांना एकाच वेळी 18000 रुपये मिळण्याची संधी निर्माण झाली आहे .२०व्या हप्त्याची रक्कम २ ऑगस्ट २०२५ रोजी ९.७ कोटी शेतकऱ्यांना वितरित झाली आहे, आणि २१वा हप्ता डिसेंबर २०२५ मध्ये येण्याची शक्यता आहे. पण, थांबलेले हप्ते मिळवण्यासाठी तुम्हाला काही गोष्टी तातडीने कराव्या लागतील.
पैसे मिळवण्यासाठी नेमकं काय करावं लागेल
थांबलेले हप्ते मिळवण्यासाठी व पुढील हप्त्यांना पात्र होण्यासाठी शेतकऱ्यांना तीन गोष्टी प्रामुख्याने कराव्या लागतील . त्यातली पहिली म्हणजे शेतकऱ्यांनी ई केवायसी पूर्ण करून घेणे आवश्यक आहे . त्यासाठी तुम्ही पी एम किसान पोर्टल वर जाऊन ई केवायसी पूर्ण करू शकता . दुसरं म्हणजे तुमचा आधार क्रमांक तुमच्या बँक खात्याशी संलग्न असायला पाहिजे . जर लिंक नसेल तर बँकेत जाऊन ती प्रक्रिया पूर्ण करून घ्या . आणि तिसरं, तुमच्या जमिनीच्या नोंदी, म्हणजेच ७/१२ किंवा फेरफार उतारा, पोर्टलवर अपडेट करा, कारण १२व्या हप्त्यापासून जमीन नोंदणी अनिवार्य आहे.
शेतकऱ्यांसाठी ही पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना अत्यंत महत्त्वाची योजना आहे , ज्यामध्ये शेतकऱ्यांना बी बियाणे खरेदीसाठी किंवा इतर शेती उपयोगी सामान खरेदी करण्यासाठी शासनाद्वारे दरवर्षी पात्र शेतकऱ्यांना सहा हजार रुपये दिले जातात . ज्यामुळे शेतकऱ्याला एक नियमित आर्थिक आधार मिळतो . आतापर्यंत जवळपास साडेतीन लाख कोटी रुपये वितरित झाली आहेत , आणि 2025 मध्ये ही योजना आणखीन विस्तारित होत आहे . त्यामुळे सर्व पात्र शेतकऱ्यांनी या योजनेचा अवश्य लाभ घ्या , व तुमचे थांबलेले हप्ते मिळवण्याची ही संधी सोडू नका .
त्वरित पीएम किसान पोर्टलवर जा आणि तुमची माहिती अपडेट करा. जर ऑनलाइन प्रक्रिया समजत नसेल, तर जवळच्या CSC सेंटरला भेट द्या. तिथे तुम्हाला सर्व मदत मिळेल. ही योजना तुमच्या शेती आणि कुटुंबाच्या गरजांसाठी खूप उपयुक्त आहे, आणि याचा लाभ घेऊन तुम्ही तुमचे उत्पन्न वाढवू शकता.