मराठी योजनालय

Lakhpati Didi Yojana 2025;लखपती दीदी योजना ; ग्रामीण महिलांसाठी सुवर्णसंधी, जाणून घ्याअर्ज प्रक्रिया आणि फायदे !”

लखपती दीदी योजना

केंद्र सरकार असो किंवा राज्य सरकार  महिला सशक्तीकरणासाठी, महिलांना स्वावलंबी बनवण्यासाठी विविध महिलांसाठी सरकारी योजना राबवत असते.  ज्याचा उद्देश  महिलांचे आर्थिक सक्षमीकरण करणे व  महिलांना आर्थिक स्वायत्तता साध्य करण्यास प्रोत्साहन देणे. 

 त्यापैकीच एक  लखपती दीदी योजना आहे. या योजनेमध्ये केंद्र शासन महिलांना त्यांचा व्यवसाय सुरू करण्यासाठी 1लाख रुपये ते 5 लाख रुपये पर्यंत कर्ज देते.   व  हे संपूर्ण कर्ज  व्याज मुक्त असते. यामुळे महिलांना व्यवसाय करण्यास अधिक  स्वायत्तता मिळते. व्यवसाय करताना त्यांच्या मनात घेतलेल्या कर्ज विषयी व्याजाचे टेन्शन नाही राहत ज्यामुळे महिला पूर्ण क्षमतेने त्यांचा व्यवसाय करू शकतात. त्याचबरोबर या योजनेमध्ये महिलांना त्यांचा व्यवसाय करण्यासाठी प्रशिक्षणही दिले जाईल.

लखपती दीदी योजनेविषयी माहिती जाणून घेत असताना लखपती दीदी योजना केंद्र सरकारने सुरू का केली हा महत्त्वाचा मुद्दा आहे आता लखपती दीदी योजनेच्या अंतर्गत तुम्हाला व्यवसायासाठी आर्थिक मदत मिळणार आहे एक लाख रुपयापासून पाच लाख रुपया पर्यंत म्हणजे सुरुवातीला एक लाख रुपये दोन लाख रुपये तीन लाख रुपये चार लाख रुपये पाच लाख रुपये अशा पद्धतीने तुम्हाला बिनव्याजी कोणत्याही प्रकारचं तारण म्हणजे बिना शर्ती किंवा हमी तुम्हाला हे पैसे लोन स्वरूपात मिळणार आहे.

तुम्हाला त्याचा हप्ता ठरवून दिला जाणार आहे आणि त्या हप्त्याच्या स्वरूपामध्ये तुम्हाला हे पैसे पेड करायचे सर्वात महत्त्वाचा मुद्दा आता यानंतर ही योजना सुरू का केली फक्त पैसे देण्यासाठी नाही तर तुम्ही एखादा व्यवसाय करता तो व्यवसाय तुम्हाला वाढवायचा आहे किंवा तुम्हाला एखादा व्यवसाय सुरू करायचा आहे यासाठी तुम्हाला पैशाची गरज असते अशा वेळेस केंद्र सरकार तुम्हाला पैसे देणार आहे. सर्वात महत्त्वाचा विषय तुम्ही या योजनेसाठी पात्र झाल्यानंतर तुम्हाला एक इन्शुरन्स सुद्धा तुम्हाला मिळणार आहे या सर्व गोष्टींसाठी लखपती दीदी योजना सुरू केलेली आहे .

आत्तापर्यंत 80 लाख बचत गटांना ह्या योजनेचा लाभ मिळालाय, सुमारे नऊ करोड महिला या योजनेचा लाभ घेत आहेत म्हणजे सर्वसामान्य विचार जर केला तर केंद्रामध्ये किंवा देशामध्ये लखपती दीदी ही योजना खूप जोरात चालू आहे ,व्यवसाय सुरू करण्यासाठी किंवा व्यवसाय वाढवण्यासाठी या योजनेचा लाभ तुम्हाला घेता येणार आहे.

 या संपूर्ण लेखांमध्ये आपण   लखपती  दीदी  योजना विषयी  संपूर्ण माहिती  बघणार आहोत. पात्रता, अटी, इतर सोयी सुविधा, अर्ज कसा करायचा अशाच  सर्व गोष्टी आपण पाहू.

लखपती दीदी योजना  काय आहे?

महिला  सक्षमीकरण  हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी शासन विविध शासकीय योजना राबवत असते. महिलांना त्यांचा व्यवसाय करण्यास मदत व्हावी व महिला स्वयंरोजगारीत व्हाव्या यासाठी शासनाने ही  (lakhapati Didi Yojana ) योजना सुरू केली आहे. 15 ऑगस्ट 2023   ला  पंतप्रधान नरेंद्र मोदी  या योजनेची घोषणा केली होती. यामध्ये महिलांना त्यांचा व्यवसाय करण्यासाठी 1 लाख ते 5 लाख  रुपयापर्यंत बिनव्याजी कर्ज देणे व त्यांना  त्यांचा व्यवसाय करण्यासाठी प्रशिक्षणही देणे हे या योजनेचे उद्दिष्ट आहे.

 लखपती दीदी योजनेची वैशिष्ट्ये  व मिळणारे फायदे

सरकारद्वारे महिलांना मिळणारी आर्थिक मदत

लखपती दीदी योजनेच्या पात्रता व अटी काय आहेत?

लखपती दीदी योजनेअंतर्गत अर्ज कसा करावा?

अर्ज करण्यासाठी तुमच्या स्थानिक अंगणवाडी या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता , तालुकास्तरीय किंवा विभाग स्तरीय बचत गटाचे जे ऑफिस असतात या बचत गटाच्या ऑफिसमध्ये तुम्हाला जायचंय त्या ठिकाणी तुम्हाला चौकशी करायची आहे

हा   लाभ प्राथमिकता  महिला बचत गटासाठी आहे त्यामुळे महिलेला  बचत गटात  सामील होणे बंधनकारक असेल. 

 सर्वप्रथम ज्या महिला  या योजनेचा लाभ घेऊ इच्छितात त्यांनी त्यांच्या संबंधित  बचत गटाच्या माध्यमातून स्वतःचा व्यवसाय आराखडा तयार केला पाहिजे.

 व तो संबंधित अर्ज  सरकारला पाठवलं जाईल, संबंधित  अधिकाऱ्याकडून  त्या संपूर्ण   अर्जाची छाननी केली जाईल. 

सर्व कागदपत्रे तुम्हाला तुमच्या जवळच्या   प्रादेशिक बचत गट कार्यालयात  जमा करावी लागतील. 

यानंतरच तुम्हाला कर्ज मंजूर  केले जाते.

या  योजनेची संबंधित  अधिक माहितीसाठी शासनाच्या या वेबसाईटला भेट द्या- https://lakhpatididi.gov.in/

Lek Ladki Yojana 2025
रोजगार संलग्न प्रोत्साहन योजना 2025

आवश्यक कागदपत्रे

योजना संबंधित ताज्या अपडेट्स आणि महत्त्वाची माहिती मिळवण्यासाठी या ग्रुपला जॉईन व्हा- इथे क्लिक करा

निष्कर्ष

महिलांना स्वावलंबी बनवण्यासाठी, आर्थिक स्वायत्त प्राप्त करून देण्यासाठी व त्यांची सामाजिक स्थिती उंचावण्यासाठी  लखपती दिदि सारख्या योजना  महत्त्वाच्या आहेत. तरी महिलांनी अशा शासकीय योजनांचा फायदा घ्यावा  व स्वतःच्या व्यवसाय सुरू करावा. 

Exit mobile version