मराठी योजनालय

लाडकी बहीण योजनेचं EKYC सुरू! उशीर केला तर मोठं नुकसान?ladki-bahin-yojana-ekyc-compulsory-2025

ladki-bahin-yojana-ekyc-compulsory-2025

ladki-bahin-yojana-ekyc-compulsory-2025

E-KYC बाबतच्या ताज्या घडामोडी

ladki-bahin-yojana-ekyc-compulsory-2025ई-केवायसी बाबत आत्ताच हाती आलेल्या माहितीनुसार महाराष्ट्र शासनाला २६ ला काहून अधिक अपात्र लाभार्थी आढळली आहेत . जे की अपात्र असून देखील लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत असल्याचे दिसून आले आहे . त्यामुळे महाराष्ट्र शासनाने ई-केवायसी प्रक्रिया करणे बंधनकारक केले आहे . महिला व बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी दिलेल्या माहितीनुसार जुलै 2025 पर्यंत काही जणांनी बोगस पद्धतीने या योजनेचा लाभ घेतला होता त्यामुळे आता सर्व लाभार्थ्यांना आपली ई-केवायसी करावी लागणार आहे . ई-केवायसी प्रक्रिया एक ऑगस्ट 2025 पासून सुरू झाली आहे . त्यासाठी ladakibahin.maharashtra.gov.in या अधिकृत वेबसाइटवर किंवा नारीशक्ती दूत अॅप वर अर्जदारांना नोंदणी करावी लागेल.

जर लाभार्थी महिलांनी ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण केली नाही तर त्यांचा लाडकी बहीण योजनेत मिळणारा हप्ता थांबवला जाऊ शकतो . महाराष्ट्र शासनाने ई-केवायसी प्रक्रिया करून फसवणूक थांबवण्याचा आणखीन एक प्रयत्न केला आहे . या प्रक्रियेमध्ये पात्र महिलांना त्यांचे आधार कार्ड आणि बँक खाते तपासावी लागणार आहे . त्याचा फायदा असा होईल की या योजनेचा लाभ केवळ पात्र महिलांनाच मिळेल. यामुळे या योजनेची विश्वासार्हता अजून वाढेल . सरकारने पात्र लाभार्थ्यांना ई-केवायसी पूर्ण करण्यासाठी विशिष्ट मुदत दिली आहे त्या मुदतीमध्येच ही प्रक्रिया पूर्ण करावी लागेल .

E-KYC कशी करावी?

ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करणं खरं तर खूपच सोपं आहे, फक्त काही सोप्या टप्प्यांमधून ती करता येते. सर्वात आधी तुम्हाला नारीशक्ती दूत अॅप आपल्या मोबाइलवर डाउनलोड करावं लागतं, जे सहजपणे गुगल प्ले स्टोर किंवा अॅप स्टोरवर उपलब्ध आहे. अॅप डाउनलोड केल्यानंतर, तुमचा मोबाइल नंबर आणि आधार क्रमांक टाकून नोंदणी करायची असते. रजिस्ट्रेशन करताना तुमच्या नंबरवर एक ओटीपी येतो, तो एंटर केल्यानंतर नोंदणी पूर्ण होते. पुढे लॉगिन करून अॅपमध्ये प्रवेश करा आणि होम पेजवर दिसणारा E-KYC पर्याय निवडा. यानंतर तुमचा आधार नंबर, बँक खात्याची माहिती आणि राहण्याचा पत्ता अशी आवश्यक माहिती भरावी लागते. माहिती भरल्यानंतर बायोमेट्रिक सत्यापनासाठी बोटांचे ठसे किंवा डोळ्याचे स्कॅनिंग द्यावे लागते. हे स्कॅनिंग तुमच्या जवळच्या आपले सरकार सेवा केंद्रात किंवा अंगणवाडी सेविकेकडे करता येते. सर्व माहिती व बायोमेट्रिक तपशील पूर्ण झाल्यावर ती तपासून Submit बटणावर क्लिक करा. प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर त्याची पुष्टी तुमच्या मोबाइलवर मेसेजद्वारे लगेच मिळते. या काही सोप्या पायऱ्या फॉलो केल्या की ई-केवायसी सहजपणे पूर्ण होतं आणि तुमचं काम जलद गतीने पार पाडलं जातंऑफलाइन प्रक्रियेद्वारे जर तुम्हाला प्रक्रिया पूर्ण करायची असेल तर तुम्ही जवळच्या अंगणवाडी केंद्रामध्ये , ग्रामपंचायत कार्यालयात किंवा CSC केंद्रामध्ये जाऊन संबंधित कागदपत्रे घेऊन ही प्रक्रिया पूर्ण करून घ्या

या प्रक्रियेसाठी लागणारी कागदपत्रे

आधार कार्ड ; तुमची आधार कार्ड च्या बँक खात्यामध्ये लाडकी बहीण योजनेचे पैसे येतात त्या बँकेसोबत लिंक असणे गरजेचे आहे .

बँक खाते ; तुमचे ॲक्टिव्ह बँक खाते ही डीबीटी सक्षम असणे गरजेचे आहे ज्यावर योजनेचे पैसे जमा होतील .

मोबाईल क्रमांक ; तुमचा मोबाईल क्रमांक तुमच्या आधार कार्डशी संलग्न असावा .

E-KYC न केल्यास काय नुकसान होऊ शकतं?

तुम्ही जर ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण नाही केली तर तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा हप्ता मिळण्याबाबत अडचण येऊ शकते . जर तुम्ही प्रक्रिया 31 ऑक्टोंबर 2025 पूर्वी पूर्ण नाही केली तर तुमचा दर महिन्याचा दीड हजार रुपयांचा हप्ता बंद होण्याची शक्यता आहे . जरी प्रक्रिया पूर्ण नाही केली तर तुमचा अर्ज बोगस असा देखील समजला जाऊन तुमचा अर्ज रद्द होण्याची देखील शक्यता नाकारता येत नाही . जर तुम्ही फसवणूक करून या योजनेचा लाभ घेतला असेल तर तुम्हाला कायदेशीर कारवाई देखील होऊ शकते . महाराष्ट्र मध्ये सुमारे 26 लाख बोगसला करते आढळल्यामुळे महाराष्ट्र शासन याबाबतीत कठोर पावले उचलत आहे . शासनाचा असा निर्धार आहे की हा लाभ फक्त पात्र महिलांनाच मिळाला पाहिजे . त्यामुळे तुम्ही लवकरात लवकर ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करून घ्या .


महाराष्ट्र शासन सुद्धा ई-केवायसी पूर्ण करून घेण्यासाठी ठीक ठिकाणी कॅम्प आयोजित करत आहे . नुकतेच मुंबई , नाशिक , पुणे या ठिकाणी कॅम्प आयोजित केली होती .

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही महिलांसाठी एक मोठी संधी आहे, पण आता ई-केवायसी ही तुमच्यासाठी जबाबदारी बनली आहे. ही प्रक्रिया पारदर्शकता आणि विश्वासार्हता वाढवते, ज्यामुळे खऱ्या गरजूंपर्यंत लाभ पोहोचेल. जर तुम्ही अजूनही ई-केवायसी केली नसेल, तर ladakibahin.maharashtra.gov.in वर जा किंवा नारीशक्ती दूत अॅप वापरा. वेळेत ही प्रक्रिया पूर्ण करून तुमचा दरमहा १,५०० रुपये चा लाभ सुरू ठेवा. सरकारने दिलेल्या ३१ ऑक्टोबर २०२५ च्या मुदतीपर्यंत हे करणं तुमच्यासाठी महत्त्वाचं आहे. अधिक माहितीसाठी हेल्पलाइन १८१ वर संपर्क साधा आणि या संधीचं सोनं करा!

Exit mobile version