Mazi Ladki bahin ( February+March) Hapta; महाराष्ट्र माझी लाडकी बहीण योजना फेब्रुवारी व मार्च चा हप्ता कधी येईल?-2025

महाराष्ट्र शासनाने महिलांना आर्थिक दृष्ट्या सक्षम करण्यासाठी, व त्यांचे सामाजिक स्थान उंचावण्यासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरु केली. या योजनेचे उद्दिष्ट महिलांचे आर्थिक स्वातंत्र्य, स्वावलंबन आणि महिलांच्या एकूण विकासाला चालना देणे आहे. यासाठी महाराष्ट्र शासन पात्र महिलांना दरमहा 1500 रुपये त्यांच्या बँक खात्यात DBT द्वारे जमा करते.

तर या योजनेचा फेब्रुवारी व मार्च महिन्याचा हप्ता कधी जमा होईल याबाबत माननीय मंत्री महोदयांनी दिलेली माहिती पाहू.

माझी लाडकी बहीण योजना फेब्रुवारी व मार्च चा हप्ता कधी येईल?-2025

फेब्रुवारी व मार्च चा हप्ता कधी येईल?-2025

महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांची घोषणा;

महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिलेल्या माहितीनुसार फेब्रुवारी व मार्च या दोन्ही महिन्याचा हप्ता एकत्रित रित्या 8 मार्च रोजी जागतिक महिला दिनी दोन्ही महिन्याचा मिळून ₹3000 हप्ता एकत्रितरित्या जमा होईल.पैसे खात्यात जमा होण्यास 5 किंवा 6 तारखेपासून सुरुवात होईल व टप्प्याटप्प्याने 8 मार्च पर्यंत सर्व पात्र महिलांच्या खात्यात पैसे जमा केली जातील.

मंत्री महोदय यांनी विधानसभेत दिलेल्या माहितीनुसार कोणत्याही लाडक्या बहिणीचे नाव यादीतून कमी केलेली नाही. फेब्रुवारी व मार्च महिन्याचा हप्ता 2 कोटी 52 लक्ष महिलांना वितरीत केला जाईल जो की पूर्वी वितरित केलेल्या लाडक्या बहिणीच्या संकेत पेक्षा जास्त आहे.

लाभार्थ्यांसाठी सूचना आणि पुढील पावले;

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली आहे तरी पात्र महिलांनी त्यांच्या संबंधित बँकेत जाऊन पेमेंट स्थिती तपासावी. लाभार्थ्यांनी आपल्या बँक खात्यांची नियमित तपासणी करावी आणि कोणत्याही अडचणींसाठी संबंधित सरकारी कार्यालयाशी संपर्क साधावा.

या योजनेचे पैसे जमा झालेत की नाहीत हे हे कसे तपासावे यासाठी पुढे वाचा.

पैसे हे टप्प्याटप्प्याने प्रत्येक पात्र महिलेच्या खात्यात जमा होत आहेत पण जर अद्यापही तुमच्या खात्यात पैसे आले नसतील किंवा फेब्रुवारी मार्च महिन्याचा हप्ता जमा झाला नसेल तर पुढे वाचा.

‘माझी लाडकी बहीण’ योजनेचे उद्दिष्ट आणि महत्त्व

राज्यातील महिला व मुलींना पुरेशा सोयी-सुविधा उपलब्ध करून रोजगार निर्मितीस चालना देणे. त्यांचे आर्थिक, सामाजिक पुनर्वसन करणे. राज्यातील महिला स्वावलंबी, आत्मनिर्भर करणे. राज्यातील महिलांना व मुलींना सशक्तीकरणास चालना देणे. महिला आणि त्यांच्यावर अवलंबून असलेल्या मुलांच्या आरोग्य आणि पोषण स्थितीत सुधारणा करणे,योजनेचे स्वरुप : प्रत्येक पात्र महिलेला तिच्या स्वतःच्या आधार लिंक केलेल्या सक्षम बँक खात्यात DBT द्वारे दरमहा रु.१५००/- इतकी रक्कम दिली जाईल.

वारंवार विचारले जाणारे प्रश्न

  • लाडकी बहीण योजनेसाठी किती वय लागते?

    लाडकी बहिन योजनेसाठी किमान वय २१ वर्षे आणि कमाल वय ६५ वर्षे आहे.

  • ladaki bahin yojana official website

    https://ladakibahin.maharashtra.gov.in/

  • माझी लाडकी बहिन योजना लॉगिन कसे करायचेकसे करायचे

    https://ladakibahin.maharashtra.gov.in अधिकृत वेबसाइटला भेट द्या:

  • माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा झालेत का नाही (Payment Status)कसे तपासावे ?

    १. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊन. 2.स्मार्टफोन अ‍ॅपचा वापर करून . 3.Online Help desk आणि टोल-फ्री नंबर. 4.एसएमएस द्वारे तपासणी. 5.राज्याच्या संबंधित कार्यालयात भेट देऊन.

  • लाडकी बहिन योजनेच्या पेमेंटची स्थिती कशी तपासायची?
    • वेबसाईट उघडामुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ह्या अधिकृतवेबसाईटला भेट द्या.
    • लॉगिन करा: तुमचे खाते असल्यास, त्यात लॉगिन करा. नवीन सदस्य असल्यास, नोंदणी प्रक्रिया पूर्ण करा.
    •  होमपेजवर “पेमेंट स्टेटस” पर्यायाखाली “DBT Status Tracker  या पर्यायावर क्लिक करा
    • दिलेल्या deatails भरा (Account Number,Login Id)
    • “Search “बटनावर क्लिक करा.
    • पावती तपासा: तुम्हाला तिथे पैसे जमा झाले आहेत का नाही याचे तपशील पाहता येईल.
    • अपडेट्स: योजनेसाठी नवीनतम अपडेट्स आणि मदतीसाठी ग्राहक सेवा वापरा.
  • माझी लाडकी बहिन योजनेचे मासिक पेमेंट किती आहे?

    21 ते 65 वयोगटातील पात्र महिलांना दर महिना 1500 रुपये आर्थिक लाभ देण्यात येतो. या योजनेचे एकूण 2 कोटी 34 लाख महिला लाभार्थी आहेत

  • लाडकी बहीण योजनेसाठी पात्रता काय आहे?
    • अर्जदार महिलांचे वय किमान 21 वर्षे आणि कमाल 65 वर्षे असणे आवश्यक आहे 
    • कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न ₹2.5 लाखांपेक्षा जास्त नसावे.
    • अर्जदार महाराष्ट्रातील रहिवासी असणे आवश्यक आहे 
    • अर्जदार विवाहित, घटस्फोटित, विधवा, परित्यक्त, निराधार किंवा कुटुंबातील एक अविवाहित महिला असू शकतात 

Leave a Comment

Index