प्रस्तावना
केंद्र शासनाने शेतकऱ्यांसाठी ज्या ज्या योजना सुरू केल्या आहेत जसे की पीएम-किसान, पिक विमा अशा योजनांच्या विषयातील लाभांशासाठी तसेच शेती संबंधी इतर सरकारी योजनांचा शेतकऱ्यांना थेट लाभ मिळावा यासाठी शासनाने किसान आयडी म्हणजेच शेतकरी ओळखपत्र सुरू केलआहे. हे शेतकरी ओळखपत्र शेतकऱ्याची व त्याच्या शेताची एक डिजिटल ओळख म्हणून ग्राह्य धरले जाणार आहे. शेतकरी आयडी ही शेतकरी व त्याच्या शेतीची माहिती गोळा करणारी एक केंद्रीकृत प्लॅटफॉर्म म्हणून उपयोगात येईल .
ही एक अशी आयडि आहे की जी शेतकऱ्याचे आधार कार्ड त्याच्या जमिनीच्या तपशीलांशी लिंक करेल. ज्यामुळे शेतकऱ्याला भविष्यातील सरकारी योजनांचा त्वरित लाभ मिळेल. ही योजना सरकारच्या डिजिटल कृषी अभियानाचा एक भाग आहे.
या लेखात आपण किसान आयडी म्हणजेच शेतकरी ओळखपत्र याबद्दल सर्व माहिती पाहू. जो तुम्ही शेतकरी असाल व तुम्हालाही शेतकरी ओळखपत्र काढायचे असेल तर खाली तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरेल.
शेतकरी ओळखपत्र (किसान आयडी) म्हणजे काय?
किसान आयडी हा आधार कार्ड प्रमाणेच तुमच्या शेतीची ओळख असेल. या 12-अंकी युनिक आयडीवर तुमची व तुमच्या शेतीची, बँक खात्याची ,संबंधित पिकाची सर्व माहिती लिंक असेल. ज्याचा उपयोग सरकारला योग्य योजना आखण्यासाठी व संबंधित योजना बदल करण्यासाठी पुढील धोरण आखण्यासाठी होईल.
फार्मर आयडीचा उद्देश-
- शेतकऱ्यांची आर्थिक क्षमता मजबूत करणे.
- कमी वेळात सर्व सरकारी योजनांचा लाभ देणे.
- फसवणुकीपासून त्यांचे संरक्षण करणे.
- कृषी क्षेत्र अजून मजबूत करणे.
फार्मर आयडी काढण्यासाठी पात्रता काय आहे?
- अर्जदार हा भारतीय नागरिक असणे आवश्यक आहे.
- अर्जदार शेतकरी असावा आणि त्याच्याकडे शेतीयोग्य जमीन असावी.
- अर्जदाराचे वय किमान १८ वर्षे असणे आवश्यक आहे.
- शेतकरी आधीच दुसऱ्या कोणत्या योजनेत नोंदणीकृत असू शकतो.
किसान आयडी काढण्यासाठी आवश्यक कागदपत्रे कोणतीआहेत?
- सातबारा उतारा
- आधार कार्ड
- आधार कार्डशी लिंक असलेला मोबाईल नंबर
- पासपोर्ट साइज फोटो
- आधार कार्डशी लिंक असलेले बँक खाते.
किसान आयडी काढण्यासाठी ऑनलाईन नोंदणी कशी करावी?
- 1.सर्वप्रथम आपल्या राज्याच्या म्हणजेच महाराष्ट्राच्या किसान आयडीच्या ऑफिशियल वेबसाईटला भेट द्या. – https://mhfr.agristack.gov.in/
- 2.New Ragistration (“नवीन शेतकरी नोंदणी”)बटनावर क्लिक करा.
- 3.आवश्यक माहिती भरा जसे की-आधार क्रमांक, शेतकऱ्याचे नाव, जन्मतारीख आणि जिल्हा/तालुक्याची माहिती.
- तुमच्या जमिनीच्या मालकी पडताळणीसाठी महाभुलेख (७/१२, ८अ उतारा) मधील जमिनीची माहिती द्या.
- 4.आधार, जमिनीच्या नोंदी आणि बँक पासबुकच्या स्कॅन केलेल्या प्रती अपलोड करा.
- 5.आधार क्रमांक एंटर करा आणि OTP द्वारे पडताळणी करा.
- 6.Submit बटनावरती क्लिक करा
- 7.सबमिट केल्यानंतर तुम्हाला मिळणारा Acknowledgment Number सेव करून ठेवा. या नंबर वरून तुम्हाला तुमच्या फार्मर आयडीच्या अर्जाची स्थिती ट्रॅक करता येईल.
किसान आयडी कार्ड काढण्याचे काय फायदे आहेत?
- 1.PM किसान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी उपयुक्त
- 2. डिजिटल पिक कर्ज काढण्यासाठी आवश्यक.
- 3. पिक विमा काढण्यासाठी आवश्यक.
- 4. DBT साठी उपयुक्त.
- 5.योजनांचा थेट लाभ मिळण्यासाठी.